Tuesday, June 30, 2020

धक्कादायक; आजरा तालुक्यात पहिला स्थानिक कोरोनाचा रुग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

सोमवारअखेर (दि. २९) आजरा तालुक्यात ७८ कोरोनाचे रुग्ण होते. हे सर्व रुग्ण मूळचे आजरा तालुक्यातील असले तरी परजिल्ह्यात विशेषतः मुंबई येथे वास्तव्यास होते. मात्र मंगळवारी आजरा तालुक्यातील भादवण गावात स्थानिक ६७ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्थानिक पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातील एक उच्च शिक्षित कुटूंबातील हे सदस्य आहेत. कांही दिवसापूर्वी पती पत्नीचा स्वॅब घेतलेला होता. मंगळवारी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र पतीलाही श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दोघांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या रुग्णांचा स्थानिक पातळीवर अनेकांशी संपर्क आल्याची चर्चा आहे. हे दाम्पत्य कामासाठी गडहिंग्लज येथे जावून येणे हाच प्रवास आहे असे असताना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने स्थानिकांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. याचवेळी समूह संसर्गाला सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत आजरा तालुक्यात ७९ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोघे मयत झाले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Monday, June 29, 2020

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन कायम, ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू


मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र सरकार एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना निर्बंध शिथिलीकरणाबाबत ठोस भाष्य करणे टाळलं होतं. यामुळे निर्बंधांबाबत अनिश्चितता कायम होती. गर्दीच्या आणि रुग्णसंख्या वाढीची भीती असलेल्या लाल क्षेत्रातील (रेड झोन) निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

“३० जूनला टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. ’राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Sunday, June 28, 2020

'संत गजानन' पॉलिटेक्निकला 'डीएमएलटी' अभ्यासक्रमाची मान्यता; एआयसीटीई ने दिली मंजूरी, चालू शैक्षणिक वर्षापासून सुरुवात

 
महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकला एआयसीटीईकडून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (डीएमएलटी) पदाविका अभ्यासक्रमाला चालू शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरु करण्यास मंजूरी मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यानी दिली.
      
 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा तीन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. एआयसीटीई मंजूर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट डिप्लोमा कोर्स आहे. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान ही वैद्यकीय अभियांत्रिकीची एक शाखा आहे जी रोगांचे निदान, उपचार आणि प्रतिबंधाशी संबंधित प्रयोगशाळेतील तपासणी करण्यासाठी जबाबदार असते. हा अभ्यासक्रम करिअर देणारी आणि नोकरी  प्रदान करण्याबरोबरच पुढील  अभ्यासासाठी राजमार्ग  होणार आहे. तसेच सदर कोर्स आमच्या एनएबीएच मानांकित 100 बेड  मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलशी संलग्नित असल्याने येथील अधिक सरावामुळे  विद्यार्थी हा कुशल  बनणार आहेत. अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यावर संबंधित उमेदवार हा योग्य मार्गदर्शनानुसार नमुने घेण्यास, सेंट्रीफ्यूगिंग, स्लाइड्स बनविण्यास, विशिष्ट डाग वापरण्यात डॉक्टरांना मदत करू शकतो. त्यांच्याकडे आण्विक निदान, आण्विक बायोटेक्नॉलॉजी कंपन्या आणि व्हिट्रो फर्टिलायझेशन तसेच संशोधन प्रयोगशाळांमध्येही बर्‍याच संधी  उपलब्ध आहेत. याशिवाय प्रयोगशाळेत घेतल्या गेलेल्या चाचण्यांचे अहवाल नोंदविणे,  क्लिनिकल रेकॉर्ड राखणे, प्रयोगशाळेतील उपकरणे आणि नवीन चाचणी पद्धती निवडणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे आणि प्रयोगशाळेच्या पर्यवेक्षकाद्वारे नियुक्त केलेल्या इतर कर्तव्ये पार पाडणे यासारख्या प्रशासकीय कार्ये देखील गृहित धरू शकतात. 

 शासनाच्या कायद्यांच्या अधीन राहून किंवा पात्र वैद्यकीय व्यावसायिक / पॅथॉलॉजिस्ट / नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या देखरेखीखाली  स्वतःची क्लिनिकल प्रयोगशाळा उघडता येईल. वैद्यकीय प्रयोगशाळेत पर्यवेक्षक, तंत्रज्ञ किंवा सहाय्यक म्हणून  खासगी रुग्णालये नर्सिंग होममध्ये किंवा खाजगी वैद्यकीय चिकित्सक म्हणून  निवडीसाठी पात्र  असेल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोरोना जग @ १ कोटी पार; ५ लाखाहून जास्त मृत्यु

कोरोना जग @ १ कोटी पार; ५ लाखाहून जास्त मृत्यु


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

 जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे  एक कोटींहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 74 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 54 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 5,29,577 रुग्ण आहेत. तर 16,103 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 2,03,328 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 3,10,146 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 19,906 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 25,96,403 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1,28,152 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 13,15,941 कोरोनाबाधित आहेत तर 57,103 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर  यूकेत 43,514 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 3,10,250 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,716 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,40,136 हजार इतका आहे.


कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

अमेरिका : कोरोनाबाधित- 25,96,403, मृत्यू- 1,28,152
ब्राझिल : कोरोनाबाधित- 13,15,941, मृत्यू- 57,103
रशिया : कोरोनाबाधित- 6,27,646, मृत्यू- 8,969
भारत : कोरोनाबाधित- 5,29,577, मृत्यू- 16,103
यूके : कोरोनाबाधित- 310,250, मृत्यू- 43,514
स्पेन : कोरोनाबाधित- 295,549, मृत्यू- 28,341
पेरू : कोरोनाबाधित- 275,989, मृत्यू- 9,135
चिली : कोरोनाबाधित- 267,766, मृत्यू- 5,347
इटली : कोरोनाबाधित- 240,136, मृत्यू- 34,716
इराण : कोरोनाबाधित- 220,180, मृत्यू- 10,364

11 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण,मॅक्सिको हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Saturday, June 27, 2020

दोरूगडे अॅग्रो फर्टिलायझर आजरेकरांच्या सेवेत दाखल


आजरा (प्रतिनिधी) :

सध्या निरोगी व सदृढ आरोग्य गरजेचे आहे. यासाठी अनेकांचा सेंद्रिय शेतीकडे ओढा वाढला आहे. याकरिता सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील राजेंद्र भीमराव दोरूगडे या युवकाने गांडूळ खत निर्मीतीला चार वर्षापूर्वी सुरूवात केली. ते खत दोरूगडे अॅग्रो फर्टिलायझर नावाने विक्रीसाठी उपलब्ध होते. गांडूळ खताची वाढती मागणी लक्षात घेऊन दोरूगडे अॅग्रो फर्टिलायझर आजरा शहरात नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. एका शानदार समारंभात या फर्मची सुरूवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत प्रा. जालंदर दोरूगडे व राजेंद्र दोरूगडे यांनी केले. यावेळी नेताजी कातकर, नगरसेवक संभाजी पाटील, विजय थोरवत, सदाशिव डेळेकर, अजित गावडे, विकास सुतार, महेंद्र मोहिते, एकनाथ दोरूगडे, नितीन मोहिते, सागर दोरूगडे, कृष्णा दोरूगडे, सचिन कळेकर उपस्थित होते. गांडूळ खत आजरा शहरात उपलब्ध झाल्याने ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.


बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

असा असू शकतो ठाकरे सरकारचा अनलाॅक 2 प्लॅन; जाणून घ्या १ जुलैपासून कोणत्या गोष्टीमध्ये दिलासा मिळू शकतो?


मुंबई (प्रतिनिधी) :

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याचं काम हळूहळू ठाकरे सरकार करत आहे. लाॅकडाऊन करताना जशी खबरदारी घेतली गेली तसं
आता अनलाॅकच्या वेळी खबरदारी घेतली जातेय. टप्प्याटप्यानं सर्व काही पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारचा असणार आहे. महाराष्ट्रातले काही जिल्हे पुर्वपदावर आले आहेत. पण काही महानगरपालिकांचे भाग आजही कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यामुळे या पालिकांच्या शहारांकडे अनलाॅकसाठी सरकारची तयारी सुरु आहे.

१ जुलैपासून काय काय सुरु होण्याची शक्यता जाणून घ्या

एसटी :

गेले अनेक महिने जिल्हाअंतर्गत अडकलेले किंवा रोजगारासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी एसटी सुरु करण्याचा विचार सरकार करतंय. काही ग्रामीण भागात एसटीची सुविधा सुरु आहे. मुंबई, पुणे या सारख्या शहरात जर एसटी सुरु करायची झाली तर कठोर निर्बंध घालून सुरु करण्यात येईल.

रिक्षा, टॅक्सी :

अनेक काॅर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत आहेत. पण त्यांना कामावर जाण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसेसचा वापर करावा लागतोय. पण बसेस आणि
कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ती अपुरी आहे. त्यामुळे सम विषम नंबर प्लेट प्रमाणात रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर उतरवू शकतो का यांवर सध्या विचार सुरु आहे.

शाळा, काॅलेज सुरू करण्याचे नियोजन :

रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10, 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्टपासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्यात येईल.

परिस्थिती बघून जिल्ह्यांच्या सीमांवर निर्णय :

सध्या थोडीसी मोकळीक दिली तर लगेच गर्दी होताना दिसते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. त्यांच्यावर अजून ताण नको म्हणून जिल्ह्यांची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. जिल्ह्याबाहेर अडकलेल्या स्थानिक किंवा नातेवाईंकासाठी काटेकोरपणे नियम पाळूनच प्रवेश असेल. रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणार. कंटेन्मेंट क्षेत्राकडे अधिकाधिक देऊन क्षेत्र जितकं लहान ठेवता येईल तितकं लहान ठेवण्याच्या प्रयत्न असणार आहे. या क्षेत्रांमध्ये रोज तपासण्या, फवारणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्लॅन आहे.

सोबतच माॅल्समधील शाॅप्स अल्टर्नेट सुरु करण्यावर विचार सुरु आहे. 

:- सिनेमा, नाट्यगृहांवर अद्याप कोणाताही निर्णय नाही

:- केंद्रांच्या ग्रीन सिग्नलनंतर राज्यात लोकल सेवा सुरु होणार, अद्याप कोणताही निर्णय नाही

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

न्हावेलीकरांच्या "जीवना"साठी कोकरेच्या महिला बचत गटाचा "प्रकाश"


चंदगड (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्यातील न्हावेली गावामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी रेशनधान्य चोरीला जाताना देसाईवाडी येथे पोलिसांना आणि ग्रामस्थांना गाडी सापडली होती. त्यामुळे वागदादेवी महिला बचत गट या न्हावेलीच्या रेशनधान्य दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला. यावर चंदगड  तहसीलदाराच्या आदेशानुसार न्हावेली ग्रामस्थांची गैरसोई होऊ नये यासाठी हे गाव कोकरे येथील जीवनप्रकाश महिला बचत गट रास्त भाव दुकानाला जोडले गेले. त्यामुळे येथील लोकांची गैरसोय झाली नाही.

कोविड -१९ रोगाचा पार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने लौकडाऊन सुरु केले आहे. अश्या परिस्थीतीमध्ये मे-जुन महिन्यामध्ये कोकरे येथील जीवनप्रकाश महिला बचत गटामार्फत व्यवस्थित आणि सुरळीतपणे धान्य वाटप न्हावेली गावामध्ये करण्यात आले. रेशनधान्य वाटप करताना लोकांना पावती मिळाली. तसेच दरामध्ये तफावत नसल्याने सर्व न्हावेली ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी या महिला बचत गटाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Thursday, June 25, 2020

गुरूवारी एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना तसेच जिल्ह्याचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक असल्याचे दिलासादायक चित्र असताना गुरूवारी एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. आता गेलेला दुसरा बळी हा  चंदगड  येथील कोरोना बाधित व्यक्तीचा आहे. गुरूवार २५ जून रोजी त्यांचा मृत्यु झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा हा दहावा बळी आहे. तर चंदगड तालुक्यातील पहिला बळी ठरला आहे. गुरूवारी सकाळीच कोल्हापूर शहरातील एका सराफ व्यावसायिकाचा कोरोनाने मृत्यु झाला होता. 


चंदगड मधील या रूग्णाचा सकाळी मृत्यु झाला असून त्यांच्या कोरोनाचे निदान दुपारी आलेल्या रिपोर्टवरून झाले आहे.  त्यामुळे कोरोना रिपोर्ट येण्याआधीच त्यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोनाची स्थिती नियंत्रणात वाटत असताना नव्याने आढळणारे रूग्ण आणि कोरोनाबाधितांचे मृत्यु यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989


Wednesday, June 24, 2020

कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील ३३ शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप : जि.प.सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर


सिरसंगी (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील ३३ शाळांना जिल्हा परिषद सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांनी आपल्या जिल्हा परिषद फंडातून शैक्षणिक साहित्य मंजुर केले आहे. यामधे १९ शाळांना वाॅटर फिल्टर, १० शाळांना क्रिडा साहित्य, ५ शाळांना प्रयोग पेटी, २ शाळांना टॅब असे साहित्य मंजुर केले आहे. केंद्र शाळा सिरसंगी (ता. आजरा) येथे या साहित्यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मायकेल फर्नांडिस  मनोगत व्यक्त करताना म्हणाले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  स्व. बळिराम देसाई यांच्या नंतर प्रथमच सर्व शिक्षकांना बोलावून एवढ्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे सर्व शिक्षकांतुन समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाला शिक्षक समितीचे नेते व ऋग्वेदचे संपादक सुभाष विभुते, संतोष चौगुले, खानापूरचे उपसरपंच युवराज जाधव, एम. व्ही. पाटील, खवरे सर आदी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख उपस्थित होते. सुत्रसंचलन अर्जुन पाटील यांनी केले तर आभार आनंदा भादवणकर यांनी मानले.

लॉकडाऊन काळातही संत गजानन पॉलिटेक्निकच्या विद्यार्थाना मिळाला रोजगार; टेलिफोनीक इंटरव्ह्यूव्दारे 200 हून अधिक विध्यार्थ्यांची निवड


महागाव (प्रतिनिधी) :

वर्षभरापासून उद्योगामध्ये असलेली आर्थिक अस्थिरता त्यातच उदभवलेले कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत विद्यार्थासमोर उभा होता तो  रोजगाराचा प्रश्न. या सगळ्या गोंधळावर मात करीत महागाव (ता.गडहिंग्लज )येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकनीकने विध्यार्थ्यांसाठी लॉकडाऊन काळातही म्हणजे एप्रिल व मे या दोन महिन्यात विविध पाच बहुराष्ट्रीय कंपन्याची कॅम्पस मुलाखतीचे ऑनलाईन आयोजन करुन 200 हून अधिक विद्यार्थाची  निवडीमुळे  कॉलेजने पुन्हा एकदा  गुणवत्ता सिद्ध दाखवला  आहे. 

 यावर्षी कोरोनाच्या व्हायरसमुळे देशाच्या व उद्योगाच्या अर्थव्यवस्थेवर जरी नकारात्मक परिणाम झाला असला तरी  विध्यार्थ्यांच्या नोकरीवर याचा कोणत्याही  परिणाम होणार नाही असे  कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी व कॉलेज कडून खात्रीपूर्वक सांगण्यात आले. शासनाच्या अटीनुसारच कंपन्या सुरु असणार असल्याने रोजगाराच्या आवश्यकतेनुसार येथे आँनलाईन इंटरव्हूचे आयोजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या आदेशानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्या. 
यानुसार येथील विद्यार्थ्यांची खालील बहुराष्ट्रीय कंपनी निवड झाली.
(कंसातील निवड झालेले विद्यार्थी संख्या)
नेक्सटीअर ऑटोमोटिव्ह पुणे (21)
जयश्री पॉलिमर पुणे (110)
सुल्झेर इंडिया पुणे (40)
जॉन डियर इंडिया पुणे (29)
अँफेनॉल इंटरकनेक्ट पुणे (निवड जाहीर नाही) 
अशाप्रमाणे विद्यार्थाची निवड झाली आहे.

   याबाबत " कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच सातत्याने राबवलेले प्रकल्प आधारित अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी  योजलेले अनेक उपक्रम कॉलेजची गुणवत्ता व कंपनी बरोबर असलेला सातत्यपूर्ण संपर्क या आधारे या कॉलेजने पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील तंत्रशिक्षणातील विद्यार्थीसाठी प्लेसमेंटचा आधारवड ठरला असलेची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली".

 याकामी संस्थेचे चेअरमन डॉ. अॅड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ संजय चव्हाण, सचिव  अॅड बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचार्य, प्लेसमेंट प्रमुख प्रा. संतोष गुरव यांच्यासह कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेणगांवच्या स्वराज्य संस्थेला भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचा जिल्हा युवा संस्था पुरस्कार प्रदान


गारगोटी (प्रतिनिधी) :

भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयच्या नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत दिला जाणारा 2019-20 सालचा जिल्हा युवा संस्था पुरस्कार भुदरगड तालुक्यातील शेणगावच्या स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
स्वराज्य संस्थेने आपला देश विकसित करणे, आपले गाव विकसित करणे, आपला सामाजिक विकास करणे हे काम केले आहे.  स्वराज्य संस्थेने गेली सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय सामाजिक काम केले आहे. तसेच धर्मनिरपेक्षता, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यामाध्यमातून एक उत्तम सेवाभावी कार्य  केले आहे. या महान सामाजिक सेवा कार्यात भाग घेतल्याबद्दल स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगावला जिल्हा युवा संस्था पुरस्काराने नेहरू युवा केंद्राच्या कोल्हापूर जिल्हा युवा समन्वयक पूजा सैनी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,व 25 हजार रुपयांचा धनादेशद्वारे गौरविण्यात आले. यावेळी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज येडूरे, युवा केंद्रांचे लेखाधिकारी भानुदास यादव, अनंत कुलकर्णी, युवा केंद्रांचे स्वयंसेवक निलेश कांबळे, स्वराज्य संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

Tuesday, June 23, 2020

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत; चांगल्या, सकारात्मक वातावरणात चर्चा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. गलवान खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. चांगल्या, सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली. एनडीटीव्हीने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

पूर्व लडाखमधील संघर्षाची स्थिती असलेल्या सर्व भागांमधून तणाव कमी करण्यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. मागच्यावेळी सहा जून रोजी लेफ्टनंट जनरल पदावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी सुद्धा तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. दोन्ही बाजूचे सैन्य हळू-हळू जात होते. पण १५ जून रोजी चीनने धोका दिला व पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चौकी उभारण्याचा प्रत्यत्न केला. त्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. १९६७ नंतर प्रथमच असा हिंसक संघर्ष झाला.



Monday, June 22, 2020

९ हजाराची लाच घेताना चंदगडचे बांधकाम उपअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात


चंदगड (प्रतिनिधी) :

जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत चंदगड तालुक्यात पूर्ण केले शासकीय कामाचे वर्क डन सर्टिफिकेट  देणेसाठी ९ हजार रुपयांच्या  लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारतांना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चंदगडचे उपअभियंता  प्रमोद गोपाळराव कुलकर्णी (वय ५८, रा. नवीन वसाहत, चंदगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, मूळ गाव - कणगला, ता. हुक्केरी, जि. बेळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत २८ वर्षीय युवकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोहेकॉ मनोज खोत, चापोहेकॉ सुरज अपराध, पोना नवनाथ कदम, पोना विकास माने, पोकॉ मयूर देसाई यांनी केली.

आचार्य अत्रे यांचे ९ तुफान विनोदी किस्से; हसून पोट दुखेल

आचार्य अत्रे यांचे ९ तुफान विनोदी किस्से; हसून पोट दुखेल


विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :

विनोदी लेखन म्हटलं की, प्र. के. अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्रातील दोन नावं लगेचंच डोळ्यांसमोर येतात. यापैकी आचार्य अत्रे यांचा जन्म सासवडला १३ ऑगस्ट १८९८  साली झाला. त्यांचा मृत्यू १३ जून १९६९ साली मुंबई इथे झाला. म्हणजे त्यांचा मृत्यू होऊन आज पन्नास वर्षं झाली तरी लोकं त्यांना विसरली नाहीत, उलट त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. किती सामर्थ्य असेल ना यांच्या लेखणीत? खरोखरच आश्‍चर्यकारक लोकं आहेत ही. आचार्य अत्रे यांची अनेक पुस्तकं गाजली. त्यांचं ‘मोरूची मावशी’ हे त्यांचं नाटक आजही प्रेक्षकांची हसून, हसून वाट लावतं. तर अशा या आचार्य अत्र्यांचे नऊ  विनोदी किस्से; वाचून तर बघा, हसून हसून पोट दुखेल

📍१. एकटा पुरतो ना?

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते, मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे बळ विरोधकांच्या संख्याबळापेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला करत असत. एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले, ‘‘अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पडता खरे, पण त्यांच्याएवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?’’ त्यांनी इकडेतिकडे पाहिले.
मग ज्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला म्हणाले, ‘‘काय बळवंतराव? कोंबड्या पाळता की नाही?’’
‘‘व्हय तर!’’
‘‘किती कोंबड्या आहेत?’’
‘‘चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!’’ बळवंतरावांनी भाबडेपणाने उत्तर दिले.
‘‘आणि कोंबडे किती?’’ अत्र्यांनी मुद्दाम विचारले.
‘‘कोंबडा होय. त्यो फकस्त एकच हाये.’’
‘‘एकटा पुरतो ना?’’
झालं जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड हशा पिकला आणि प्रश्‍न विचारून बेजार करणारे पत्रकारही त्या हशात सामील झाले.

📍२. कर्तृत्ववान राष्ट्र-‘पती’

भूतपूर्व राष्ट्रपती कै. व्ही. व्ही. गिरी यांना एकूण आठ मुले होती. त्यांच्याबद्दल आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असे. एकदा अत्र्यांनी श्री. गिरी, सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आणि त्याखाली शीर्षक दिले, ‘गिरी आणि त्यांची ‘कामगिरी’.

📍३. सहचारिणी

अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात एकदा त्यांची गाडी बिघडली म्हणून ते चालतच कामासाठी निघाले. तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, अशा लोकांना संधी हवीच असते. लगेच त्याने खोचकपणे विचारले, ‘‘काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?’’
पण अत्रेच ते! ते काय गप्प बसणार का मूग गिळून?’’
ते दुसर्‍या क्षणाला म्हणाले, ‘‘अरे, आज तुम्ही एकटेच वहिनी दिसत नाहीत तुमच्याबरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?’’
विरोधकाला मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल. तो आपला खाली मान घालून निघून गेला.
हजरजबाबीपणा हा गुण आचार्य अत्र्यांच्या नसानसात भिनला होता. त्यामुळे समोरच्याने आपली शोभा करून घ्यायची नसेल तर गप्प बसलेलं बरं हा नियम पाळलेलाच बरा. 

📍४. ‘च' चे महत्त्व

आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा सर्वश्रुत आहेच. आचार्य अत्र्यांनी एका भाषणात ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.’ असं विधान केलं होतं. यशवंतराव चव्हाणांना तो ‘च’ फार खटकत होता.
यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘‘अत्रे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’ हे तुमचे विधान ठीक आहे, पण तो ‘च’ कशाला मध्ये?
अत्रे म्हणाले, ‘‘अहो, तो ‘च’ अतिशय महत्त्वाचा आहे.’’
‘‘ ‘च’ ला कशाला एवढे महत्त्व?’
त्यावर मिस्कीलपणे अत्रे म्हणाले, ‘‘अहो, ‘च’ किती महत्त्वाचा असतो हे मी का तुम्हाला सांगायला पाहिजे? तुमच्या अडनावातला ‘चा काढला तर मागे काय राहतं व्हाण!’’ तर अशी ही समयसूचकता.

📍५. खिशात हात

१९६५ सालची गोष्ट असावी. सांगलीमध्ये अत्रे यांचे भाषण होते. अत्र्यांच्या भाषणाला तुफान गर्दी होती. अत्र्यांना बोलताना खिशात हात ठेवून बोलायची सवय होती.
भाषण सुरू होते तेवढ्यात कोणीतरी ओरडले, ‘‘अत्रेसाहेब, खिशातला हात काढा.’
त्यावर लगेचच अत्र्यांनी उत्तर दिले, ‘‘तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही.’’ गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि त्यांचे भाषण तसेच सुरू राहिले.

📍६. चिखल

एकदा पावसाळ्यात आचार्य अत्रे पुण्याच्या रस्त्यावरून चालले होते.
एक स्नेही मागून आला आणि म्हणाला, ‘‘अत्रेसाहेब, तुमच्या पँटवर मागच्या बाजूला चिखलाचे शिंतोडे उडाले आहेत.’’ अत्रे लगेच म्हणाले, ‘‘हा पुण्याचा चिखल पुणेकरांसारखाच आहे. अहो, तो मागून निंदा करतो!’’

📍७. स्वल्पविराम

एकदा ना. सी. फडके अत्र्यांना म्हणाले की, ‘‘वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?’’ त्यावर अत्रे म्हणाले, ‘‘योग्य वेळ आल्यावर सांगेन. त्यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले, ‘‘मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.’’ झाले! ही गोष्ट लगेचच बायकोने फडक्यांना सांगितली.
त्यांनी अत्र्यांकडे याबाबत खुलासा मागितला, तेव्हा अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले, ‘मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ.’’ झाली ना बोलती बंद.

📍८. आचार्य अत्रे आणि कै. श्री. अहिताग्नी राजवाडे

आचार्य अत्रे, गाढे विद्वान कै. श्री. अहिताग्नी राजवाडे यांचा खूप आदर करीत दरवर्षी हिवाळ्यात अहिताग्नी आपल्या घराच्या प्रांगणात ‘शारदीय ज्ञानसत्र’ नावाने व्याख्यानमाला आयोजित करीत असत.
प्रत्येक वर्षी एखादा नवीन विषय निवडून त्यावर अनेक विचारवंतांची भाषणे होत असत. यासाठी अहिताग्नीचा एक दंडक मात्र होता. तो असा की, सभेसाठी येणार्‍या सर्वांच्या डोक्यावर टोपी असलीच पाहिजे.
एका वर्षी ज्ञानसत्रात अत्रे आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर टोपी नव्हती. अत्रे कुणाला फारसे न जुमानणारे, तर अहिताग्नी परखड स्वभावाचे. तेव्हा आता काय होणार, याची प्रेक्षकांना काळजी वाटू लागली.
अत्रे तसेच व्याख्यानमालेत उभे राहिले, पण भाषण सुरू होण्याआधी आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवलेली टोपी त्यांनी गंभीर चेहर्‍याने काढून डोक्यावर घातली आणि मिस्कीलपणाने हसून म्हणाले,
मी आजवर अनेकांना टोप्या घातल्या, परंतु मला टोपी घालणारे अहिताग्नी राजवाडे पहिलेच आहेत!’’
या बोलण्यामुळे साहजिकच वातावरणातील ताण निवळला आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला
पण या विनोदाबरोबरच कधीतरी माणूस खरं आणि मनाला हेलावून बोलणारं सत्य पण बोलून जातं. त्याबद्दलचा किस्साही आपण ऐकू. तो विनोदी नसला तरी आपल्या मनाला नक्कीच भावेल. त्यामुळे त्यांचं मोठेपण सहज उमजून येईल.

📍९. विनोद नसेल तर काय उपयोग?

अशाच एका सभेतील त्यांच्या भाषणात अत्रे म्हणाले, ‘‘लोक मला म्हणतात, की ‘अत्रे, आम्हाला तुमच्या विनोदाची फार भीती वाटते. तेवढे तुम्ही बंद करा. मग बाकीचे तुमचे सारे आम्हाला मान्य आहे.’’
पुढे अत्रे म्हणाले, ‘‘बंधूंनो, माझा विनोद माझ्यापासून काढून घेतल्यावर मग माझे काय शिल्लक राहते? आणि ते जे काही शिल्लक राहील ते घेऊन मला या जगात एक क्षणभर तरी शिल्लक राहण्याचे काय कारण?
हे म्हणजे एखाद्या सिंहाला म्हणण्यासारखे आहे की, ‘आम्हाला तुझ्या आयाळाची भीती वाटते, तेवढी भादरून तू जंगलामध्ये हिंडत जा!
किंवा एखाद्या स्वर्गातील अप्सरेला म्हणायचे की, ‘डोळे हे जुलमी गडे’ तुझ्या डोळ्यांचे आम्हाला भय वाटते, म्हणून काळा चष्मा घालून तू आमच्या ‘केसरी’ कचेरीवरून हिंडत जा. तशापैकी आहे हे या लोकांचे म्हणणे आहे.’’
खरंच किती सत्यता आहे ना या वाक्यात? विनोद हेच त्यांचे सर्वस्व होते म्हणून तर आपण आजही विनोद म्हटलं की प्रकर्षाने त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्या विनोदबुद्धीला मनापासून सलाम करतो. ‘हसण्याने आयुष्य वाढतं म्हणतात’ तर बघा हसून.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Sunday, June 21, 2020

बाळ नांदगावकर यांच्या वाढदिवसा निमित्त युवराज येडुरे यांच्यावतीने गरजू मुलांना "स्कुल बॅग" वाटप


गारगोटी (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळ नांदगावकर यांच्या वाढदिवसा निमित्त राधानगरी मतदारसंघातील गरजू मुलांना महाराष्ट्र नवनिर्माण  जनहित सेनेचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे यांच्यामार्फत"स्कुल बॅग" वाटप के ले.

या वेळी बोलताना युवराज येडूरे म्हणाले, बाळ नांदगावकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे  गरजू मुलांना "स्कुल बॅग" वाटप करताना साहेबांच्या आदेशाप्रमाणे  स्कुल बॅग शक्यतो जे सरकारी शाळेत शिकत आहे व ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशांना दयावी. हे करण्यामागचा हेतू हा आपल्या बांधवांचे ओझे कमी करण्याचा आहे त्यांचे मानसिक ओझे वाढविण्याचा नव्हे, त्यामुळे स्कुल बॅग वर कसल्याही प्रकारचे स्टिकर, फोटो लावून त्यांना कमीपणा वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच स्कुल बॅग ज्यांना देत आहोत त्यांना देतांना अथवा त्यांच्या बरोबर अजिबात फोटो काढू नये. हे करतांना ज्यांना शक्य आहे , व अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे असल्याचा संदेश दयावा या सुचनेप्रमाणे आम्ही स्कुल बॅग  वाटप केले. या वेळी मनसे जनहित पक्षाचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे ,मनसे जनहित पक्षाचे भुदरगड तालुका अध्यक्ष सतीश थवी, अमित कोरे, समीर अमणगी मनसे सैनिक उपस्थित होते, तसेच  सर्व विद्यार्थ्यांनी बाळा नांदगावकर साहेब यांचे आभार मानले व वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

काजू उद्योगासाठी क्लस्टर योजनेसह हमीभाव मिळवून द्यावा; काजू उत्पादक शेतकरी व कारखानदार यांची समरजितसिंह घाटगे यांच्याकडे मागणी


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कोकण आणि गोवाच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करावी. तसेच इतर पिकांप्रमाणे काजूलाही हमी भाव मिळावा अशी मागणी आजरा तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी व कारखानदार यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे  यांच्याकडे केली. आजरा येथे काजू उत्पादक शेतकरी व  कारखानदार यांच्याशी  भेटीवेळी  उत्पादकांनी घाटगे  यांच्यासमोर   आपल्या समस्या मांडल्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अशोक अण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती

 यावेळी समस्या मांडताना शेतकरी म्हणाले, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काजूला बाजारात मागणी नाही. त्यामुळे कारखानदारांकडून तो कमी दराने खरेदी केली जात आहे. मात्र आर्थिक नुकसान सोसून काजू उत्पादक कमी दराने  विकण्यास तयार नाही. गेल्या चार-पाच वर्षात काजू पिकाला चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी आर्थिक नुकसान का सोसावे? असा प्रश्न  शेतकरी विचारत आहेत.  गोवा आणि कोकणच्या धर्तीवर  शासनाने क्लस्टर योजना  सुरू करावी. त्यामुळे असंघटित शेतकरी संघटित होऊन अशा परिस्थितीत मार्ग निघू शकतो व होणारे नुकसान टळेल अशी मागणी सुद्धा शेतक-यांनी केली.

 काजू फॅक्टरी धारकांच्या वतीने सुद्धा त्यांच्या अडचणींचा पाढा घाटगे यांच्यासमोर वाचला. शेतकऱ्यांकडून घेतलेला कच्चा माल प्रक्रिया करून बाजारात विकल्या नंतर त्याचे पैसे मिळण्यास विलंब लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही ते देताना विलंब होतो. शिवाय कारखानदारांना बँकेच्या कर्जाऊ रकमेवर व्याजाचा फटका बसतो, तो वेगळाच. याशिवाय शासनाने परदेशातून काजू आयात केला आहे. तो काजू कमी दरात मिळत असल्यामुळे स्थानिक काजू धारकांच्या मालाचा उठाव होत नाही. याविरोधात आवाज उठविण्यासाठी काजू उत्पादकांसह कारखानदार  संघटित होत नाहीत. त्यासाठी क्लस्टर सारखी योजना गोवा आणि कोकणच्या धर्तीवर आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुका परिसरात लागू केल्यास ते संघटित होतील. त्यामुळे काजू उत्पादक व कारखानदार यांचे नुकसान होणार नाही. कारखानदारांना वाढीव कर्ज मिळावे, व्याज सवलत मिळावी, जीएसटीचा परतावा त्वरीत मिळावा, वीज बिलात सवलत मिळावी अशा मागण्यांचा पाठपुरावा करावा असे साकडे यावेळी घाटगे यांना घातले.  काजू उत्पादक व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदार यांच्या या विविध समस्यांवर शासन दरबारी आवाज उठवून पाठपुरावा करण्याचे अभिवचन श्री घाटगे  यांनी यावेळी दिले. 

शेतक-यांना चार पैसे जादा मिळण्यासाठी काजू माल  मार्केट यार्ड मध्ये थेट विक्री व्यवस्था करावी असे जिल्हा बँकेचे संचालक अशोक आण्णा चराटी यावेळी म्हणाले .
यावेळी आजरा तालुका काजू व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडूसकर, विकास  फळणेकर, जयसिंग खोराटे, विकास बागडी, डॉ दीपक मेंगाने,  रवींद्र घोरपडे, महादेव जाधव, नाना सावेकर, मधुकर चव्हाण, किरण सन्ने, कुमार पाटील, बाळू नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, विलास नाईक, डॉ अनिल देशपांडे, सरपंच सुरेश मिटके आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Saturday, June 20, 2020

२१ जून रोजी सर्वात मोठे सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ आणि कुठे दिसणार

२१ जून रोजी सर्वात मोठे सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ आणि कुठे दिसणार


विकास न्यूज :

२१ जून २०२० रोजी म्हणजेच रविवारी सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांतून पहायला मिळणार आहे. जाणून घ्या सूर्यग्रहणाची वेळ आणि इतर माहिती,

# २१ जून म्हणजेच रविवारी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

# हे सूर्यग्रहण भारतासह इतर देशांतील काही भागांत पाहता येणार 

# २१ जून रोजीचं सूर्यग्रहण हे प्रथम आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार 

 रविवारी म्हणजेच २१ जून रोजी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे. असं म्हटलं जात आहे की हे सूर्यग्रहण देशातील बऱ्याच भागात कंकणाकृती स्थितीत दिसेल. कंकणाकृती स्थितीत चंद्र हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो. या परिस्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात तर काहीजण रिंग ऑफ फायर असंही संबोधतात.

आफ्रिकेतून सुरूवात :

२१ जून रोजीचं सूर्यग्रहण हे आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार आहे आणि त्यानंतर इथिओपिया, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान नंतर भारतातील राजस्थानमध्ये प्रवेश करेल. भारतानंतर तिबेट, चीन, तैवानच्या दिशेने प्रशांत महासागराच्या मध्यभागी सूर्यग्रहण समाप्त होईल.  

ग्रहण किती वाजता :

२१ जून रोजी रविवारी सकाळी १०.१७ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होईल. तर, दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत सूर्यग्रहणाचा मध्यकाळ असेल आणि दुपारी २ वाजून २ मिनिटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल. २१ जून २०२० रोजीचं सूर्यग्रहण झाल्यानंतर २०२० या वर्षाच्या शेवटी आणखी एक सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी सूर्यग्रहण हे भारतातूनही पहायला मिळणार आहे मात्र, ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते तुमच्या डोळ्यांना दुखापत करु शकतं. 

कुठे दिसणार ग्रहण :

हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांत दिसणार आहे. यासोबतच आशिया, आफ्रिका, हिंद महासागर, युरोपमधील काही भागांत आणि ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे.

हे ग्रहण १९९५ ची आठवण करुन देणार :

२१ जून रोजीचं सूर्यग्रहण २५ वर्षांपूर्वी झालेल्या २४ ऑक्टोबर १९९५ रोजीच्या ग्रहणाची आठवण करुन देईल. त्या दिवशी झालेल्या सूर्यग्रहणाने अनेक भागांत काहीसा अंधार झाला होता. त्याच प्रमाणे यावेळी सुद्धा अंधार होण्याची शक्यता आहे.

सूर्यग्रहण पाहताना काळजी :

सूर्यग्रहण पाहताना आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास त्यामुळे डोळ्यांना अपायकारक ठरु शकतं. सूर्यग्रहण पाहण्यासाठी दुर्बिण, टेलिस्कोप, ऑप्टिकल कॅमेराच्या सहाय्याने पाहता येऊ शकतं.

१४ डिसेंबर रोजी वर्षातील शेवटं सूर्यग्रहण :

२०२० या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या ग्रहण काळात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकेल आणि पृथ्वीवर त्याची सावली पहायला मिळेल.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

युवा ग्रामीण विकास संस्थेचे स्थलांतरित कामगारांना कोरोना विषयी जनजागृतीचे कार्य प्रेरणादायी : मोहन सातपुते


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोरोनाशी लढण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती महत्वाची असून आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांनी आसेंर्निक एल्बम-३० या होमिओपॅथिक औषधांला संमती दिलेली आहे. स्थलांरीत कामगारांना याविषयी जागृत करण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे असे मत युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी केले.

कोल्हापूर दक्षिणचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  पालकमंत्री ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील, सौ. प्रतिमा सतेज पाटील यांच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळशिरगाव (ता. करवीर) येथील युवा ग्रामीण विकास संस्था, स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प कर्मचारी व स्थलांतरित कामगार यांना  रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे, सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यासाठी कोल्हापूर दक्षिण जनसंपर्क अधिकारी बजरंग रणदिवे व सामाजिक कार्यकर्ते सात्ताप्पा कांबळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आवळे,प्रल्हाद कांबळे, कौस्तुभ भोसले, सुजाता कांबळे, दीपाली सातपुते, संदीप कांबळे, अजय कांबळे व कामगार वर्ग, पिअर लीडर उपस्थितीत होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

सेनापती कापशीतील महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून वृक्ष दत्तक उपक्रम; संगोपनाची शपथ


सेनापती कापशी (प्रतिनिधी) :

महावितरण सेनापती कापशी (ता. कागल) शाखेचे अभियंता व सर्व कर्मचारी यांनी महावितरण परिसरात एकूण 62 वृक्षांचे वृक्षारोपण व श्रमदानातून स्वच्छता केली. यामध्ये प्रामुख्याने औषधी, फळ तसेच सुशोभित करणारी वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्याचबरोबर फक्त वृक्ष लागवड करून न थांबता त्या वृक्षांचे नीट संगोपन करून चांगले वाढवण्यासाठी सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना येथील कापशी विभागाचे साहाय्यक अभियंता शिवाजी गावडे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना वृक्ष दत्तक देत त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, परिसरात अडचण व कामाच्या ठिकाणचे गवत पालापाचोळा तसेच येथील उपकेंद्रातील यार्ड मध्ये झाडे झुडपं मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे साप, विंचू यांचा वावर मोठ्या प्रमाणात झाल्याने कामासाठी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाला मोठा धोका निर्माण झाला असल्यामुळें रिकाम्या वेळात सर्वांनी श्रमदानातून स्वछता करत परिसर मोकळा केला.
          
  यावेळी महावितरण खात्याचे सेनापती कापशी विभागाचे सहाय्यक अभियंता शिवाजी गावडे, नवनाथ डवरी, कनिष्ठ अभियंता केतन मोरे, कनिष्ठ अभियंता शंकर मुंढे, वरिष्ठ तंत्रज्ञ मोहन शेलार, प्रधान तंत्रज्ञ विनोद सुलताने, वरिष्ठ तंत्रज्ञ शशिकांत चव्हाण, यंत्रचालक रोहित पाटील, तंत्रज्ञ, पवन खोब्रागडे, तंत्रज्ञ भोला सोयाम, विद्युत सहाय्यक बाळकृष्ण पाटील, विद्युत सहाय्यक जयदेव नन्नावरे, विद्युत सहाय्यक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Wednesday, June 17, 2020

ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी) : 

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण १५.७२ कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली. 

२००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये तर २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन

दरम्यान, राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित राहीले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Tuesday, June 16, 2020

कोल्हापुर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; राजाराम आणि शिंगणापूर बंधारा पाण्याखाली, राधानगरी धरण पातळीत वाढ

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात धुंवाधार पावसाने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी (ता.१६) दुपारी पंचगंगा नदीवरील राजाराम आणि शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रशासनाने योग्य ती खबरदारीची पावले उचलली आहेत. मागच्यावर्षी बसलेला महापूराचा फटका  लक्षात घेऊन नदी किनाऱ्याजवळील गावातील घरांना नोटीसा पाठवण्याचे काम केले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.🇦

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा :

राधानगरी ५८.६५ दलघमी, तुळशी ४३.९४ दलघमी, वारणा ३३६.०९ दलघमी, दूधगंगा २२२.५२ दलघमी, कासारी २७.१९ दलघमी, कडवी २८.०५ दलघमी, कुंभी २९.११ दलघमी, पाटगाव २९.३५ दलघमी, चिकोत्रा १४.५१ दलघमी, चित्री १२.५५ दलघमी, जंगमहट्टी ६.५४ दलघमी, घटप्रभा १८.८३ दलघमी, जांबरे ५.२९ दलघमी, कोदे (ल पा) १.६८ दलघमी असा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १३,९ फूट, सुर्वे १५.२ फूट, रुई ४२ फूट, तेरवाड ३६.३ फूट, शिरोळ २९.३ फूट, नृसिंहवाडी २२.३ फूट, राजापूर ११.३ फूट 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Monday, June 15, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचे निधन


मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Sunday, June 14, 2020

जागतिक रक्तदान दिनानिमित्त चंदगड येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद


चंदगड (प्रतिनिधी) :

 चंदगड तालुका भारतीय जनता पार्टी युवक मोर्चाच्या वतीने जागतिक रक्तदान शिबिर निमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिर मध्ये 110 रक्तदात्यांनी रक्त देऊन शासनाला सहकार्य केले. सांगलीच्या मानस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले. यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, चंदगड तालुका भाजप अध्यक्ष मलिकार्जुन मुंगेरी, उपाध्यक्ष  संदीप नांदवडेकर यांच्यासह विशाल पाटील, सुनील कानेकर, गोविंददादा पाटील, चंदगड  शहराध्यक्ष योगेश कुडतरकर, नितीन फाटक, भावकु गुरव, कृष्णा कोलकर, चेतन बांदविडेकर, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, समीर पिळनकर, संदीप देसाई, दौलत वर्पे यांच्यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या


मुंबई (प्रतिनिधी) :

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

Saturday, June 13, 2020

कोल्हापूरातून जिल्ह्याच्या कोणकोणत्या भागात एसटी बस सेवा सुरू झाली आहे? घ्या जाणून


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

🔳कोल्हापूर जिल्ह्यात एस.टी.महामंडळाची लॉकडाऊन  काळातील वाहतूक खालिलप्रमाणे सुरु आहे.🔳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚌 कोल्हापूर ते जयसिंगपूर मार्गावर दिवसभरात १३ फेऱ्या होतात.सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ४५ मिनिटे अंतराने धावतात.

🚌कोल्हापूर ते इंचलकरंजी मार्गावर दिवसभरात २१ फेऱ्या होतात.सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ३० मिनिटे अंतराने धावतात.

🚌कोल्हापूर ते कोडोली मार्गावर दिवसभरात जाऊन येऊन ६ फेऱ्या होतात.कोल्हापूर मधून ०७.३०, १२.४५, १६.१० तर कोडोली येथून  ०९.००, १४.३० व १७.३० वाजता धावतात.

🚌 कोल्हापूर ते मलकापूर मार्गावर दिवसभरात ४ फेऱ्या होतात. कोल्हापूर आगाराच्या दोन फेऱ्या कोल्हापूरातून सकाळी ८.३० व दुपारी ३.३० वाजता तर मलकापूर मधून १०.३० व सायंकाळी १७.३० वाजता धावतात.

🚌 कोल्हापूर ते गडहिंग्लज (कापशी/माद्याळ मार्गे)मार्गावर दिवसभरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ८ फेऱ्या धावतात.

🚌 कोल्हापूर ते गारगोटी ३ फेऱ्या तर मुरगुड मार्गावर २ फेऱ्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत धावतात.

🚌 कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर सकाळी ८.१५ ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ४ फेऱ्या धावतात.

🚌 कोल्हापूर ते आजरा(कापशी/माद्याळ मार्गे) मार्गावर १ फेरी दुपारी १६.३० वाजता धावते.

🚌कोल्हापूर ते कुरुंदवाड मार्गावर सकाळी ११.०० व सायंकाळी ५.३० वाजता अशा २ फेऱ्या धावतात.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Friday, June 12, 2020

मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण; स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित

 
बीड (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
 
ज्या व्यक्ती मागील चार दिवसांत पालकमंत्री धनंजय मुंडे  व त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या संपर्कात आल्या किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केलेली अशांनी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत २८ दिवस होम क्वाॅरंटाइन होऊन काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली.
 
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Thursday, June 11, 2020

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचं नाव कसं पडले? तसेच जिल्ह्यांची गुणवैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचं नाव कसं पडले? तसेच जिल्ह्यांची गुणवैशिष्ट्ये 


विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :
 
आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे.

  महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील. अशावेळी आपण बराच विचार करत असतो की, जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले? त्या मागचा इतिहास काय असेल. कशावरुन हे नाव ठेवण्यात आले असेल. असे एक ना अनेक प्रश्‍न आपल्याला भेडसावत असतात. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्ह्यांची नाव काळानुसार बदलत गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्या त्या शहरांचा नावांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी ठरली असतील ते जरुर वाचा.

 महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे :-

 अमरावती :-
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी ओळख असलेला अमरावती जिल्हा. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याचे मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे करण्यात आले.

 औरंगाबाद :-
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे. आजच्या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी होते. तसेच अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.

 बीड :-
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव पडले आहे.

भंडारा :-
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.

 बुलडाणा :-
बुलडाणा जिल्हा हा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.

 चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.

धुळे :-
महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्‍चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.

गोंदिया :-
महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.

हिंगोली :- 
महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.

जळगाव :-
महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.

जालना :-
महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.

 कोल्हापूर :-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.

 लातूर :- 
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.

 मुंबई :-
महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.

नागपूर :-
महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.

 नंदुरबार :-
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.

 नाशिक :- 
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.

उस्मानाबाद :- 
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.

परभणी :- 
महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.

 पुणे :-
महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.

रायगड :-
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.

सांगली :-
महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.

 सातारा :- 
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.

 सिंधुदुर्ग :-
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.

सोलापूर :-
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्‍वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.

ठाणे :-
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.

वर्धा :- 
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.

वाशिम :-
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.

यवतमाळ :-
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.

अकोला :- 
महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Sunday, June 7, 2020

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सिंबायोसिसने घेतली अनोख्या पध्दतीने काळजी


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

जगभरात कोरोनाने  थैमान घातले असून दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या पाहता हे संकट लवकर काही संपेल असे वाटत नाही. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात या कोरोना विरुद्ध लढा देत उभं राहावं लागणार आहे. याचाच एक भाग म्हणजे काही दिवसांनी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेच प्रश्न ऐरणीवर येणार आहे त्यामुळे उद्याचा हा धोका ओळखून वेळीच खबरदारी घेण्याच्या दृष्टीने गडहिंग्लज तालुक्यातील सिंबायोसिस स्कूल हरळी बुद्रुक या शाळेने एक वेगळा उपक्रम हाती घेत भडगाव, लक्ष्मीनगर, मरगुद्रीवाडी, हसुरवाडी, हसुरसासगिरी हुनगीनहाळ, हरळी बुद्रुक या गावातील प्राथमिक शाळेतील लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे व कोरोना पासून सुरक्षित असावेत या उद्देशाने फूटप्रेस सॅनिटायझर स्टँड भेट म्हणून दिले. ही भेट सिंबायोसिस व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आली. 

यावेळी उपमुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत ही भेट देण्याचा हेतू स्पष्ट केला  तर डॉ. सतीश घाळी बोलताना म्हणाले की सिंबायोसिसने नेहमीच वसुदैव कुटुंबकम हे ब्रीद वाक्य डोळयांसमोर ठेऊन काम केले आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे या भावनेने प्राथमिक शाळेतील लहान मुलांची काळजी घेत त्यांच्याप्रति असणारी आपली संवेदनशीलता दाखवत दिलेली ही भेट खरोखरच कौतुकास्पद असून इतर शाळांसाठी आदर्शवत आहे.  सूत्रसंचालन वहिदा मुल्ला यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विक्रांत गुरव यांनी मानले. यावेळी अजित बंदी, रोहित यळगुडे, संजय चाळक, युवराज पाटील, गंगाराम कोरे, कल्लोळे सर, पुष्पावती वाघराळकर, संदीप बामणे, मालन पाटील, नंदा तिबिले, रावसाहेब मुरगी, कविता कागीनकर, संतोष आंबी, राजेंद्र शेलार, अतुल अहिरे, अनुपमा देसाई, दिगंबर पाटील, पांडुरंग कांबळे, यल्लपा कोळी, दत्तात्रय गोंधळी, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
741068989

आजरा तालुक्यात पुन्हा चार कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ७१


आजरा (प्रतिनिधी) :

शनिवारी रात्री उशिरा आजरा तालुक्यातील आणखी चार जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मेंढोली येथील तीन तर हात्तिवडे येथील एकाचा समावेश आहे. यामुळे आजरा तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७१ झाली आहे. यापैकी दोन जण मयत आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Saturday, June 6, 2020

सलग दुसर्‍या दिवशी आजरा तालुक्यात कोरोनाचा बळी


आजरा (प्रतिनिधी) :

शुक्रवारी आजरा तालुक्यातील मेंढोली येथील वृध्दाचा कोरोनाने मृत्यु झाला. त्यानंतर शनिवारी सलग दुसर्‍या दिवशी आजरा तालुक्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्ती ही वडकशिवाले गावातील असून ५२ वर्षीय आहे. हा तालुक्यातील दुसरा तर कोल्हापूर जिल्ह्यातील आठवा बळी आहे. सदर व्यक्ती काल शुक्रवारी कोल्हापूर सीपीआर येथे दाखल झाली होती. शनिवारी सकाळीच त्या व्यक्तीच स्वॅब घेण्यात आले होते. दुपारीच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लगेच सीपीआरमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्या आठपैकी पाच जण गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील असल्याने उपविभागात खळबळ माजली आहे. दरम्यान आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ६७ झाली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

'संत गजानन'कडून क्वारंटाईन गावकर्‍यांना औषध वाटप


महागाव (प्रतिनिधी) : 

 महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालय व पॅरामेडीकलच्या वतीने गडहिंग्लज तालुक्यातील हरळी, महागाव, हसुरवाडी व चंदगड तालुक्यातील विविध गावातील क्वारंटाईन गावकर्‍याना  रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मोफत औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महागावच्या सरपंच जोत्स्ना पताडे यानी स्वागत केल्या. कन्या विद्यामंदिर, शिवाजी विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, राजा छत्रपती विद्यालय हरळी येथील प्राथमिक शाळा, मंदिरात व हसुरवाडी  असलेल्या  क्वारंटाईन गावक-याना औषध वाटप करण्यात आले. दरम्यान प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यानी औषध घेण्याविषयी पद्धती सांगून कोरोनाला हरवायचे असेल तर शासन व प्रशासनाला सर्वानी सहकार्य करण्याबरोबरच नियमांचेही पालन करणे गरज असल्याचे सागिंतले. यावेळी महागावचे सरपंच जोत्स्ना पताडे व हरळीच्या सरपंच दिपाली लोहार यानी सदैव  मदतीचा  हात देण्यात पुढे असणाऱ्या व आरोग्याची काळजी घेणाऱ्या संस्थेचे, आयुर्वेदीक टिमचे व प्राचार्याचे कृतज्ञता व्यक्त केले. यावेळी पँरामेडीकलचे प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, राजू डवरी, सरपंच संजय काबंळे, ग्रामसेवक संतोष होळ, डॉ. संगिता मनगुळे, डॉ. महेश पाटील तसेच हाँस्पिटल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Friday, June 5, 2020

अखेर आजरा तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. त्यापैकी एका रूग्णाचा शुक्रवारी बळी गेला आहे. मेंढोली येथील ऐंशी वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळीच पॉझिटिव्ह आला होता. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बळींची संख्य़ा सात झाली आहे. सदर वृध्द मुंबईहून गावी आला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा; कोरोनाच्या ४०० रूग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज


कोल्हापूर (प्रतिनिधी): 

शुक्रवार (दि. ५) अखेर 653 रूग्णांपैकी 400 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण 247 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी शुक्रवारी दिली.
 
 शुक्रवारी सकाळ अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 59, भुदरगड- 67, चंदगड- 75, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25, राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 645 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1 आणि  मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण 645 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 653 रूग्णांपैकी 400 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 247 इतकी आहे.

आजरा तालुक्यात पुन्हा चार; एकूण संख्य़ा ६५


 आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात शुक्रवारी पुन्हा कोरोनाचे 4 जण पाॅझीटीव्ह सापडले आहेत. यामुळे तालुक्यात एकूण ६५ पाॅझीटीव्ह रुग्ण संख्या झाली आहे. शुक्रवारी सापडलेल्यांमध्ये मेंढोली, झुलपेवाडी, कर्पेवाडी, लाकूडवाडी या गावातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Thursday, June 4, 2020

सरोळीत आणखी दोन कोरोनाबाधीत; आजरा तालुक्यात एकूण रुग्ण ६१


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढ होत आहे. गुरूवारी सरोळी गावात आणखी दोन रुग्ण सापडले आहेत. यामुळे सरोळी गावातील एकूण रुग्ण संख्या पाच झाली तर तालुक्याची संख्या ६१ झाली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

मुदत संपलेल्या दीड हजार ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय


मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

'संत गजानन' पॉलीटेक्नीक ला एनबीए कडून 'सर्वोच्च' मानांकन; नऊ टप्प्यात मूल्यमापन,गुणवत्तेच्या जोरावर गरुडभरारी


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलीटेक्निकला देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च असे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन (एन.बी.ए.) कडून सर्वोच्च मानांकन मिळाले या पाँलिटेक्निक मधील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्पुटर इंजिनीअरिंग या विभागातील अभ्यासक्रमांसाठी सन  2023 पर्यत म्हणजेच एकूण तीन  वर्षांसाठी एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली.

 एन.बी.ए. ही तंत्र शिक्षण संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून १९८९ मध्ये वॉशिंग्टन अकॉर्डनुसार झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रमाणित करारांची सदस्य आहे. म्हणून हे मानांकन मिळालेल्या संस्थेतील विद्यार्थी हे सदस्य देशातील मानांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या तोडीचे संबोधले जातात. या मानांकनामुळे संस्थेच्या अभ्यासक्रमांना एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याने महाविद्यालयास शासनाकडून विविध प्रकारचा निधी मिळण्यास मदत होते.
 
  सदरचे मानांकन  मिळविण्याकरिता या पाँलिटेक्निकने प्रमाणित पद्धतीचे सर्व कागदपत्रे सादर केले त्यातील प्राथमिक निकषांवर संस्थेची गुणवत्ता सिद्ध झाल्यावर एन.बी.ए. कडून एकूण चार  तज्ज्ञांच्या समितीने संस्थेस दिनांक 3 ते 5 जानेवारी  2020  दरम्यान भेट देऊन सादर केलेल्या माहितीची शहानिशा व वस्तुस्थिती पाहून आपला अहवाल एन.बी.ए.कडे पाठविला. समितीने या संस्थेच्या विविध निकषांवर आधारित नेमून दिलेल्या ९ टप्प्यात मूल्यमापन करून तपासणी केली असता मुख्यत्वे संस्थेची शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा व त्याची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, शैक्षणिक व पायाभूत सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट,भारतीय उद्योग मंडळ व आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद संयुक्त विद्यमाने उद्योजकता सजगते करीता सिल्व्हर रॕकिंग,अटल इनोव्हेशन मिशन निती आयोग नवी दिल्ली कडून ग्रामीण भागात नाविण्यपुर्ण उद्योजकता वाढीसाठी केद्रं म्हणून या पाँलिटेक्निकची प्रथमच निवड मायक्रोसाॕफ्ट कडून कोविड -19 मध्ये आँनलाईन कार्यप्रणाली तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकनापासून ते आत्तापर्यंत महाविद्यालयांने केलेली प्रगती, निकाल, डिजीटल ग्रंथालय, विद्यार्थी अभिप्राय   याची दखल घेऊन सर्वोच्च मानाकंनास पात्र ठरवले. आता या मानांकनाचा फायदा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका प्राप्तीनंतर करिअर करताना देखील होणार आहे.


पश्चिम  महाराष्ट्रामधील अग्रमानांकित काँलेजच्या यादीत अग्रभागी असलेले  संत गजानन महाराज शिक्षण समूह संचलित या पॉलीटेक्निकची सुरुवात 2008 साली झाली व अल्पावधितच  गुणवत्तेच्या जोरावर गरुडभरारी मारत अखेर  यशाच्या शिखरावर विराजमान झाली .

 मिळालेल्या या मानांकनाबद्दल सर्व विभाग प्रमुखांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे  संस्थेचे  चेअरमन अॅड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, संस्थेचे सचिव अॅड बाळासाहेब चव्हाण ,  डॉ. सौ . प्रतिभा चव्हाण , डॉ. सौ . सुरेखा चव्हाण यांनी कौतुक केले.

अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, परंपरा तसेच त्यांना रोजगाराभिमुख बनविणे हेच आमचे वैशिष्ट्य आणि प्रमुख उद्दिष्ट आहे.मानांकन प्राप्त झाल्यामुळे संत गजानन पाँलिटेक्निकला राज्यात तसेच देशात नावलौकिक प्राप्त झालेला आहे असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅड डॉ आण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले .
   
  या कामी समन्वयक विकास साळूंखे, उपप्राचार्या रोहिणी पाटील, प्रा. संतोष गुरव, प्रा. अब्दुलहमिद मुल्ला, प्रा. निलजित माळी, प्रा. विक्रम मोहिते, प्रा. मंजूनाथ पाटील , प्रा. महादेव बंदी, प्रा.कविता कुरळे, प्रा.सुरज चौगुले व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम लाभला.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...