Sunday, June 28, 2020

कोरोना जग @ १ कोटी पार; ५ लाखाहून जास्त मृत्यु

कोरोना जग @ १ कोटी पार; ५ लाखाहून जास्त मृत्यु


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

 जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे  एक कोटींहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 74 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 54 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 5,29,577 रुग्ण आहेत. तर 16,103 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 2,03,328 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 3,10,146 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 19,906 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 25,96,403 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1,28,152 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 13,15,941 कोरोनाबाधित आहेत तर 57,103 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर  यूकेत 43,514 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 3,10,250 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,716 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,40,136 हजार इतका आहे.


कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

अमेरिका : कोरोनाबाधित- 25,96,403, मृत्यू- 1,28,152
ब्राझिल : कोरोनाबाधित- 13,15,941, मृत्यू- 57,103
रशिया : कोरोनाबाधित- 6,27,646, मृत्यू- 8,969
भारत : कोरोनाबाधित- 5,29,577, मृत्यू- 16,103
यूके : कोरोनाबाधित- 310,250, मृत्यू- 43,514
स्पेन : कोरोनाबाधित- 295,549, मृत्यू- 28,341
पेरू : कोरोनाबाधित- 275,989, मृत्यू- 9,135
चिली : कोरोनाबाधित- 267,766, मृत्यू- 5,347
इटली : कोरोनाबाधित- 240,136, मृत्यू- 34,716
इराण : कोरोनाबाधित- 220,180, मृत्यू- 10,364

11 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण,मॅक्सिको हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...