Monday, November 18, 2024

आजरा तालुक्याचे शांत व संयमी नेतृत्व : मुकुंददादा देसाई (वाढदिवस विशेष)

आजरा तालुक्याचे शांत व संयमी नेतृत्व : मुकुंददादा देसाई (वाढदिवस विशेष)
आजरा तालुक्यातील शांत व संयमी नेतृत्व, अजातशत्रू व्यक्तिमत्व, सहकारातील अभ्यासू अशी प्रतिमा असणारे जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचा मंगळवार (दि. 19 नोव्हेंबर) रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने...
- विकास सुतार, आजरा
आजरा तालुक्याचे दिवंगत लोकनेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. बळीराम देसाई यांच्या राजकीय, साामाजिक व सहकार क्षेत्रांतील कार्याचा वसा घेऊन मुकुंददादा देसाई यांची वाटचाल सुरू आहे. जिल्हा बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर स्व. बळीराम देसाई यांच्या पश्चात जनता बँकेची धुरा ताब्यात घेऊन बँकेला मोठा नावलौकिक मिळवून दिला आहे. बँकेच्या कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सभासद व ग्राहक समाधानी कसा राहील, याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेला राज्यस्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बँकेच्या ६० वर्षांच्या इतिहासात २०२३ मध्ये बँकेची निवडणूक बिनविरोध करून नेतृत्वगुणाची चुणूक दाखविली आहे. सहकारात आपल्या कामाचा ठसा मुकुंददादा देसाई हे उमटवत असताना लोकांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काम करत असताना त्यांनी काम केले आहे. तसेच ते आजरा शेतकरी साखर कारखान्यात संचालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या राजकीय क्षेत्रात पक्ष बदलाचे वारे जोरात असताना मुकुंद दादा यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या विचारांवरील निष्ठा कधीही ढळू दिलेली नाही. त्यामुळे ते एकाच पक्षात निष्ठावान म्हणून कार्यरत आहेत. राजकीय, सहकार किंवा कोणत्याही क्षेत्रातील निर्णय घेत असताना शांत व संयमपणा ते नेहमीच दाखवित असतात. त्यामुळे शांत व सयंमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात कार्यरत असल्यामुळे मुकुंद दादा यांचे अनेकांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी कधीही मनभेद ठेवलेला नाही, त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व  अजातशत्रू बनले आहे. विविध पदांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे व्रत अंगी बाणवलेल्या नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा..!
घरीच स्वीकारणार दिवसभर शुभेच्छा.....

 जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मुकुंद दादा देसाई यांचा मंगळवार (दि. 19 नोव्हेंबर) रोजी वाढदिवस साजरा होत असतो. देसाई हे दरवर्षी आपला वाढदिवस घरीच साजरा करतात. दरवर्षी त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागलेली असते. दरवर्षीच या दिवशी उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळेच यंदा निवडणुकीची धामधूम असून सुद्धा देसाई हे मंगळवारी दिवसभर आजरा शहरातील महागाव रस्त्यावरील आपल्या घरामध्ये शुभेच्छा स्वीकारतील.
=====================

Friday, November 15, 2024

के. पी. पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले : आमदार प्रकाश आबीटकर

के. पी. पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले : आमदार प्रकाश आबीटकर 
गारगोटी, वृत्तसेवा :

राधानगरी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात केलेली विकास कामे आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळेच  मतदारांच्या उस्फूर्त लाट तयार झाली आहे. त्यामुळे के. पी. पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबीटकर यांनी कुर (ता. भुदरगड) येथील कोपरा बोलताना केले. जेष्ठ नेते बी. एस. देसाई अध्यक्षस्थानी होते.
आ. आबीटकर पुढे म्हणाले, मतदार संघात माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत कोणतीच विकासकामे न केल्यामुळे मतदार संघाची अवस्था भकास झाली होती. जिल्ह्यातील अविकसित असा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते. त्यांच्या दहा वर्षातील धुणे धुण्यात दहा वर्षे खर्ची पडली. यावरून त्यांची निष्क्रियता लक्षात येते. महिला भगिनींच्या बरोबर एखाद्या गावातील शिष्टमंडळ निधी मागणीसाठी गेले असता कपाळावर अटी पाडून त्यांना अपमानित करून तुच्छतेची वागणूक दिली जात होती. या सर्व आठवणी आज देखील कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत  असुन याचा उद्रेक त्यांचा पराभव करून मतदार संघातील स्वाभिमानी जनता अपमानाचा बदला घेईल. मागील दहा वर्षांमध्ये मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अजूनही बरीचशी कामे मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाची आहेत. मतदार संघाच्या विकासाच्या ट्रॅकवर आला आहे. पुढील काळात तुम्हा सर्वांच्या साथीने विकासाचा रथ पुढे न्यावयाचा त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.
  
 युवक नेते मदन देसाई म्हणाले, कार्यकुशल आमदार प्रकाश आबीटकर यांनी मतदारसंघात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवून मतदारसंघात हरित क्रांती केली. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आरोग्य समृद्धी आल्यामुळेच ते पाणीदार आमदार म्हणून शेतकऱ्यांच्यात परिचित असल्याचे सांगून कुर परिसरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. 2014 च्या निवडणुकीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार असून या निवडणुकीत आमदार प्रकाश आबीटकर 50 हजार पेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील. भाजपचे देवराज बारदेस्कर म्हणाले के. पी. पाटील हे चिमणी प्रेमी आहेत. त्यांनी अनेक जणांना नोकरी लावतो म्हणून सांगितले ते सगळे चिठ्ठीवर रिटायर झालेत. प्रास्ताविक बि. डी.  देसाई यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील निवासराव देसाई, प्रवीणसिंह सावंत, सुर्याजी देसाई, कल्याणराव निकम, वसंतराव प्रभावळे, धैर्यशील भोसले-सरकार, अशोकराव भांदीगरे, तात्यासो पाटील, अजीत देसाई, प्रवीण नलवडे, विक्रम पाटील, बाबासो जठार आदींसह महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निवड योग्य ठरली....
प्रकाश आबीटकर या नवतरुणाला 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत उभे केले. 2014 व 2019 साली दोन वेळा आमदारकी भूषवीत मतदार संघाचा कायापालट केला. मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास  केला त्यामुळे स्व. लेमनराव निकम, स्व. जाधव गुरूजी व मी  केलेली निवड सार्थकी लागली असल्याचे ज्येष्ठ नेते बी. एस. देसाई यांनी गौरवोद्गार काढले.
==================

Wednesday, November 13, 2024

वारं फिरलय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली : आमदार प्रकाश आबीटकर, पदयात्रेला जनतेतून वाढता प्रतिसाद; विरोधाक घायाळ

वारं फिरलय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली : आमदार प्रकाश आबीटकर, पदयात्रेला जनतेतून वाढता प्रतिसाद; विरोधाक घायाळ

कसबा तारळे, वृत्तसेवा:

पदयात्रेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून वारं फिरलय म्हणा-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विरोधक बेताल वक्तव्य करू लागले आहेत. जनताच त्यांना मतपेटीतून उत्तर देईल असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे कोपरा सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार आबीटकर म्हणाले, दोन्ही विधानसभा निवडणुकीत तारळेंकरांनी मोठं मताधिक्य दिले आहे. यामधून उतराई होणे अशक्य आहे. यापुढेही तारळे गावच्या विकासासाठी कटीबद्ध राहिन असे सांगून आ. आबीटकर म्हणाले, अभ्यास करून विकासाचा पेपर सोडविला तर राधानगरी मतदार संघाचे उदाहरण द्यावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या धर्तीवर सीएम किसान योजना, ७.५ एचपी पर्यंत मोटरपंपाना मोफत वीज, मुलींना मोफत उच्य शिक्षणाची सोय, लाडकी बहीण, वयोश्री योजना यांसारख्या विविध योजना राबवील्यामुळे समाजातील सर्व घटक समाधानी आहेत. धामणी प्रकल्पाची मुख्यमंत्री यांच्या हस्ते घळभरणी झाली यामुळे शेतकरी आनंदी आहेत. शेतकरी, तरूण, वयोश्री, विधवा, परितक्त्या या सर्व घटकांसाठी काम केले आहे. प्रचंड प्रमाणात विकास कामे केली आहेत मात्र कमी कालावधीमुळे काही कामांचे शुभारंभ करता आले नाहीत.

यावेळी भाजपचे व्हि. टी. जाधव म्हणाले, आमदार आबीटकर यांनी गटतट न पाहता काम केले. प्रत्येक माणसाचे काम केले. विरोधात असलेले लोक देतील आमदार आबीटकरांना मदत करून विकासाला बळ द्यायचे आहे असे खासगीत बोलतात. तेजस्विनी पाटील म्हणाल्या आ.आबीटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय केल्यामुळे राधानगरी व गगनबावडा परिसरातील सुमारे ५० खेड्यातील गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे. यावेळी संभाजी आरडे, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, देवराज बारदेस्कर, उमेश पाटील, सातापा कांबळे, उपसरपंच संदीप पाटील, बळवंत किरूळकर, अमर पाटील, अशोक सरनोबत, रमेश साबळे, चंद्रकांत पाटील, नितीन पोतदार आ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीधर चव्हाण यांनी केले. आभार नितीन पोतदार यांनी मानले.

उपजिल्हा रुग्णालयाची वास्तु वर्षभरात उभी राहिल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यामुळे कसबा तारळे येथील उपजिल्हा रुग्णालयास सुमारे २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वर्षभरात अद्यावत इमारत उभी राहिल असे आ. आबीटकर यांनी सांगितले.
.....................................................

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...