कोल्हापूर (प्रतिनिधी) :
गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना तसेच जिल्ह्याचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक असल्याचे दिलासादायक चित्र असताना गुरूवारी एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. आता गेलेला दुसरा बळी हा चंदगड येथील कोरोना बाधित व्यक्तीचा आहे. गुरूवार २५ जून रोजी त्यांचा मृत्यु झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा हा दहावा बळी आहे. तर चंदगड तालुक्यातील पहिला बळी ठरला आहे. गुरूवारी सकाळीच कोल्हापूर शहरातील एका सराफ व्यावसायिकाचा कोरोनाने मृत्यु झाला होता.
चंदगड मधील या रूग्णाचा सकाळी मृत्यु झाला असून त्यांच्या कोरोनाचे निदान दुपारी आलेल्या रिपोर्टवरून झाले आहे. त्यामुळे कोरोना रिपोर्ट येण्याआधीच त्यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोनाची स्थिती नियंत्रणात वाटत असताना नव्याने आढळणारे रूग्ण आणि कोरोनाबाधितांचे मृत्यु यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment