Thursday, March 25, 2021

गोकुळसाठी पहिल्याच दिवशी सात जणांचे बारा अर्ज दाखल


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

 पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघाची म्हणजेच 'गोकुळ'ची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. आज पहिल्याच दिवशी 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 1 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी महिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमास सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी मान्यता दिल्यानंतर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. 20 एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे. 2 मे रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.सत्तारुढ गटासमोर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मिळून जाहीर केलेल्या राजर्षी शाहू आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. 


आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नाव पुढीलप्रमाणे :

1) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (सर्वसाधारण)
2) अरुण गणपतराव डोंगळे (सर्वसाधारण)
3) शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सर्वसाधारण)
4) अजित शशिकांत नरके (सर्वसाधारण)
5) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (इतर मागासवर्गीय)
6 ) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (सर्वसाधारण)
7) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (इतर मागासवर्गीय)
8) महाबळेश्वर शंकर चौगुले(सर्वसाधारण)
9) बाळासो उर्फ वसंत नानु खाडे (सर्वसाधारण)
10)बाबासाहेब श्रीपती चौगले (सर्वसाधारण)
11) बाबासाहेब श्रीपती चौगले (सर्वसाधारण)
12) महाबळेश्वर शंकर चौगुले (सर्वसाधारण)

यामध्ये 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज आज पहिल्याच दिवशी दाखल केले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Tuesday, March 23, 2021

गोकुळसाठी २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : 

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान होत आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या कार्यक्रमाची आज घोषणा केली. कालच (22) हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्राधिकरणाकडे पाठवला होता. गुरूवारपासून (25) या निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने प्रशासकीय पातळीबरोबर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'गोकुळ' ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील अंतिम मतदार यादीचा महत्त्वाचा टप्पा 12 मार्च रोजी पूर्ण झाला. त्यानंतर या निवडणुकीसाठी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नावडकर यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाचा आराखडा तयार केला होता. काल ( 22) हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सहकार प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्राधिकरणाने आज या कार्यक्रमाला मंजुरी दिली. गुरूवारपासून (25) या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारीची प्रक्रिया नावडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात होणार आहे. मतदान आणि मतमोजणीचे ठिकाण अद्याप निश्‍चित झाले नसून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या दोन्ही जागांचा शोध घेण्यात येणार आहे. 

निवडणूक कार्यक्रम असा :

25 माचे ते 1 एप्रिल - उमेदवारी अर्ज भरणे 
5 एप्रिल - उमेदवारी अर्जाची छाननी 
6 एप्रिल - वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द 
6 ते 20 एप्रिल - उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 
22 एप्रिल - उमेदवारांना चिन्हांचे वाटप 
2 मे - मतदान 
4 मे - मतमोजणी 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Sunday, March 7, 2021

महागावात एस. जी. एम. शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धा


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात स्व. यशवंतराव चव्हाण जन्मदिनानिमित्य १२ मार्च रोजी जिल्हास्तरीय एस. जी. एम. शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आला आहे. ही स्पर्धा निशुल्क असून इ. ८ वी ते १२ वी वर्गातील शालेय विद्यार्थानी आँनलाईन नावनोदंणी करण्याचे आवाहन प्राचार्य डाॕ. संजय दाभोळे यांनी केले आहे.

कोरोना महामारीच्या कारणामुळे प्राथमिक फेरी (दि.१०) रोजी आँनलाईन माध्यमाद्वारे होणार आहे. तर निवडक विद्यार्थाची (दि.१२) रोजी प्रत्यक्ष उपस्थितीत काँलेज कँपस मध्ये होणार आहे. यासाठी  यशवंतराव चव्हाण यांचे कार्य ; शोध आणि बोध, तंत्रज्ञान काळाची गरज, कोरोना नको ना! आणि शोध आनंदी आरोग्य जिवनाचा या विषयावर स्पर्धा होणार आहे. विजेत्याना आकर्षक बक्षिसासह सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थानी 9 मार्च दुपारी दोन पर्यंत https://forms.gle/z6mGhbxMt2pvzXUT7 या लिंक वर नावे नोंवावीत अधिक माहितीसाठी 9970572883 या क्रमांकावर माहिती घ्यावी असे आवाहन केले आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Saturday, March 6, 2021

"संत गजानन" मध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. सकाळी साडेदहा ते चार यावेळेत लसीकरण सुरु असणार असून या विभागातील सर्व साठ वर्षावरील तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील व्याधिग्रस्त व्यक्तींनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केला आहे.

 नुकताच या केंद्रावरील लसीकरणाचा शुभारंभ संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण यांना लस देऊन करण्यात आला. नागरीकांनी लसीकरणाला येताना नावनोदंणी बरोबरच वयाचा पुरावा असलेला कागदोपत्र आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Friday, March 5, 2021

अभिषेक डोंगळे यांचा आजरा तालुका संपर्क दौरा


आजरा (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्हा दुध संघ (गोकुळ) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे सुपुत्र व युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी आजरा तालुक्यात संपर्क दौरा केला. आजरा तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडी वस्त्यांवरील दूध संस्था प्रतिनिधी ठरावधारकांची त्यांनी भेट घेतली. अरूण डोंगळे यांनी गोकुळ दुध संघांच्या हितासाठी, गावागावातील दुधसंस्थांच्या प्रगतीसाठी तसेच प्रत्येक दूध उत्पादकाच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहीती ते देत आहेत. तसेच आगामी गोकूळ दुध संघाच्या निवडणूकीत पाठीशी राहण्याचे ते आवाहन करीत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुकुंद पाटील, अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, सदाशिव पाटील हे दौर्‍यात सहभागी झाले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...