महागाव (प्रतिनिधी) :
वर्षभरापासून उद्योगामध्ये असलेली आर्थिक अस्थिरता त्यातच उदभवलेले कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत विद्यार्थासमोर उभा होता तो रोजगाराचा प्रश्न. या सगळ्या गोंधळावर मात करीत महागाव (ता.गडहिंग्लज )येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकनीकने विध्यार्थ्यांसाठी लॉकडाऊन काळातही म्हणजे एप्रिल व मे या दोन महिन्यात विविध पाच बहुराष्ट्रीय कंपन्याची कॅम्पस मुलाखतीचे ऑनलाईन आयोजन करुन 200 हून अधिक विद्यार्थाची निवडीमुळे कॉलेजने पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध दाखवला आहे.
यावर्षी कोरोनाच्या व्हायरसमुळे देशाच्या व उद्योगाच्या अर्थव्यवस्थेवर जरी नकारात्मक परिणाम झाला असला तरी विध्यार्थ्यांच्या नोकरीवर याचा कोणत्याही परिणाम होणार नाही असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी व कॉलेज कडून खात्रीपूर्वक सांगण्यात आले. शासनाच्या अटीनुसारच कंपन्या सुरु असणार असल्याने रोजगाराच्या आवश्यकतेनुसार येथे आँनलाईन इंटरव्हूचे आयोजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या आदेशानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्या.
यानुसार येथील विद्यार्थ्यांची खालील बहुराष्ट्रीय कंपनी निवड झाली.
(कंसातील निवड झालेले विद्यार्थी संख्या)
नेक्सटीअर ऑटोमोटिव्ह पुणे (21)
जयश्री पॉलिमर पुणे (110)
सुल्झेर इंडिया पुणे (40)
जॉन डियर इंडिया पुणे (29)
अँफेनॉल इंटरकनेक्ट पुणे (निवड जाहीर नाही)
अशाप्रमाणे विद्यार्थाची निवड झाली आहे.
याबाबत " कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच सातत्याने राबवलेले प्रकल्प आधारित अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी योजलेले अनेक उपक्रम कॉलेजची गुणवत्ता व कंपनी बरोबर असलेला सातत्यपूर्ण संपर्क या आधारे या कॉलेजने पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील तंत्रशिक्षणातील विद्यार्थीसाठी प्लेसमेंटचा आधारवड ठरला असलेची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली".
याकामी संस्थेचे चेअरमन डॉ. अॅड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ संजय चव्हाण, सचिव अॅड बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचार्य, प्लेसमेंट प्रमुख प्रा. संतोष गुरव यांच्यासह कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment