आजरा (प्रतिनिधी) :
शुक्रवारी आजरा तालुक्यातील मेंढोली येथील वृध्दाचा कोरोनाने मृत्यु झाला. त्यानंतर शनिवारी सलग दुसर्या दिवशी आजरा तालुक्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्ती ही वडकशिवाले गावातील असून ५२ वर्षीय आहे. हा तालुक्यातील दुसरा तर कोल्हापूर जिल्ह्यातील आठवा बळी आहे. सदर व्यक्ती काल शुक्रवारी कोल्हापूर सीपीआर येथे दाखल झाली होती. शनिवारी सकाळीच त्या व्यक्तीच स्वॅब घेण्यात आले होते. दुपारीच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लगेच सीपीआरमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्या आठपैकी पाच जण गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील असल्याने उपविभागात खळबळ माजली आहे. दरम्यान आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ६७ झाली आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment