आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फ दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ३ जानेवारी रोजी सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना कोल्हापूर यांच्या 'तंदुरूस्त हृदय : निरोगी जीवन' या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरवात होणार आहे. रविवार दि. ४ जानेवारी रोजी जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ डॉ. विश्वास बापट कोल्हापूर यांचे 'वनस्पती : बहुमुल्य, बहुगुणी वरदान' या विषयावर व्याख्यान तर सोमवार दि. ५ जानेवारी रोजी मिशन ऑरगॅनिकचे संस्थापक राहुल टोपले आजरा यांचे 'नैसगिक शेती आणि विषमुक्त जीवन' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही याप्रसंगी होणार आहे. यावर्षी भूमिपुत्र साहित्यिक गौरव पुरस्कार श्री अनिल परूळेकर (गोवा), माता गौरव पुरस्कार श्रीमती सरीता समीर घेवडे (भटवाडी), उत्कृष्ठ वाचक पुरस्कार श्री गजानन भिमराव अपसंगी (चाफवडे) व बालवाचक पुरस्कार कु. कादंबरी पांडुरंग धुरी (हाळोली) यांना जाहीर झाला आहे. मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी डॉ. पूजा पराग सामंत लिखित 'द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाडमय' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समीक्षक, शिवजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे कोल्हापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार आहेत. सर्व कार्यक्रम 'मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, जूनी पोष्ट गल्ली आजरा येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहेत. या व्याख्यानमालेचा, पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळयाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Wednesday, December 31, 2025
राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना....
मुंबई, न्यूज नेटवर्क....
रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (एमओरटीएच) यांच्या मार्गदर्शनानुसार या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना ‘सडक सुरक्षा – जीवन रक्षा’ अशी असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन आयुक्त, मुंबई यांनी व्यक्त केला आहे.
=======================

श्री अंबाबाई मंदिर परिसर सुरक्षा व सोयी-सुविधांबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी....
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासोबतच भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आज, मंगळवारी मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा आणि अतिक्रमण निर्मूलनाबाबत महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात मार्गदर्शक नियमावलीची(एसओपी) योग्य अंमलबजावणी करण्याच्याही सूचना केल्या.
महानगरपालिकेमार्फत मंदिराच्या बाहेरील सर्व विनापरवाना बांधकामे तात्काळ हटवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच, मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवरील अधिकृत दुकानदारांची यादी तयार करून, त्यांना अधिकृत क्रमांक देणे आणि त्यांच्या दुकानाच्या जागेचे चिन्हांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील अतिक्रमणांना आळा बसेल. तसेच भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती व दुकानदारांमध्ये संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले. मंदिर व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक नियमावलीमध्ये सुधारणा करण्यासाठी, नव्याने आवश्यक सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन आणि श्री पूजक यांच्या संयुक्त बैठकीतून आवश्यक एसओपी तयार करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षिण प्रवेशद्वाराजवळील विद्यापीठ वाहनतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी भवानी मंडप या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे.
मंदिर सुरक्षा आढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी खालील सूचना केल्या :
• सध्याच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स (DFMD) मध्ये आवश्यक सुधारणा करून, योग्य सेटिंग्जसह त्यांचा सक्षम वापर करावा.
• बॅग स्कॅनरमधून जाणाऱ्या वस्तूंचा दैनंदिन अहवाल ठेवावा आणि प्रतिबंधित वस्तूंसाठी पारदर्शक कंटेनरची व्यवस्था करावी.
• सर्व प्रवेशद्वारांवर भाविकांसाठी सर्वसाधारण सूचना तसेच ज्वलनशील वस्तू व हत्यारे मंदिरात नेण्यास बंदी असल्याचे स्पष्ट करणारे फलक लावावेत.
• मंदिर परिसरातील विविध ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत.
• सुरक्षेच्या दृष्टीने, मंदिर परिसरात शांततेला धोका निर्माण करणारे तसेच अनावश्यक चित्रीकरण किंवा व्हिडिओ चित्रण करण्यास परवानगी देऊ नये.
गर्दीचे अचूक नियोजन करण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांचा दर तासाला आढावा घेतला जाईल. मंदिर परिसरात भाविकांसह भेट देणाऱ्या सर्व नागरिकांनी शांत व स्वच्छ वातावरण राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
नवरात्र उत्सवात गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गर्दी व्यवस्थानासाठी एआय तंत्रज्ञानाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून कायमस्वरूपी याच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात येत आहे. या कामांना गती देऊन सर्व प्रणाली तातडीने दोन महिन्यांत सुरू करावी, अशा सूचनाही मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या. या प्रकल्पाच्या अंमलबजावणींनंतर सुरक्षा व्यवस्था भक्कम होत गर्दी नियंत्रण आणि गुन्हेगारीला आळा बसेल. याचबरोबर ब्लॉकचैन आणि क्यूआर कोड प्रणाली अंतर्गत येत्या काळात प्रत्येक भाविकाची नोंद जतन केली जाणार आहे.
भाविकांना व्यवस्थापनासंबंधी काही सूचना किंवा तक्रारी मांडायच्या असल्यास त्या लेखी स्वरूपात मंदिर व्यवस्थापन कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी गर्दी नियमनासाठी जादा स्वयंसेवकांची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी, एनएसएस आणि एनसीसी यांमधील प्रशिक्षणार्थी (इंटरनशिप) विद्यार्थ्यांची निवड करून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन नेमणुका कराव्यात. या सर्व सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यावेळी पोलीस, मंदिर, महापालिका प्रशासनाचे आणि आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी उपस्थित होते.
==============================

सहकार भारती उत्कृष्ट पुरस्काराने आजऱ्याची जनता गृहतारण संस्था सन्मानित....
सहकार भारती उत्कृष्ट पुरस्काराने आजऱ्याची जनता गृहतारण संस्था सन्मानित....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेने सहकार क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने केलेला आहे "आयएसओ मानांकन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र" याबरोबरच संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. शिवाय शंभर कोटी ठेवींचा टप्पा ही पूर्ण केलेला आहे. संस्थेच्या आजपर्यंतच्या या कामाची दखल घेऊन सहकार भारतीच्या वतीने संस्थेला "सहकार भारती उत्कृष्ट संस्था" पुरस्कार सहकार भारतीचे "राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी" यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या वाटचालीतील एक सोनेरी पान आहे. यामुळे संस्थेची सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
घर बांधणी, फ्लॅट खरेदीसाठी दीड कोटी पर्यंत आणि प्लॉट खरेदीसाठी एक कोटी पर्यंत कर्ज, सोनेतारण कर्ज, ठेवतारण कर्ज, वीजबिल भरणा केंद्र त्याचबरोबर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळया आकर्षक ठेव योजना सुरू करत संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थेच्या सर्वच सात शाखांमध्ये या सेवा सभासदांसाठी उपलब्ध आहेत. विनम्र आणि तत्पर सेवेचा वसा घेत संस्थेने आजपर्यंतची वाटचाल पूर्ण केली आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन सहकार भारतीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे यांच्या हस्ते जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सौ. वैशालीताई आवाडे, जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर, श्रीकांत चौगले यांचे उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे, संचालक व गारगोटी शाखा चेअरमन आनंद चव्हाण, इचलकंरजी शाखा चेअरमन प्रकाश शिंदे, संचालक महादेव मोरुस्कर जनरल मॅनेजर मधुकर खवरे व अनिरुध्द कुंभार आदी उपस्थित होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Monday, December 29, 2025
३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी...
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क...
थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्याचे आदेश जाहीर केले आहेत. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत वर्षातील एकूण १५ दिवसांसाठी विहित मर्यादेत रात्री १२ पर्यंत सवलत देण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. यापूर्वी जिल्ह्यात १४ दिवसांची सवलत देण्यात आली होती, आता ३१ डिसेंबर शेवटचा १५ वा दिवस सवलती अंतर्गत घोषित करण्यात आला आहे.
या सवलतीबाबत प्रशासनाने काही अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकांचा वापर केवळ विहित आवाजाची मर्यादा राखूनच करता येईल. ही सवलत रुग्णालय, शैक्षणिक संस्था किंवा 'शांतता क्षेत्र' (Silence Zones) म्हणून घोषित केलेल्या परिसरासाठी लागू असणार नाही. तसेच, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक लावण्यासाठी संबंधित पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेणे नागरिकांना बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आजरा शहर व कॉलनीतील नागरी समस्यांवर मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व समर्थ कॉलनीतील रहिवासी यांच्या वतीने समर्थ कॉलनीतील व आजरा शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांचे दालनात सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत समर्थ कॉलनीतील विजय पाटील यांच्या घराशेजारील वापरात नसलेला व्हॉल्व्ह काढून टाकण्याबाबत सूचना करण्यात आली असून ती तात्काळ मान्य करण्यात आली. समर्थ कॉलनीतील तांबे यांच्या घराशेजारील गटर पाईपमुळे निर्माण झालेल्या उंचवट्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले.
रवळनाथ कॉलनीतील नागरिकांना पाणी योग्य दाबाने मिळते की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार असून, आयडीयल कॉलनीतील बंद पडलेले विद्युत बल्ब बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. शहरातील काही भागात कचरा गाडी नियमित येत नसल्याची तक्रार करण्यात आली असता, उदाहरणार्थ शिवाजीनगर शासकीय गोदामाचे पुर्वे कडील भाग, रवळनाथ कॉलनी मधील पारपोलकर गल्ली कांही तांत्रिक अडचणीमुळे येत नव्हती यापुढे वेळेवर सेवा दिली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. आवंडी वसाहतीमध्ये अमोल कोले यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत या बाबत पाणीपुरवठ्याची तात्काळ पाहणी करून योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.
सध्या शहरात एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दररोज सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली. शहरातील नवीन पाणी पुरवठा चाचणीमुळे तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यानंतर समिती सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथे भेट देऊन आयडीयल कॉलनीतील रस्ते काम तातडीने पूर्ण करण्याबाबत तसेच समर्थ कॉलनीतील गटर समस्येवर योग्य तोडगा काढण्याबाबत संबंधित अधिकारी याना सुचित केले. या बैठकीस अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष व नगरसेवक परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, रामचंद्र पंडीत यांच्यासह समर्थ कॉलनीतील विजय मोहीते, बाळकृष्ण दरी, तुकाराम पवार, विनायक उफळकर, संजय सावंत, सुभाष कांबळे, पप्या शिंदे, अभिजीत मनगुतकर, आनंदराव पाटील, श्रीपती पाटील अमोल कोले इत्यादी नागरिक उपस्थित होते.
=========================

आजऱ्याच्या जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचे प्रशिक्षण शिबीर...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
मार्च २०२५ अखेर १०० कोटी आणि आजपर्यंत १११ कोटीहून अधिक ठेवी संकलन करून जनता सहकारी गृहतारण संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. हा विश्वास वृद्धिंगत करणे आणि सातत्य राखणे ही संस्थेची जबाबदारी आहे. येथून पुढील काळात येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सदैव तयार असले पाहिजे. त्यासाठी नवनवीन उपाययोजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी अशाप्रकारच्या शिबीरांचे आयोजन गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे यांनी केले. जनता सहकारी गृहतारण संस्था मर्यादित आजराच्या नवनियुक्त संचालक मंडळासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की संस्थेची भरभराट ही संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते. गुणवत्ता निर्माण करण्याकरिता परस्परांच्या क्षमता समजून घेणे आणि विचार जाणून घेणे आवश्यक असते. तरच संस्थेची भरभराट साधता येते.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबीरात गडहिंग्लज शाखा चेअरमन शप्रकाश पोवार, कोल्हापूर शाखा चेअरमन प्रो. (डॉ.) गोपाळ गावडे, गारगोटी शाखा चेअरमन प्रा. आनंद चव्हाण, इचलकरजी शाखा चेअरमन प्रकाश शिंदे, सांगली शाखा चेअरमन प्रो. (डॉ.) संजयकुमार गायकवाड, पाटणे फाटा शाखा चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक दोरुगडे यांनी शाखा आढावा घेत. २०३० सालापर्यतचे शाखांचे नियोजनाबद्दल सविस्तर चर्चा करुन काही विधायक सूचना केल्या. पुढील पाच वर्षांमध्ये संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या व सुरू केल्या जाणाऱ्या नवनवीन गृह कर्ज योजना आणि त्या योजना बददल साकल्याने विचार करण्यात आला.
चिंतन शिबिरामध्ये शिवाजी विदयापीठ प्राचार्य असोसिएशनच्या "उपाध्यक्षपदी" निवड झाल्याबद्दल प्राचार्य, डॉ. एस. बी. भांबर, राजा शिवछत्रपती महाविदयालय महागाव च्या "प्रभारी प्राचार्यपदी" निवड झाल्याबद्दल डॉ. सुगंधा घरपणकर, सहकार भारतीच्या भुदरगड "तालुकाध्यक्ष" पदी निवडीबद्दल गारगोटी शाखेचे चेअरमन प्रा. आनंद चव्हाण आणि आजरा नगरपंचायतीच्या "नगराध्यक्ष" पदी निवड झाल्याबद्दल अशोक अण्णा चराटी व "नगरसेवक" पदी निवड झाल्याबद्दल अनिकेत चराटी यांचा शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गडहिंग्लज शाखेचे संचालक प्रा. (डॉ.) महेश कदम यांचा वाढदिवस 'केक' कापून साजरा करण्यात आला. प्रशिक्षण शिबीराचे सुत्रसंचालन प्रा. सौ. नेहा पेडणेकर यांनी ओघवत्या स्वरूपात केले. कार्यक्रमाचे आभार संचालक प्रा. आनंद चव्हाण यांनी मानले. सदरचे प्रशिक्षण शिबीर 'चाळोबा हिल्स' येथे निर्सर्गाच्या सानिध्यात यशस्वीपणे पार पडले.
===========================

चंदगड-हलकर्णी रस्त्याच्या कामासंदर्भात ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
सध्या चंदगड-हलकर्णी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे रस्ते कामाचे ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी आजरा तालुका शिवसेना शिंदे गट यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या चंदगड-हलकर्णी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाबाबत अनेक लोकप्रतिनिधींची शिवसेना शिंदे गट आजरा तालुका यांच्याकडे तक्रारी येत आहेत. कामाचा दर्जा तसेच स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे होणारे नुकसान याबाबत रस्त्याचे ठेकेदार उदासीन भूमिका घेत आहेत. संबंधित ठेकेदारा संदर्भात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या कामासंदर्भात आजतागायत अनेक तक्रारी झालेले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात यावी. या बैठकीच्या माध्यमातून समाधानकारक तोडगा काढण्यात यावा अन्यथा ठेकेदाराला पुढील काम करू देणार नसल्याचा इशारा आजरा तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख विजय थोरवत, इंद्रजीत देसाई, रणजीतकुमार सरदेसाई, दयानंद निऊंगरे, संतोष भाटले, शशिकांत सावंत, अनिल डोंगरे, महेश कामत विनोद कांबळे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.

खेडेत मंगळवारी ॐ चैतन्य सद्गुरु भर्तरीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव, हरिपाठ वाटप कार्यक्रम
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
खेडे (ता. आजरा) येथे ॐ चैतन्य सद्गुरु भर्तरीनाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मंगळवार (दि. 30) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी वारकरी संप्रदायाला हरिपाठ वाटप करण्यात येणार आहे.
मंगळवारी पुण्यतिथी उत्सवामध्ये सकाळी 8 वाजता अभिषेक व पुष्पवृष्टी, दिंडी सोहळा, हरिपाठ वाटप व महाप्रसाद वाटप होणार आहे. ह. भ. प. अशोक गौराई दाजीबा तर्डेकर (मलिग्रे ता. आजरा) यांच्या संकल्पनेतून हरिपाठ वाटप करण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन ॐ चैतन्य सद्गुरु भर्तरीनाथ महाराज मठ चॅरिटेबल ट्रस्ट खेडे यांनी केले आहे.
=============================

Saturday, December 27, 2025
दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार : गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ, गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजन सुरु
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांची दुधातील फॅट, एस.एन.एफ तपासणीचे जुने (मिल्को टेस्टर) मशीन कंपनीना बायबॅक (पुनर्खरेदी) करून नवीन दूध तपासणीचे अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेमधील सहभागी गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशीनचे वाटप आज गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. यावेळी प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी व मिल्क अॅनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाची ओळख ही दुधाच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे निर्माण झाली आहे. ही गुणवत्ता कायम राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गोकुळमार्फत सातत्याने केले जात आहे. दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेनुसार योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हाच गोकुळचा मुख्य उद्देश आहे. दूध संकलनाच्या वेळी फॅट व एसएमएफ तपासणी अचूक होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गोकुळच्या संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थांनी दूध तपासणीसाठी आधुनिक आणि विश्वासार्ह यंत्रणा वापरणे गरजेचे आहे. अनेक संस्थांकडे आजही जुनी किंवा विना वापर पडलेली फॅट तपासणी व अॅनालायझर मशीन आहेत. अशा मशीनमुळे तपासणीत अचूकता येत नाही आणि पारदर्शकतेवरही परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीची दखल घेत, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने एकमताने जुनी व विना वापर मशीन संघामार्फत नेमलेल्या पुरवठादार कंपनीना बायबॅक करून त्याऐवजी नवीन, अत्याधुनिक अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक दूध संस्थांना नवीन मशीन खरेदी करताना तीन हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार असून, तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात येणार आहे. सन १९८२ साला पासून गोकुळचा मिल्को टेस्टर विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून दूध संस्थांची दूध तपासणी मशिनस् अधिक अचूक, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. बायबॅक योजनेमुळे दूध तपासणीतील अचूकता वाढेल. गोकुळ दूध संघाची गुणवत्ता परंपरा आणखी मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल.”
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, दुग्ध व्यवसायामध्ये दूध तपासणी मशीन असो वा दूध काढणी मशीन, त्यांची स्वच्छता व नियमित देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. मशीनची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती करणे, दररोज स्वच्छ पाण्याने योग्य प्रकारे वॉशिंग करणे आवश्यक असून, त्यातूनच मशीन अधिक काळ टिकते तसेच दूध तपासणीत अचूकता मिळते. दूध संस्था कर्मचाऱ्यांनी वापरातील दूध तपासणी मशिन्सची नियमित देखभाल करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या बायबॅक योजनेमुळे प्राथमिक दूध संस्थांना निश्चितच लाभ होईल.
या योजनेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली असून जास्तीत जास्त दूध संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मिल्कोटेस्टर विभागाचे प्रमुख बाजीराव मुडूकशिवाले, डॉ.एम.पी.पाटील, प्राथमिक दूध संस्थेचे प्रतिनिधी, मिल्क अॅनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालक पाद्यपुजनाने केंद्रशाळा पेरणोलीचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
शनिवारी कुरकुंदेश्वर यात्रेच्या पुर्वसंध्येच्या निमित्ताने केंद्रशाळा विद्या मंदीर पेरणोली (ता. आजरा) शाळेत पहाटेच्या आल्हादमय वातावरणात शताद्बी महोत्सवाची पालक पाद्यपूजनाने उत्साहात सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जोशीलकर होते. प्रमुख पाहुणे उपसरपंच संकेत सावंत होते.
शाळेच्या मुलींच्या सुमधुर स्वागत गीताने व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजनाने व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शाळेचा सहभाग व मान्यवरांचे स्वागत या विषयी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या स्वागता नंतर शताब्दी संयोजन समिती सदस्य संजय मोहिते यांनी शाळा शताब्दी महोत्सवात शाळेची, पालकांची, विद्यार्थी यांची भुमिका व सहभाग याविषयी मत मांडले व शताब्दी शुभारंभ झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुजाण पालकत्व या विषयावर तानाजी पावले यांचे पालक प्रबोधनपर व्याख्यान झाले. त्यानंतर काॅ. संपत देसाई यांनी मराठी शाळा वाचवण्यासाठी पालकांची, समाजाची भुमिका, पेरणोली शाळेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात माजी शिक्षकांनी दिलेल्या संस्कार शिदोरीची आठवण करुन दिली. त्यानंतर उपस्थित पालक व मुलांचा पाद्य पुजन कार्यक्रम पडला. यावेळी महिला पालकांची उपस्थिती लक्षणिय होती.

कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शेतकरी संघटनेचे नेते तानाजी देसाई, विठ्ठल मस्कर, ग्रामपंचायत सदस्य संदिप नावलकर, सुषमा मोहिते, रुपाली पाईम, रणजित फगरे, उदय कोडक, आदेश गुरव, पत्रकार कृष्णा सावंत, पवन कालेकर, मारुती चांदेकर, अध्यापक धनाजी रावण, शिवाजी बोलके, नाईक मॅडम, नळकांडे मॅडम, शैलेश कांबळे, संभाजी कालेकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==========================
==========================
Friday, December 26, 2025
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची 30 नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु सन 2025-26 या हंगामात आजअखेर 49 दिवसात 1 लाख 55 हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याकडे दि. 16 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 अखेर गाळप झालेल्या 49 हजार 525 मे.टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन 3 हजार 400 रुपये प्रमाणे विनाकपात होणारी रक्कम 16 कोटी 83 लाख रुपये ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी दिली.
हंगाम 2025-26 मध्ये कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळप सुरू असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून त्यापासुन जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळविणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणेस प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या ऊसाची उचल करणेचे काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष, वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपूर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत. कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आणन्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई कारखान्याचे संचालक श्री. वसंतराव धुरे श्री. विष्णु केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, जिल्हा बैंक प्रतिनिधी श्री. सुधिर देसाई, संचालक श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री.रणजित देसाई, श्री. संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री.शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरुकटे, श्री.राजेश जोशीलकर, श्री.गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, श्री.संभाजी पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री. एस. के. सावंत उपस्थित होते.

आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. वसंतराव देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांना त्यांच्या 20 व्या पुण्यतिथी दिनी कारखाना कार्यस्थळावरील त्यांचे पुर्णाकृती पुतळयाचे कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री. सुभाष देसाई यांचे हस्ते पुजन करून कारखाना परिवारा तर्फे अभिवादन करणेत आले.
सन 1980 व 1990 च्या दशकात स्व. वसंतराव देसाई यांनी आपल्या निस्वार्थी सहका-यांसमवेत अथक प्रयत्न करून आजरा साखर कारखाना पुर्णत्वास आणला. आजरा तालुक्यातील गोरगरीब शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार तसेच तोडणी-वहातुक कंत्राटदार मजुर यांच्यासाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी आजरा साखर कारखाना वरदान ठरला आहे. स्व. वसंतराव देसाई यांचे या कारखान्याच्या उभारणीतील योगदान तालुक्यातील जनतेच्या कायम स्मरणात रहावे यासाठी कारखाना व्यवस्थापणाने कारखाना कार्यस्थळावर त्यांचा पुर्णकृती पुतळा उभारला असून, कारखान्यास वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना असे नांव दिलेले आहे.
शुक्रवारी त्यांच्या 20 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्य सकाळ पासून कारखान्याचे संचालक एम. के. देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, राजेश जोशिलकर, काशिनाथ तेली, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, गोविंद पाटील, हरी कांबळे व कार्यकारी संचालक संभाजी सावंत, कारखान्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
========================

दुध उत्पादनातून बेरोजगारांना स्थैर्य देवूया : सुधीर देसाई, शिरसंगीत जिल्हा बँकेचा दुध उत्पादक मेळावा
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुका दुध उत्पादनात आघाडीवर येण्यासाठी परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकरी बँकेत कर्ज योजनाच्या माध्यमातून दुध संस्था व दुध उत्पादक शेतकरी, बेरोजगार युवकाना स्थैर्य देऊया असे मत जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांनी व्यक्त केले. ते सिरसंगी (ता. आजरा) येथील हनुमान दुध संस्थेत आयोजित दुध उत्पादकांच्या मेळाव्यात बोलत होते.
आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात दुध संकलन अधिकारी एस. एम. कोले यानी दुध धंदा यशस्वी करण्यासाठी जातिवंत म्हैस खरेदीसाठी पन्नास हजार अनुदान बँकेचे दहा हजार अनूदान मिळत असून याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मेळावा आयोजित केलेचे सांगितले. बँकेचे विभागीय अधिकारी सुनिल दिवटे यांनी म्हैस कर्ज, पिक कर्जासह विविध योजनाची माहीती दिली. यावेळी तालुका संघाचे संचालक मधूकर यलगार, साखर कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर, विजय देसाई, बँक निरीक्षक आर. आर. देसाई, विजय सरदेसाई, गोकूळचे सुपरवायजर डी. जी. होलम, व्हि. बी. चव्हाण, बि. टी. धुमाळ, व्हि. व्हि. केसरकर याच्यासह दुध व विकास सेवा संस्था सचिव व पदाधिकारी उपस्थित होते. कारखाना संचालक दिगंबर देसाई यानी शासनाने प्रामाणिक कर्जदार प्रमाणे थकबाकीदाराना कर्जमाफी करावी असे मत व्यक्त करून सर्व उपस्थिताचे आभार मानले.

डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य रूपाली घाटगे, राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाने मोबाईल वापरताना जागरूक राहणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, असा सल्ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य रूपाली घाटगे यांनी दिला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी 'ग्राहक प्रबोधन स्टॉल'चे उद्घाटन करण्यात आले.
रूपाली घाटगे म्हणाल्या की, ग्राहक चळवळीमधील संघटनांचे काम उत्तम सुरू आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना ६ अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. २०१९ च्या नवीन कायद्यामुळे ग्राहक आणि ग्राहक न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली असून, ग्राहकांना जास्तीत जास्त न्याय मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. ग्राहक न्यायालय 'अंतरिम आदेश' देऊ शकते, यामुळे कोणत्याही ग्राहकावर अन्याय झाल्यास त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. त्या म्हणाल्या की, ग्राहक दिन हा केवळ एक दिवस नसून तो दररोज असला पाहिजे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काम करून ग्राहकांचे हित जोपासणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. ग्राहक हा केंद्रबिंदू मानून आपण कामकाज केले पाहिजे. पुरवठा विभाग आता पूर्णपणे ऑनलाईन झाला आहे. सर्वच सेवा ऑनलाईन देणारा राज्य शासनाचा हा एकमेव विभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ऑनलाईन कामकाजावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोकरे, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक महेश काटकर, नम्रता कुडाळकर, अक्षया पाटील, बाबासाहेब शिंदे, बीएसएनएलचे विजयानंद माने यांच्यासह ग्राहक व रेशन दुकानदार उपस्थित होते. ग्राहक पंचायतीचे बी. जे. पाटील, जगन्नाथ जोशी, जगदीश पाटील आणि अरुण यादव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन रेशन संघटनेचे रवी मोरे यांनी केले.या कार्यक्रमात कृषी, महावितरण, बँक, राज्य परिवहन विभाग, गॅस कंपनी, बीएसएनएलसह विविध शासकीय विभागांचे स्टॉल उपलब्ध होते. तसेच 'एकल प्लास्टिकचा (सिंगल युज प्लास्टिक) वापर करणार नाही', अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली.

‘गोकुळ’ दूध संघाच्या २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन....
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या २०२६ या नवीन वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे पार पडले. गोकुळ दूध संघाकडून दरवर्षी दुग्ध व्यवसायाशी संबंधित अद्ययावत माहिती तसेच संघाच्या विविध सेवा–सुविधांची माहिती असलेली दिनदर्शिका जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार प्राथमिक दूध संस्थांना वितरित केली जाते. यावर्षीची दिनदर्शिका ही विशेषतः दुग्ध व्यवसायावर आधारित असून, त्यामध्ये अद्ययावत दूध संकलन पद्धती, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, मुक्त गोटा संकल्पना, रेड्या संगोपन केंद्र, मायक्रो ट्रेनिंग सेंटर, लसीकरण, गोकुळ हर्बल पशुपूरक उत्पादने, गोकुळ सुधन सेंद्रिय खते, वंधत्व निवारण शिबिरे, महालक्ष्मी मिनरल मिक्सचर, महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन तसेच आयव्हीएफ संकल्पना यासंदर्भातील तांत्रिक व शास्त्रशुद्ध माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात, कमी खर्चात किफायतशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पानावर क्यूआर कोड देण्यात आला असून, संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यास त्या पानावरील विषयाची सविस्तर, अद्ययावत व उपयुक्त माहिती थेट दूध उत्पादकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती अधिक सुलभ व प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम असल्याचे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
या दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे छायाचित्र, गोकुळ प्रधान कार्यालयाची इमारत तसेच करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथील ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे दूध उत्पादक सौ.अनिता व श्री.बाळू शेळके यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. सदर म्हैस अकराव्या वेताची असून, तिच्याकडून प्रतिदिन सरासरी २० लिटर दूध उत्पादन घेतले जात आहे. यासोबतच गोकुळच्या विविध दुग्धजन्य उत्पादनांचे आकर्षक छायाचित्रेही या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दिनदर्शिका दूध उत्पादकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, प्राथमिक दूध संस्थांनी आपल्या सभासद दूध उत्पादकांना यातील माहिती वेळोवेळी सांगावी. कार्यक्रमात संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.साळुंके यांनी दिनदर्शिकेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी संघाचे चेअरमन यांनी संघाचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, दूध संस्था, वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
===============================

नेत्रदान चळवळीचा रविवार 28 रोजी वर्धापनदिन, डॉ. तात्याराव लहाने प्रमुख पाहुणे; नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा होणार गौरव
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
गडहिंग्लज, आजरा तालुक्यात सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीचा तेरावा वर्धापनदिन रविवार (दि.28) रोजी होणार आहे. इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतसमोर सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होईल. नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यांच्या हस्ते गेल्या वर्षभरातील 27 नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा प्रारंभ केलेल्या अत्याळसह करंबळी, बेळगुंदी, भडगाव, कौलगे, ऐनापूर, सरोळी (ता. आजरा) या गावात प्रत्यक्ष काम सुरु आहे. यासह 24 गावातून 134 लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. येथील अंकूर आय हॉस्पिटलमध्ये शासनाने मंजूर केलेल्या आय बँकत नेत्रप्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच नेत्रप्रत्यारोपनातूनही दृष्टी मिळू शकत नाही अशा अंधांसाठी कचेरी मार्गावर रोजगार केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नऊ अंधांकडून एलईडी बल्ब, लायटींग माळा, कापडी पिशव्या, आकाश कंदिल तयार केल्या जातात.

दरवर्षी राज्यभरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत चळवळीचा वर्धापनदिन कार्यक्रम होतो. यंदा नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्तितीत कार्यक्रम होणार आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांचीही उपस्थिती आहे. या कार्यक्रमात धोंडीबा कुंभार, मनोहर मगदूम, दौपदा पाटील, आक्काताई गोते, लता मगदूम (सर्व बेळगुंदी), मनोहर नांगरे, विठाबाई पाटील, नारायण कुपन्नावर, शांता गड्डी, शांताबाई घोटणे (सर्व गडहिंग्लज), शामराव गाडीवड्ड, बंडू माने, एस. आर. पाटील, सरस्वती पाटील, गंगुबाई बाटे (सर्व अत्याळ), बायाक्का रायकर, गंगुबाई कानडे (शिप्पूर तर्फ आजरा), सुशीला चव्हाण-पाटील, आप्पा केसरकर (सरोळी), सुशीला पाटील, अमृत शिंत्रे (इंचनाळ), सिताराम जाधव (करंबळी), ताराबाई कागवाडे (ऐनापूर), रत्नाबाई सावंत (कौलगे), अरविंद चव्हाण (नूल), रोहित विभुते (उत्तूर), अभिनव कांबळे (कडगाव, ता. भुदरगड) या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम करणारे डॉ. लहाने...
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील माकेगाव. लहान वयातच त्यांच्या दोन्ही किडण्या काम करीत नसल्याने आईने आपली एक किडणी त्यांना दान केली आहे. मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. हॉस्पिटलचे डीन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. डॉ. लहाने यांनी आतापर्यंत एक लाख ६२ हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा जागतिक विक्रम आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Sunday, December 21, 2025
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगणात होते. रविवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नगराध्यक्षपदी ताराराणी आघाडीचे अशोक चराटी विजयी झाले. मंजूर मुजावर यांनी अपक्ष राहूनही लक्षणीय मते घेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली. नगरसेवक पदाच्या 17 पैकी 8 जागा भाजप-शिवसेना पुरस्कृत ताराराणी आघाडी, 6 जागा महाविकास आघाडी पुरस्कृत आजरा शहर परिवर्तन विकास आघाडी, 2 जागा अन्याय निवारण समिती आघाडी तर 1 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विजय मिळविला.
जाणून घेऊया उमेदवारनिहाय मिळालेली मते...
नगराध्यक्ष पद :
बाकीयु निसार खेडेकर (अपक्ष) : बस - 112
अशोक काशिनाथ चराटी (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 4224 (विजयी)
डॉ. श्रद्धानंद तुकाराम ठाकूर (अन्याय निवारण समिती) : नारळ - 1050
नियामत जहांगीर मुजावर (अपक्ष) : हिरा - 37
मंजूर दिलावर मुजावर (अपक्ष) : कपबशी - 3496
संजय संभाजी सावंत (काँग्रेस) : हात - 2477
अश्विनी संजय चव्हाण (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 323 (विजयी)
अनसा अब्बास माणगावकर (अपक्ष) : टेबल - 02
भैरवी राजेंद्र सावंत (काँग्रेस) : हात - 133
प्रभाग दोन :
संजय लक्ष्मण इंगळे (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 121
पूजा अश्विन डोंगरे (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 481 संभाजी दत्तात्रय पाटील (शिवसेना ठाकरे गट) : मशाल - 230
प्रभाग तीन :
रहिमतबी सलीम खेडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) : तुतारी वाजवणारा माणूस - 409 (विजयी)
समीना वसीम खेडेकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 191
सुमैय्या अमित खेडेकर (काँग्रेस) : हात - 124
प्रभाग चार :
मुसासरफराज इस्माईल पटेल (काँग्रेस) : हात - 200 (विजयी)
जावेद सलाम पठाण (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 52
रशीद महमंद पठाण (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 178
नदीम मजीद मुल्ला (अपक्ष) : गॅस सिलेंडर - 53
प्रभाग पाच :
नाझिया अल्लाउद्दीन खेडेकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) : तुतारी वाजवीणारा माणूस - 65
निशात समीर चाँद (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 194 (विजयी)
जास्मिन महमंदइरफान सय्यद (काँग्रेस) : हात - 94
प्रभाग सहा :
अन्वी अनिरुद्ध केसरकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 142 (विजयी)
शाहीन फरहान तकीलदार (अपक्ष) : टेबल - 103
साधना अमोल मुरुकटे (काँग्रेस) : हात - 113
प्रभाग सात :
कलाबाई शंकर कांबळे (काँग्रेस) : हात - 407 (विजयी)
गीता नंदकुमार कांबळे (अपक्ष) : एअर कंडिशनर - 13
बालिका सचिन कांबळे (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 237
प्रभाग आठ :
सुहेल सलाम काकतीकर (अपक्ष) : पाण्याची टाकी - 338
इकबाल इब्राहिम शेख (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 410
असिफ मुनाफ सोनेखान (काँग्रेस) : हात - 490 (विजयी)
प्रभाग नऊ :
रेश्मा नौशाद बुड्डेखान (काँग्रेस) : हात - 841 (विजयी)
यास्मिन कुदरतुल्ला लतीफ (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 188
प्रभाग दहा :
आनंदा शंकर कुंभार (अपक्ष) : टेबल - 191
लहू सदाशिव कोरवी (अपक्ष) : बॅट - 07
सिंकदर इस्माईल दरवाजकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 297
निसार सबदारअली लाडजी (काँग्रेस) : हात - 356 (विजयी)
प्रभाग अकरा :
डॉ. स्मिता सुधीर कुंभार (परळकर) (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 233 (विजयी)
गीता संजय सावंत (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 221
आरती दीपक हरणे (काँग्रेस) : हात - 97
प्रभाग बारा :
समीर विश्वनाथ गुंजाटी (काँग्रेस) : हात - 236
अनिकेत अशोक चराटी (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 404 (विजयी)
समीर बशीर तकीलदार (अपक्ष) : कपाट - 05
दत्तराज (गौरव) दिंगबर देशपांडे : (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 85
दिलशाद मुस्ताक पटेल (अपक्ष) : बॅट -114
प्रभाग तेरा :
रवींद्र भीमराव पारपोलकर (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 343
परेश कृष्णाजी पोतदार (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 444 (विजयी)
प्रभाग चौदा :
सिद्धेश विलास नाईक (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 161
सूर्यकांत नामदेव नार्वेकर (अपक्ष) : रोड रोलर - 44
अभिषेक जयंवत शिंपी (काँग्रेस) : हात - 174 (विजयी)
प्रभाग पंधरा :
परशराम बैजू बामणे (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 377 (विजयी)
शैलेश नारायण सावंत (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 251
प्रभाग सोळा :
अश्विनी विजय कांबळे (अपक्ष) : टेबल - 30
रेश्मा आदम खलीफ (अपक्ष) : कपाट - 53
आसावरी महेश खेडेकर (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 183 (विजयी)
संगीता रमेश चंदनवाले (अपक्ष) : गॅस सिलेंडर - 120
बानू खुदबू तळगुळे (अपक्ष) : सफरचंद - 111
श्रुती सुरज पाटील (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 49
मीनाक्षी संतोष पुजारी (शिवसेना ठाकरे गट) : मशाल - 118
प्रभाग सतरा :
सरिता अमोल गावडे ( राष्ट्रवादी शरद पवार गट) : तुतारी वाजविणारा माणूस - 257
स्नेहल किरण निकम (अपक्ष) : गॅस सिलेंडर -08
आरती अभिजीत मनगुतकर (अन्याय निवारण समिती) : एअर कंडिशनर - 29
पूनम किरण लिचम (ताराराणी आघाडी) : शिट्टी - 309 (विजयी)
( अधिकृत आकडेवारी अजून जाहीर व्हायचे आहे त्यामुळे आकडेवारीत बदल होऊ शकतो)

प्रभाग एक :

Subscribe to:
Posts (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...