Sunday, April 26, 2026
महापुरुषांनी दिलेले आदर्श आणि विचार आत्मसात करण्याची गरज : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सरोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
महामानवांच्या जयंती आणि पुण्यतिथींचे कार्यक्रम केवळ उत्सव म्हणून साजरे करून चालणार नाहीत. त्यांनी दिलेले आदर्श आणि विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. महामानवांनी उभी हयात केलेले संघर्ष आठवणीत ठेवून त्याप्रमाणे आपल्या जीवनात आचरण करण्याचीही गरज असल्याचेही, ते म्हणाले. सरोळी (ता. आजरा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे आणि डॉ. बाबासाहेबांचे फार मोठे ऋणानुबंध होते. त्यांनी पदवी घेतल्याचे समजताच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः मुंबईत जाऊन त्यांची भेट घेतली. बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. ते सहकार्य स्वीकारण्याचीही त्यांनी विनंती केली. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब यांनी करवीरला येण्याचे आणि माणगावमध्ये परिषदेला मार्गदर्शन करण्याचीही विनंतीही, राजर्षी शाहू महाराज यांनी केली. त्यावेळी अस्पृश्यता टोकाला गेली होती आणि त्याबद्दलची प्रचंड चिड राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात होती. महाडच्या चवदार तळे आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशाने त्यांनी संपूर्ण जगाला माणसामाणसात अस्पृश्यता राहिलेली नाही, असा संदेश दिला.
यावेळी जिल्हा परिषद राष्ट्रवादी गटनेते सुधीरभाऊ देसाई, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, एम. के. देसाई, दीपक देसाई, राजू मुरकुटे, संजय गाडे, जितेंद्र कांबळे, दिनकर कांबळे, मधुकर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
=========================
Saturday, April 25, 2026
परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत असून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील पात्र विद्यार्थ्यांकडून विविध शाखा व अभ्यासक्रमांसाठी एकूण ७५ जागांसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या शिष्यवृत्ती संदर्भातील शासन निर्णय, अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच पात्रतेच्या अटी-शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी
https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in
आणि https://dirobbwd.maharashtra.gov.in
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्यासाठी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून सर्व कागदपत्रे ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सादर करावीत. तसेच अर्जाची छापील प्रत आवश्यक स्वहस्ताक्षरीत (Self Attested) कागदपत्रांसह दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे (आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे – ४११००६) येथे जमा करणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही,अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.
=======================
Thursday, April 23, 2026
कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सोहळा; 'मोगरा फुलला' कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमांची मांदियाळी सुरू आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या रसिकांसाठी ‘मोगरा फुलला’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: सोमवार, २७ एप्रिल २०२६
वेळ: सायंकाळी ६ वाजता
स्थळ: गोविंदराव टेंबे सभागृह, देवळ क्लब, कोल्हापूर.
प्रवेश विनामूल्य
“ज्ञानीयांचा राजा मोगरा फुलला” हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक जीवनचरित्रावर आधारित आहे. या कार्यक्रमात निरूपणकार गणेश शिंदे माऊलींच्या जीवनातील निवडक आणि प्रेरणादायी प्रसंग आपल्या ओघवत्या भाषेत उलगडून दाखवतील. या निरूपणाला सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांच्या गायनाची साथ लाभणार असून, अभंग, भजन, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्तीचा मोगरा रसिकांच्या मनात दरवळणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि त्यांचे कार्य केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न राहता ते नव्या पिढीपर्यंत, विशेषतः तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कोल्हापूर परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना आणि भाविकांना या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
========================
आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी महादेव हेब्बाळकर तर व्हा. चेअरमनपदी संभाजी तांबेकर यांची निवड...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड पार पडली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे होते. चेअरमन पदी महादेव जोतिबा हेब्बाळकर तर व्हा. चेअरमन पदी संभाजी मारुती तांबेकर यांची निवड झाली.
चेअरमन पदासाठी हेब्बाळकर यांचे नाव माजी चेअरमन महादेव दत्तात्रेय पाटील यांनी सुचवले त्यास विठ्ठलराव रामराव देसाई यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी तांबेकर यांचे नाव दौलती अंतू पाटील यांनी सुचवले. त्याला मधुकर कृष्णा देसाई यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर शुभेच्छापर महादेव पाटील, अल्बर्ट डिसोजा, डी. ए. पाटील, एम. के. देसाई तसेच सत्ताधारी आघाडीचे प्रमुख सुधीर भाऊ देसाई यांनी आपली शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन महादेव हेब्बाळकर व व्हा. चेअरमन संभाजीराव तांबेकर यांनी स्व. राजारामबापू देसाई यांनी हा संघ जोपासला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचा कारभार करणार असल्याची ग्वाही दिली. आभार गणपतराव सांगले यांनी मांडले. चेअरमन निवडी प्रसंगी ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई, राजाराम पाटील, राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, उदयराज पवार, मधुकर यलगार, ज्ञानदेव पवार, सुनील देसाई, रवींद्र होडगे, जोतिबा चाळके, संजय उत्तूरकर, गणपती कांबळे, महेश पाटील, भाऊसाहेब किल्लेदार उपस्थित होते.
======================
Wednesday, April 22, 2026
कोल्हापूर जिल्ह्यात 'जनगणना २०२७' अंतर्गत १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना 'स्वयंगणना' करण्याची सुविधा
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते. जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या जनगणनेतील माहितीचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले
जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. या पोर्टलवर १४ विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. १६ मे नंतर जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सूक्ष्म प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तहसिल कार्यालये, १३ नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि १२५७ महसूल गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रातील जनगणनेसाठी ४९९९ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, तळागाळात जाऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०५४ प्रगणक आणि ९९५ पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावर व क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक आणि प्रत्यक्ष कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यंदाची जनगणना कागदविरहित आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी 'हाऊजलिस्ट ॲप' (HLO) वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली जिल्ह्यातील नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. जनगणना ही केवळ एक आकडेवारी नसून ती देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा आणि लोककल्याणकारी योजनांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार १ मे ते १५ मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच, प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची प्रामाणिक, अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी व जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
============================
देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते. जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या जनगणनेतील माहितीचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले
जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. या पोर्टलवर १४ विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. १६ मे नंतर जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सूक्ष्म प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तहसिल कार्यालये, १३ नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि १२५७ महसूल गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रातील जनगणनेसाठी ४९९९ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, तळागाळात जाऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०५४ प्रगणक आणि ९९५ पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावर व क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक आणि प्रत्यक्ष कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यंदाची जनगणना कागदविरहित आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी 'हाऊजलिस्ट ॲप' (HLO) वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली जिल्ह्यातील नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. जनगणना ही केवळ एक आकडेवारी नसून ती देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा आणि लोककल्याणकारी योजनांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार १ मे ते १५ मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच, प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची प्रामाणिक, अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी व जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
============================
भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती.....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा येथे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण २ मे रोजी डॉ भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार असून यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पुरस्कार व स्मारक समितीच्या वतीने कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली. लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे केंद्रीय नेते असून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विद्यार्थी दशेपासूनच डॉ. कांगो हे डाव्या चळवळीत सक्रिय राहिले आहेत. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर डाव्या चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय त्यांनी केला. आयुष्यभर कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी ते संघर्ष करीत आले आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची जबाबदारी समर्थपणे पेलल्यामुळे पक्षाने त्यांना केंद्रीय सचिव मंडळात घेत चार राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. डॉ. भालचंद्र कांगो हे ज्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत, त्याच पक्षात लोकशाहीर गव्हाणकर यांनी आपले आयुष्य घालवले आहे. सातत्याने कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या लढयात ते अग्रभागी राहिले आहेत. आपल्या शाहिरीने कामगार कष्टकऱ्यांच्या वेदना दुःख मांडत त्यांच्या मुक्तीची गाणे शाहीर गात राहिले. एक अभ्यासू कॉम्रेड म्हणून त्यांची पक्षांमध्ये नोंद घेतली जात होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवण्यात आपले वैचारिक योगदान दिले आहे त्याचप्रमाणे भालचंद्र कांगो हेही कष्टकरी, कामगारांच्या लढ्याबरोबरच डाव्या चळवळीत तरुणांना घडवण्यात पुढाकारात राहिले आहेत. म्हणूनच त्यांच्या हस्ते हा पुरस्कार संभाजी भगत यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.
लोकशाहीर गव्हाणकर हे महागोंड या गावचे असून वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात हे गाव येते. दोन वर्षांपूर्वी वाहरू सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करताना ना. हसन मुश्रीफ यांनी लोकशाहीर गव्हाणकरांच्या गावी उचित स्मारक उभा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे जाहीर केले होते. त्यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे. यावेळी जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, समितीचे सचिव सुनील पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, मीना मंगळूरकर, युवराज पवार, कॉ. संजय तरडेकर, पुष्पलता घोळसे, कृष्णा सावंत, काशिनाथ मोरे, रोहित शेंडे, रवींद्र भाटले, संजय घाडगे, रणजित कालेकर, विक्रम देसाई, अमित सामंत यांच्यासह कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकशाही द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समिती नोंदणी करण्याचा निर्णय करण्यात आला.
===========================
Monday, April 20, 2026
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीमालाची वेळेवर वाहतूक आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' प्रभावीपणे राबवावी. केवळ मार्गदर्शक तत्त्वे देऊन चालणार नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत यंत्रणेला विश्वासात घेऊन ही योजना कोल्हापूर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ति कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले व सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या धडाडीच्या निर्णयामुळे या योजनेला बळकटी मिळाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे सवलतीचे निर्णय घेतले आहेत. रस्त्यासाठी लागणारा गाळ, मुरूम आणि दगडावर आता कोणतेही रॉयल्टी (स्वामित्व शुल्क) आकारले जाणार नाही. तसेच, भूमि अभिलेख विभागामार्फत मोजणी मोफत केली जाईल आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. जमिनीचे संपादन केवळ नोंदणीकृत दानपत्राद्वारे स्वेच्छेने दिलेल्या जागेवरच केले जाईल. या सवलतींमुळे कामाचा खर्च आणि वेळ वाचणार असून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या मात्र सरकारी दफ्तरी नोंद नसलेल्या रस्त्यांच्या नोंदी घेण्याची सूचना केली. या कामांसाठी जिल्हास्तरीय समितीने जेसीबी, पोकलेन यांसारख्या यंत्रसामग्रीचे तासाचे दर निश्चित केले असून १५ वा वित्त आयोग, आमदार/खासदार निधी आणि सीएसआर (CSR) मधून निधीचे नियोजन केले आहे. जलद अंमलबजावणी आणि समन्वित रचनेच्या माध्यमातून यांत्रिककरणासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ही योजना 'मिशन मोड'वर राबवून लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
==========================
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीमालाची वेळेवर वाहतूक आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' प्रभावीपणे राबवावी. केवळ मार्गदर्शक तत्त्वे देऊन चालणार नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत यंत्रणेला विश्वासात घेऊन ही योजना कोल्हापूर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ति कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले व सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या धडाडीच्या निर्णयामुळे या योजनेला बळकटी मिळाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे सवलतीचे निर्णय घेतले आहेत. रस्त्यासाठी लागणारा गाळ, मुरूम आणि दगडावर आता कोणतेही रॉयल्टी (स्वामित्व शुल्क) आकारले जाणार नाही. तसेच, भूमि अभिलेख विभागामार्फत मोजणी मोफत केली जाईल आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. जमिनीचे संपादन केवळ नोंदणीकृत दानपत्राद्वारे स्वेच्छेने दिलेल्या जागेवरच केले जाईल. या सवलतींमुळे कामाचा खर्च आणि वेळ वाचणार असून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या मात्र सरकारी दफ्तरी नोंद नसलेल्या रस्त्यांच्या नोंदी घेण्याची सूचना केली. या कामांसाठी जिल्हास्तरीय समितीने जेसीबी, पोकलेन यांसारख्या यंत्रसामग्रीचे तासाचे दर निश्चित केले असून १५ वा वित्त आयोग, आमदार/खासदार निधी आणि सीएसआर (CSR) मधून निधीचे नियोजन केले आहे. जलद अंमलबजावणी आणि समन्वित रचनेच्या माध्यमातून यांत्रिककरणासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ही योजना 'मिशन मोड'वर राबवून लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
==========================
Saturday, April 18, 2026
‘गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारी, उलाढाल ४१०० कोटींवर; उच्चांकी दूध दरवाढीसह, २० लाख लिटर संकलनाचा टप्पा पार, गुंतवणुकीतही लक्षणीय वाढ : गोकुळ दूध संघ चेअरमन नविद मुश्रीफ
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गेल्या पाच वर्षांतील संघाच्या सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. राज्य व जिल्ह्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन, लाखो दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, कर्मचारी, वितरक, वाहतूकदार व प्रसार माध्यमांचे सहकार्य यामुळे गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक दूरदृष्टी पूर्ण निर्णय प्रभावीपणे राबवले असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत गोकुळने दूध खरेदी दरामध्ये ऐतिहासिक वाढ केली आहे. सन २०२०-२१ साली म्हैशीच्या दुधासाठी ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ.प्रमाणात करिता रुपये ३९ प्रतिलिटर असलेला दूध खरेदी दर वाढून रुपये ५३.५० प्रतिलिटर करण्यात आला आहे. तसेच गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. प्रमाणात करिता रुपये २६ प्रतिलिटर असलेला दूध खरेदी दर वाढून रुपये ३६ प्रतिलिटर करण्यात आला आहे. म्हणजेच अनुक्रमे रु. १४ व रु. १० प्रतिलिटर दरवाढ देण्यात आली असून ही दरवाढ संघाच्या इतिहासातील उच्चांकी मानली जाते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
संघाच्या आर्थिक प्रगतीतही मोठी झेप दिसून येते. सन २०२०-२१ मध्ये सुमारे रु. २५५१ कोटी इतकी असलेली वार्षिक उलाढाल सन २०२५-२६ मध्ये वाढून रु. ४१०० कोटींवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल रु.१५४९ कोटींची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच संघाच्या गुंतवणुकीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०२०-२१ मध्ये रु. ३२२ कोटी असलेली गुंतवणूक सध्या वाढून रु. ५९४ कोटींवर पोहोचली असून यात तब्बल रु. २७२ कोटींची वाढ झाली आहे. या वाढीमुळे संघाची आर्थिक घडी अधिक मजबूत झाली असून दूध उत्पादकांना अधिक चांगला दर देण्याची क्षमता वाढली आहे. दूध संकलनाच्या बाबतीत गोकुळने लक्षणीय प्रगती केली आहे. सध्या दूध संस्थांमार्फत साडेपाच लाखांहून अधिक दूध उत्पादक संघाशी जोडले गेले आहेत. सन २०२०-२१ मध्ये प्रतिदिन सरासरी १२ लाख २२ हजार लिटर असलेले दूध संकलन वाढून सन २०२५-२६ मध्ये १६ लाख २० हजार लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय अलीकडील काळात २० लाख लिटर संकलनाचा टप्पाही यशस्वीरित्या पार करण्यात आला आहे. दूध विक्रीतही सातत्याने वाढ होत असून ११ लाख ४२ हजार लिटरवरून १५ लाख ५६ हजार लिटरपर्यंत वाढ झाली आहे. रमजान ईदच्या दिवशी २५.४१ लाख लिटर विक्रीचा उच्चांक नोंदवण्यात आला.
गोकुळने दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क, टेट्रा पॅक मँगो लस्सी, मसाले ताक, कोल्हापुरी पेढा, चीज, गुलाबजाम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोकुळ आईस्क्रीम यांसारखी नवीन उत्पादने बाजारात आणण्यात आली आहेत. पुणे व मुंबई बाजारपेठेत विक्रीत वाढ झाली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. जातिवंत म्हैस खरेदीसाठी रु. ५०,००० अनुदान, वासरू संगोपन, वैरण व बियाणे अनुदान, इमारत अनुदानात वाढ, पशुखाद्य अनुदान तसेच संस्था व्यवस्थापन खर्चात वाढ देण्यात आली आहे. सचिव कमिशनमध्ये प्रति लिटर १० पैशांची वाढ व संस्था हाताळणी खर्चात प्रति लिटर २० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मिल्क टेस्टर व मिल्क अनालायझर मशिन बायबॅक योजना राबवून संस्थांना आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान’ विमा योजना राबवण्यात आली असून या योजनेअंतर्गत रु. २ लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. वार्षिक रु.१५० प्रीमियमपैकी ३० टक्के रक्कम संघाकडून अनुदान म्हणून दिली जाते. तसेच बायोगॅस योजना व हवामानावर आधारित पॅरामेट्रिक विमा योजना राबवून महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे. गोकुळने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून खर्चात मोठी बचत साधली आहे. नवी मुंबई (वाशी) येथील दुग्धशाळा विस्तार व आधुनिकीकरणामुळे दरवर्षी सुमारे रु.१२ कोटी पॅकिंग खर्चाची बचत होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे उभारलेल्या ६.५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी रु. ६ कोटी वीज खर्चात बचत होत आहे. वाशी येथील दही प्रकल्पामुळे सुमारे रु. ३.५० कोटींची बचत होत आहे. तसेच मुडशिंगी पशुखाद्य कारखान्यातील ३२५ केडब्ल्यू सौर प्रकल्पातून दरवर्षी रु ४० लाख बचत होत आहे. बिद्री (बोरवडे) चिलिंग सेंटर रेफ्रिजरेशन विस्तारामुळे रु.२६ लाख बचत व दूध हाताळणी क्षमतेत वाढ झाली आहे, तर वाशीतील रेफ्रिजरेशन अपग्रेडेशनमुळे रु. ६० लाखांची बचत होत आहे. संघाच्या स्वमालकीच्या पेट्रोल पंप प्रकल्पातून एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रु. ९७.३२ लाखांचा नफा मिळाला असून BPCL कडून सन्मानही प्राप्त झाला आहे. पशुखाद्य व पशुपूरक योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ पशुखाद्य, हर्बल पशुपूरक प्रकल्प, मोफत फर्टीमिन प्लस योजना, ‘महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन’ यांसारख्या उपक्रमांद्वारे जनावरांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. हर्बल प्रकल्पांतर्गत १ लाख ५६ हजार जनावरांवर उपचार करून रु. १.३० कोटींची औषधे मोफत देण्यात आली आहेत. फर्टीमिन प्लस योजनेतून रु.१६ ते १७ कोटी अनुदान देण्यात आले आहे. तसेच पशुखाद्य दरात प्रति पोते रु. ५० अनुदान देऊन रु. ५.६३ कोटींचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादकांना जातिवंत जनावरे उपलब्ध करून देण्यासाठी केर्ली ता.करवीर व लिंगनूर ता.गडहिंग्लज येथे जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेअंतर्गत ७,८९१ बायोगॅस युनिट्स कार्यान्वित करण्यात आले असून रु.२६.२२ कोटींचे अनुदान दूध उत्पादकांना वितरित करण्यात आले आहे. तसेच हवामानातील बदलामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीमार्फत पॅरामेट्रिक विमा योजना राबवण्यात आली असून प्रती जनावर रु.२३६ प्रीमियममध्ये वार्षिक रु.२० हजारांचे संरक्षण दिले जात आहे.
भविष्यातील योजनांमध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार सिताफळ, अंजीर व गुलकंद बासुंदी तसेच आईस्क्रीमचे नवीन प्रकार बाजारात आणण्याचा मानस आहे. नवी मुंबई (वाशी) व पुणे येथे विस्तार, हायस्पीड पॅकिंग मशिन, शिरोळ सॅटेलाईट डेअरीचे आधुनिकीकरण, CNG पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी, ‘आयडीयल TMR’ (मिश्रित चारा) उत्पादन तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ५०० जनावरांचे संगोपन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. आयव्हीएफ व सेक्स सिमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च वंशावळ जनावरांची पैदास करण्यावरही भर दिला जाणार आहे. गेल्या ६३ वर्षांच्या परंपरेत गोकुळने सहकाराच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात धवल क्रांतीची गौरवशाली वाटचाल घडवली आहे. दूध उत्पादक, दूध संस्था, संघ कर्मचारी, अधिकारी, ग्राहक, वितरक तसेच सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका सर्व संचालक मंडळानी घेतली असून गेल्या पाच वर्षांतील निर्णयांमुळे दूध उत्पादकांचा थेट आर्थिक फायदा, उत्पादनाची गुणवत्ता, खर्चातील बचत आणि बाजारपेठेतील गोकुळची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. भविष्यातही दूध उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून संघाची प्रगती अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
============================
Friday, April 17, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा : आमदार अमल महाडिक
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेत पाणंद रस्त्यांचे आराखडे निश्चित करा, शासकीय जागेवरील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या हद्दी व सीमा निश्चित करुन तात्काळ अतिक्रमण हटवा त्याचबरोबर पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन असे वर्गीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समिती अध्यक्ष तथा आमदार अमल महाडिक यांनी दिल्या. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृह येथे पार पडली. या बैठकीस सदस्य सचिव प्रातांधिकारी मोसमी चौगुले, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर, करवीर तहसिलदार स्वप्निल पवार, गटविकास अधिकारी डॉ. संदिप भंडारी, करवीर उपअधीक्षक भूमी अभिलेख किरण माने, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता विलास तराळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले उपस्थित होते.
आमदार महाडिक म्हणाले, एका गावातून दुसऱ्या गावाला जोडणाऱ्या व गाव नकाशावर नोंद असलेल्या पाणंद रस्त्यांना प्राधान्याने खुली करणे, रस्ता मजबुतीकरण करणे अनुषंगाने ग्रामपंचायत यांच्याकडून पाणंद रस्ता मजबुतीकरणाबाबत आराखडे तात्काळ उपलब्ध करुन घेण्याबाबत समिती अध्यक्ष तथा आमदार अमल महाडिक यांनी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्थानिक स्तरावर बैठक घेऊन कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. ते म्हणाले, एकूण 25 कि.मी. याप्रमाणे क्लस्टर तयार करून त्याचे अंदाजपत्रक सादर करावा, जिल्हास्तरीय समितीकडून प्रति कि.मी. दर निश्चित झाल्यानंतर विधानसभा क्षेत्रासाठी ठेकेदार यांचे पॅनल निश्चित करण्याबाबत कार्यवाही करावी, यासाठी आवश्यक असणारा निधीची माहिती सादर करण्याबाबत सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण विहित कार्यपद्धतीनुसार करुन योजनेसाठी CSR (Corporate Social Responsibility) निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी स्वतंत्र खाते सुरु करा व अभिसरणातून निधीची उपलब्धता करुन देण्याबाबत तसेच 5 प्रगतशील शेतकऱ्यांची नियुक्त या समितीवर करण्याबाबत सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या.
========================
कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी ठिकठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहत्तर, कोल्हापूर आरटीओ संजीव भोर, कार्यकारी अभियंता पुणे प्रदेश नागेश कुलकर्णी, विभाग नियंत्रक कोल्हापूर अभय देशमुख, विभागीय अभियंता कोल्हापूर सुरेश मोहिते यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर विभागात एकूण २३ बस स्थानके आहेत आणि त्यापैकी तब्बल १७ बस स्थानकांचे नूतनीकरण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले. उर्वरित स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात सर्व बसस्थानके नव्याने उभारलेला, अत्याधुनिक कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरणार आहे असे प्रतिपादन परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यकाळात या विभागासाठी चांगले काम झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोफत प्रवास हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले. कर्मचारी, प्रवासी यांच्याबाबत चांगले निर्णय घेतले. त्यातून राज्यात एसटी फायद्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. आता पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवून बदल व्हावा, जिल्ह्याला नवीन गाड्या वाढवून मिळाव्यात, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी ७ एकर जागेत असणाऱ्या संभाजीनगर बस स्थानकावर 117 बसेस ये-जा करतात त्यामुळे या ठिकाणी अधिक महत्व प्राप्त झाले असल्याचे सांगितले.
संभाजीनगर येथील बसस्थानकाचे उपकामासह नवीन बांधकाम अत्याधुनिक संकल्पनेतून पूर्ण. या प्रकल्पास २३ डिसेंबर २०२० रोजी ९ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, तर प्रत्यक्ष निविदा रक्कम ७ कोटी २० लाख इतकी आहे. एकूण २८,३०० चौ.मी. जागेपैकी १८१३ चौ.मी. क्षेत्रफळावर हे भव्य बसस्थानक साकारण्यात आले असून, प्रवाशांच्या सुलभतेसाठी येथे एकूण ११ फलाटांची सोय करण्यात आली आहे. या नूतन बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विविध विभागांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालाय, स्थानक प्रमुख कार्यालय, पास व आरक्षण कक्ष आणि ४ दुकान गाळ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मातांसाठी हिरकणी कक्ष आणि गरजूंसाठी स्वस्त दरात औषधे मिळण्यासाठी जनऔषधी केंद्राचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी, उपाहारगृह, पार्सल कार्यालय आणि पिण्याच्या पाण्याची दर्जेदार व्यवस्था येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाठार बसस्थानक येथे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांनी मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद सभापती शितल यादव, सरपंच सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. वाठार येथे ४ फलाट आणि ४०५ चौ.मी. क्षेत्रफळाचे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानंतर पेठवडगाव बसस्थानकावर नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. १.४४ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या स्थानकात ५ सुसज्ज फलाट आणि ४७९ चौ.मी.चे प्रशस्त बांधकाम करण्यात आले असून, यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. जयसिंगपूर बसस्थानकाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार यड्रावकर यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. नागरिकांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या भागात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेता, त्यांनी अतिरिक्त दोन मजल्यांच्या कामाला मंजुरी दिली. तसेच याच वर्षी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले. जयसिंगपूरच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात आता एकूण ८ फलाट, १७ दुकान गाळे आणि पोलीस चौकी अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासन भविष्यातील गरजा ओळखून सर्वच बसस्थानकांचे आधुनिकीकरण करत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास दादा पाटील, जिल्हा परिषद सभापती श्रद्धाताई गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=========================
Thursday, April 16, 2026
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन सीईओ डॉ. जास्मिन व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सरपंच परिषदेतर्फे स्वागत, गावगाड्याच्या प्रश्नांवर साधला संवाद
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जास्मिन यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. त्यानिमित्त सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) च्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ व स्वागत पत्र देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच, जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्ष व विविध समिती सभापतींचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय राजवट संपून जिल्हा परिषदेवर लोकनियुक्त पदाधिकारी विराजमान झाल्याबद्दल सरपंच परिषदेने आनंद व्यक्त केला. यामध्ये शिल्पा शशिकांत खोत (अध्यक्षा, कोल्हापूर जिल्हा परिषद), तानाजी कृष्णात पाटील (उपाध्यक्ष), सारिका यशवंत नांदेकर (सभापती, बांधकाम व आरोग्य समिती), शितल प्रवीण यादव (सभापती, शिक्षण व अर्थ समिती), श्रद्धा अविनाश गायकवाड (सभापती, समाजकल्याण समिती), विद्या विलास पाटील (सभापती, महिला व बालकल्याण समिती) यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील अनेक तांत्रिक प्रश्न प्रलंबित होते. आता जबाबदार कारभारी मिळाल्याने ग्रामीण विकासाला आणि गावगाड्याला खऱ्या अर्थाने गती मिळेल. 'सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच' हे सरपंच परिषदेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.
या स्वागत समारंभाचे औचित्य साधून सरपंच परिषदेने जिल्ह्यातील महत्त्वाच्या समस्यांकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले:
१. स्वामित्व योजना: गावठाण क्षेत्राच्या ड्रोन सर्वेक्षणात अनेक त्रुटी राहिल्याने ग्रामपंचायतींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, ही योजना दोषमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
२. प्रदूषण व पिण्याचे पाणी: औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
३. प्रशासकीय रिक्त पदे: प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र 'ग्राम विकास अधिकारी' नसल्याने कामाचा बोजा वाढून सरपंचांना रोषाला सामोरे जावे लागते.
प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस यांनी सरपंचांच्या विविध मागण्यांचा ठराव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवण्याची विनंती केली.
जिल्ह्यातील सरपंच वणवा निर्मूलन, वृक्ष लागवड, शाळांमध्ये सीसीटीव्ही, सेंद्रिय शेती आणि प्लास्टिक निर्मूलन यांसारखे उपक्रम राबवून गावे शाश्वततेकडे नेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच परिषदेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या राणीताई पाटील, प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस, जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्या जोत्स्ना पाटील (कुडित्रे), अभिजित पाटील (सडोली), समाधान म्हातुगडे (सोनाळी), प्रभाकर पाटील (चंद्रे), बबन शिंदे (डोणवडे), युवराज पाटील (कुडित्रे), दयानंद कांबळे (तुरंबे) यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==========================
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कोल्हापूर जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, या विकास आराखड्यांतर्गत जी कामे सुरू आहेत, ती अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत; तसेच सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घेण्यात यावे. ज्योतिबा मंदिर परिसरात अतिक्रमण आहे का, तसेच त्या ठिकाणी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे का, याची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गुरव यांनी येत्या 16 मे पासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत दोन बैठका झाल्या असल्याची माहिती करवीरच्या प्रांताधिकारी श्रीमती बर्डे-चौगुले यांनी या बैठकीत दिली. जिल्हाधिकारी राठोड यांनी यावेळी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. या बैठकीसाठी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मस्कर तसेच आर्किटेक्ट रेवा पेठे यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================
कोल्हापूर जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, या विकास आराखड्यांतर्गत जी कामे सुरू आहेत, ती अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत; तसेच सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घेण्यात यावे. ज्योतिबा मंदिर परिसरात अतिक्रमण आहे का, तसेच त्या ठिकाणी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे का, याची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गुरव यांनी येत्या 16 मे पासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत दोन बैठका झाल्या असल्याची माहिती करवीरच्या प्रांताधिकारी श्रीमती बर्डे-चौगुले यांनी या बैठकीत दिली. जिल्हाधिकारी राठोड यांनी यावेळी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. या बैठकीसाठी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मस्कर तसेच आर्किटेक्ट रेवा पेठे यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================
Wednesday, April 15, 2026
रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कोल्हापुरात राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIC) आणि संलग्न रुग्णालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मंत्री आबिटकर यांनी ईएसआय योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विशेषतः रुग्णांना उपचार देताना उद्भवणारे प्रशासकीय अडथळे, प्रलंबित देयकांचे प्रश्न आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देतानाच, त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर त्वरित उपाययोजना करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कामगारांना आरोग्य सेवा देताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
विमाधारक कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज नव्याने पात्र ठरलेल्या २५ रुग्णालयांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी ६२ रुग्णालये संलग्न होती, आता या नवीन २५ रुग्णालयांच्या समावेशामुळे ही संख्या ८७ झाली आहे. या विस्तारामुळे कामगारांना आता अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये 'कॅशलेस' आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रामुख्याने गंभीर आजारांवरील उपचारांसाठी कामगारांना आता स्थानिक स्तरावरच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार असून, यामुळे त्यांची आरोग्य सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे. या बैठकीला कोल्हापूरचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी यांनी विभागाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी संचालक डॉ. अशोक थोरात, प्रशासन अधिकारी डॉ. घोंडगे, बाळासो जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
============================
आजरेकरांना गुरुवारी शिर्डीच्या साई बाबांच्या पादुकांच्या दर्शनाचा योग...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
शिर्डीच्या श्री साई बाबांच्या पादुकांचे आगमन आजरा शहरात गुरुवारी होणार आहे. या पादुका अभिषेक जयवंतराव शिंपी यांच्या "पारिजात" निवासस्थान गोठण गल्ली आजरा येथे गुरुवार दि. 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 2 पर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अभिषेक शिंपी यांनी केले आहे.
===========================
हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमली आजरा शहर, विराट हिंदू संमेलनात जनसागराचा महापूर...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा येथील श्री शिवतीर्थ परिसरात सकल हिंदू समाज, आजरा आयोजित करण्यात आलेल्या 'विराट हिंदू संमेलना' त शेकडो हिंदू बांधवांनी उपस्थिती दर्शवत शक्तीप्रदर्शन केले. "एकता आणि धर्मरक्षण" या मुख्य उद्देशाने आयोजित या संमेलनात संपूर्ण पंचक्रोशीतून जनसागराचा महापूर लोटला होता. भगव्या ध्वजांनी आणि 'जय श्रीराम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. संमेलनाची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता भव्य शोभायात्रेने व्यंकटराव हायस्कूल पासून झाली. पारंपारिक वेशभूषेतील बालचमु, वारकरी सांप्रदाय, ब्रम्हकुमरिज यांचा लक्ष्मी- नारायण रथ, लेझिम पथक हे या यात्रेचे मुख्य आकर्षण होते.
कार्यक्रमापू्वी श्री शिवतीर्थ, आजरा येथील अश्वारूढ मूर्तीस श्री महंत सिद्धेश्वर स्वामीजी, नुल ता. गडहिंग्लज येथील रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगीरी महाराज, रा. स्व. संघाचे प्रचारक युवराजजी कुलकर्णी व योगी संतोष ऊर्फ बाळ महाराज यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. दरम्यान सव्यसाची गुरुकुलम् वेंगरुळ च्या कोदंडधारी युद्धकला प्रशिक्षण वर्ग यांच्यातर्फे युद्धकलेचे प्रात्यक्षिक झाले. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन झाले.त्यानंतर भारत माता प्रतिमापूजन आणि शिवरायांचे मूर्ती पूजन झाले. प्रथमत: गडहिंग्लज येथील बेलबाग आश्रमचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेमधून धार्मिक आशीर्वचन केले स्वामीजी म्हणाले, "कितीतरी परकीय आक्रमणानंतरही आपला देश हा अभिमानानं उभा आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे, परंतु स्वधर्माच्या रक्षणासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे. जात-पात विसरून आपण केवळ 'हिंदू' म्हणून एकत्र यायला हवे."
त्यानंतर रा. स्व. संघाचा इतिहास आणि संघाची कार्यपद्धती याच्यावर विस्तृत भाषण युवराज कुलकर्णी यांनी केले. पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध, नागरी कर्तव्य आणि सामाजिक समरसता
या पंच परिवर्तनावर मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर नुल येथील रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराजांनी आपल्या संत परंपरेचा आढावा घेतला. उपस्थित सर्व हिंदूंचे आणि एकूणच कार्यक्रम आयोजित करणाऱ्या स्वयंसेवकांचेही कौतुक केले. मुख्य वक्ते बाळ महाराज, इचलकरंजी यांनी बोलत असताना हिंदू म्हणून आता आपल्याला अधिक डोळसपणे जगाव लागेल. यापूर्वी फार विश्वासाने आपण समोरच्यावर विसंबुन राहत होतो
असं न करता आता पदोपदी सावधानतेने जगावे लागेल अशा पद्धतीचा विचार उदाहरणांच्या सहित उपस्थितांना सांगितला. अभिषेक रोडगी यांनी आभार व्यक्त केले. आणि सामुदायिक वंदे मातरम गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन प्रा डॉ.अशोक बाचुळकर यांनी केले.
नंतर उपस्थित सर्वांसाठी प्रसादाची ही व्यवस्था करण्यात आली होती.संमेलनाला झालेली प्रचंड गर्दी पाहता स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सांभाळली. कोणताही अनुचित प्रकार न घडता हे संमेलन शांततेत पार पडले. या संमेलनामुळे संपूर्ण शहरात हिंदुत्वाचे चैतन्य पसरले असून, आगामी काळात अशा स्वरूपाचे उपक्रम गावपातळीवर राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. यावेळी सकल हिंदू समाज आजराचे रमेश सुतार, ललित कांबळे, जांभळे गुरुजी, तानाजी बुरुड, नागराज रायकर यांसह वीविध हिंदुत्ववादी संघटना, सर्व तरुण मंडळे, ब्रम्हाकुमारिजचे भाई व बेहेनजी तसेच,हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
============================
वेळवट्टी येथे विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
वेळवट्टी (ता. आजरा) येथे विठ्ठल रुक्माई मंदिर जिर्णोद्धारासाठी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून दहा लाख रुपये उपलब्ध झाले होते. त्याचा उदघाटन सोहळा जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
स्वागत व प्रास्तावीकात ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत देसाई यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या अंदाजे 2 कोटी 12लाख रुपये विकासकामांची तसेच भविष्यातील नियोजित विकासकामांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषनात अर्जुन आबिटकर यांनी भविष्यात देखील निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच आरोग्यमंत्री यांचे या गावावरील प्रेम सदैव असेच राहील असे आश्वस्थ केले. रुपचंद्र गावडे यांनी आपल्या मनोगतात वारकरी सांप्रदायचा आढावा दिला. जितेंद्र पोवार यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित वारकरी सांप्रदाईक मंडळ अध्यक्ष मधुकर गावडे व इतर मान्यवरांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, साळगाव सरपंच धनंजय पाटील, संतोष भाटले, काका देसाई, शनिल महागावकर, सरपंच मारुती पोवार, ग्रामपंचायत सदस्य शामराव पोवार, सुनंदा कुंभार, रेश्मा गावडे, मनीषा देसाई, इंजिनिअर अनिकेत शिंत्रे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
=======================
Tuesday, April 14, 2026
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क...
महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग, श्री साळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली. समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या. याप्रसंगी माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाने आपले सादरीकरण केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींनी "जागर संविधानाचा" हे पथनाट्य सादर केले तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, राजीव आवळे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, डी. जी. भास्कर यांच्यासह इतर हजारो भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मध्यवर्ती संयोजन समितीने चोख व्यवस्था ठेवली तसेच विविध कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.
========================
महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग, श्री साळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली. समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या. याप्रसंगी माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाने आपले सादरीकरण केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींनी "जागर संविधानाचा" हे पथनाट्य सादर केले तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, राजीव आवळे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, डी. जी. भास्कर यांच्यासह इतर हजारो भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मध्यवर्ती संयोजन समितीने चोख व्यवस्था ठेवली तसेच विविध कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.
========================
आजऱ्यात जयभीम तरुण मंडळामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जयभीम तरुण मंडळ सिद्धार्थ नगर आजरा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक चराटी, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाला नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, आसावरी खेडेकर, नगरसेवक निसार लाडजी, परेश पोतदार, परशुराम बामणे, डॉ. इंद्रजीत देसाई, आजरा अर्बन बँक संचालक विजयकुमार पाटील, सिद्धेश नाईक, माजी उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख विजय थोरवत, सामाजिक कार्यकर्ते संतोष भाटले, गौरव देशपांडे, सुनील देसाई, दिनकर जाधव, मिनिन बारदेस्कर, सचिन कांबळे, दीपक कांबळे, नितीन यादव, अभिजीत शिंदे, सुभाष कांबळे, अक्षय माळी यांच्यासह जयभीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
======================
‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकास कक्ष कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक डॉ. सुजित मिणचेकर व संचालक मंडळाच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती-धर्मांना एकत्रित ठेवण्याचे कार्य केले. सामाजिक न्याय, दलित हक्क तसेच भारतीय संविधान निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश करून त्यांनी देशाच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले, तर आभार डॉ. दयानंद काळे यांनी केले. या कार्यक्रमास गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. दयावर्धन कामत, संकलन सहा. व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. एम. पी. पाटील, एस. आर. पाटील, अशोक पुणेकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
===========================
Sunday, April 12, 2026
संगीत क्षेत्रातलं नक्षत्र हरपलं, सूरसम्राज्ञी' आशा भोसले यांचे निधन
मुंबई, न्यूज नेटवर्क....
भारतीय संगीत क्षेत्रातील 'सूरसम्राज्ञी' आशा भोसले यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांना शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीतविश्वावर, सिनेइंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, कधीही न भरून होणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसले यांच्यावर सोमवारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
दरम्यान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं काल रात्री त्यांच्या तब्येतीसंदर्भात इन्स्टाग्रामद्वारे अधिकृत माहिती दिली होती, आशा आजीला अती थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळं रुग्णालयात दाखल केलं आहे. असं तिनं सांगितलं होतं. मात्र आजची सकाळ आशाताईंच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी घेऊन आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकार आणि श्वसनाच्या गुंतागुंतीमुळं आशाताईंची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचारादरम्यान 'मल्टी-ऑर्गन फेल्युअर' झाल्यानं आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांचं पार्थिव सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्यांच्या लोअर परेल इथल्या 'कासा ग्रांडे' निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वयाच्या ९२ व्या वर्षीही आशा भोसले यांचा उत्साह दांडगा होता. तब्बल ८ दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं. २० हून अधिक भाषांमध्ये १२,५०० हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण सह अनेक मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. त्यांनी ८ दशकांहून अधिक काळ आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं.त्यामुळं या संगीत क्षेत्रातलं नक्षत्र हरपल्याची भावना व्यक्त होतेय.
===========================
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत 16 एप्रिल पासून सभासद व टनेज साखर वाटप
आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने नुकताच निर्णय घेवून कारखान्याकडे रू.15 हजार शेअर्स रक्कम पुर्ण असणा-या अ व ब वर्ग सभासदांना प्रत्येकी 50 किलो साखर, शेअर्स पोटी रु.10 हजार जमा असलेल्या सभासदांना प्रत्येकी 25 किलो तर शेअर्स रक्कम रू.7 हजार जमा असणा-या सभासदांना प्रत्येकी 15 किलो साखर त्याचप्रमाणे कारखान्याच्या सन 2025-26 गळीत हंगामात गळीतासाठी ऊस पुरवठा केलेल्या ऊस पुरवठादारांना प्रतिटन अर्धा किलो साखर प्रति किलो रु 25 प्रमाणे सवलतीच्या दरात दि.16 एप्रिल 2026 ते दि. 15 मे 2026 या कालावधीत वाटप केली जाणार आहे. पात्र सभासदांनी साखर कार्ड घेणेसाठी व ऊस पुरवठादारांनी टनेज साखर उचल करतांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स त्यावर सही करून देणे अत्यावश्यक आहे.
यामधील सभासद साखर व कार्यक्षेत्रातील टनेज साखर आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या तालुक्यातील संबंधीत शाखा मधुन वाटप केली जाईल तर गेटकेनची गडहिंग्लज, चंदगड, कर्नाटक, आंबोली, गारगोटी मधुन आलेल्या ऊसाची टनेज साखर कारखाना कार्यस्थळावरून वाटप केली जाणार आहे. आजरा साखर कारखान्याकडे अपुरी शेअर्स रक्कम असलेल्या मंजुर सभासदांनी साखर वाटप कालावधीत अपुर्ण शेअर्स रक्कम भरून घेणेची व्यवस्था कारखान्याच्या संबंधित शेती सेंटर ऑफिसमध्ये केलेली आहे. कृपया आपली शेअर्स रक्कम रू.15 हजार, रु.10 हजार किंवा कमीत कमी रू.7 हजार पुर्ण करून कारखान्याचे धोरणाप्रमाणे साखर वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. अनिल फडके, कारखान्याचे संचालक श्री. वसंतराव धुरे श्री. विष्णु केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधिर देसाई, संचालक श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री.दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री. संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरूकटे, श्री. राजेश जोशीलकर, श्री. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, श्री. संभाजी दत्तात्रय पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री. हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री.एस.के. सावंत व अधिकारी उपस्थित होते.
===========================
Saturday, April 11, 2026
अशोकअण्णा-सुधीरभाऊ एकत्र आलाय; एकत्रच रहा, आजरा सूतगिरणीवरील कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले मत, कार्यक्रम रंगला राजकीय टोलेबाजीत....
आजरा, विकास न्यूज नेटवर्क......
अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीच्या 25 हजार चात्यांच्या मशिनरीच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई हे राजकीय मतभेद असलेले दोघेजण एकत्र आले आहेत. आजरा तालुक्याच्या विकासासाठी यापुढेही दोघांनी एकत्रच राहावे. सोबतीला आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांना घ्यावे असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. 25 हजार चात्यांच्या पूजन प्रसंगी उपस्थित सर्वच राजकीय नेत्यांनी केलेल्या टोलेबाजीने वातावरणात रंगत आली. याच वेळी मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या पुढील संचालक मंडळात अशोकअण्णा व सुधीरभाऊ हे दोघेही संचालक असतील असे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात आजरा तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.
अण्णाभाऊ आजरा तालुका सूतगिरणी मध्ये 25 हजार चात्यांचा प्रकल्पाच्या मशनरींचे पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुधीरभाऊ देसाई, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वच मान्यवरांनी केलेल्या भाषणात राजकीय टोलेबाजी पहावयास मिळाली. पहिल्यांदा अशोक चराटी यांनी आपल्या भाषणात अर्जुन आबिटकर यांनी केलेल्या सहकार्यामुळेच सुधीर देसाई हे जिल्हा परिषदेला सदस्य झाल्याचे सांगितले. त्यावर बोलताना सुधीर देसाई म्हणाले, मला जिल्हा परिषद सदस्य करण्यामध्ये अर्जुन आबिटकर यांचा हातभार तर आहेच त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे. याबद्दल बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजरा तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार उभे करून अर्जुन आबिटकर यांना शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष करायचा होता की तालुक्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यासाठी हातभार लावायचा होता हे अद्यापही कळले नाही. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, सध्या वस्त्रोद्योगासाठी अडचणीचा काळ आहे. तरीही अबिटकर बंधूंनी भुदरगड तालुक्यात सुतगिरणी उभा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. तालुक्यातील अगोदरच असलेली माजी आमदार के. पी. पाटील यांनी सूतगिरणी चांगली चालवली आहे. आता मंत्री आबिटकर उभा करत असलेली सूतगिरणी चांगली चालते का हे बघायचे आहे. हाच धागा पकडत मंत्री मुश्रीफ म्हणाले, भुदरगड तालुक्यातील आजी-माजी आमदारांमध्ये अशोक स्वामी यांनी इर्षा निर्माण केली आहे. मात्र दोघांच्याही सूतगिरणी व्यवस्थित चालतील. मंत्री मुश्रीफ आपल्या भाषणात म्हणाले, अशोक चराटी यांच्यासोबत काही मतभेद झाले होते. आता आम्ही दोघे एकत्र आहोत. अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांच्याशी संघर्ष केला, त्या समरजीत घाटगे, संजय बाबा घाटगे यांना सोबत घेऊन कागलच्या विकासासाठी वाटचाल सुरू आहे. जर आबिटकर बंधूंनी इच्छा व्यक्त केली तर माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा या एक्सप्रेस मध्ये सहभागी होतील. अशोक चराटी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मदत केली, त्यामुळे आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी विशेष लक्ष घातलं नाही. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळीच अशोक चराटी व सुधीर देसाई एकत्र यावेत अशी इच्छा होती. याकरता मुकुंद देसाई यांनी पुढाकार घेऊन युती करावी अशी सूचना दिली होती. मात्र दुर्दैवाने मुकुंद देसाई आजारी पडल्यामुळे ती युती आकाराला आली नाही. नाहीतर सध्या आजरा तालुक्यातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना? अशोकअण्णा व सुधीरभाऊ एकत्र आले आहेत. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आगामी काळात एकत्रच राहावे. मुकुंद दादा यांना सोबतीला घ्यावे. तसेच सुधीर देसाई व अर्जुन आबिटकर यांची मैत्री देखील कायम राहू, अशी सदिच्छा दिली. त्याचबरोबर राजकारण व निवडणूका होतच राहतील पण तब्येतीची काळजी राखून काम करा असा सल्ला अशोक चराटी यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
==============================
Friday, April 10, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानास उपस्थित राहण्याबाबत आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.....
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीनिमित्त मंगळवार 14 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी जेष्ठ पत्रकार मधु कांबळे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक लोकशाही किती पाऊले पुढे किती मागे? या विषयावर व्याख्यान होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव गजानन गुरव हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. करवीरवासीयांनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
===============================
विरोधक आजरा शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत; नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
आजरा नगरपंचायतीमधील सत्ताधारी आघाडी आजरा शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. विविध कामांचा आपण स्वतः नगराध्यक्ष व नगरसेवक सक्षमपणे पाठपुरावा करत आहोत. मात्र एखादे काम सुरू होण्याच्या अगोदर आंदोलनाचा इशारा देऊन आपल्या पाठपुरावामुळेच कामे सुरू होत असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. कोणतेही काम किंवा प्रश्न एका दिवसात मार्गी लागत नसून त्यासाठी सत्ताधारी आघाडीतील नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अनेक दिवसापासूनचे प्रयत्न कारणीभूत ठरतात. त्यामुळे आजरा नगरपंचायतीतील विरोधी नगरसेवक केवळ प्रसिद्धीचे ढोंग करून आजरा शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत, असा घणाघात नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी सत्ताधारी आघाडीतील नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष चराटी पुढे म्हणाले, विरोधी मंडळी आपणच काम करून आणले असा दिखावा करत आहेत. त्यांच्याकडून नगरपंचायत च्या कारभारात हस्तक्षेप वाढत चालला आहे. अधिकाऱ्यांच्यावर अरेरावी सुरू आहे. यापूर्वी शहरात अधिकारी नव्हते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला अधिकारी मिळाले आहेत. विरोधकांच्या अरेरावीमुळे अधिकारी जर गेले, तर पुन्हा अधिकारी मिळणे कठीण होऊन बसेल. शहरात सध्या सुरू असलेली विकास कामे मागील सभागृहाची आहेत. त्याचे सर्व श्रेय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना आहे. आत्ता मंत्री आबिटकर यांना पत्रे देऊन फोटो काढून विरोधक प्रसिद्धीचे ढोंग करत आहेत. शहराच्या विकासाबाबत शहरवासीयांना विश्वास असल्यामुळेच माझ्या आघाडीकडे सत्ता देऊन मला नगराध्यक्ष केले आहे. आम्ही कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करत आहोत. पाणी, रस्ते व कचरा या प्रश्नांची बऱ्यापैकी सोडवणूक केली आहे. निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगराध्यक्षांना वगळून विकास कामांचे नारळ फोडायचे हे योग्य आहे का? अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्नाची सोडवणूक होऊ शकते. गतसभागृहात आम्ही समझोता एक्सप्रेसने काम करीत शहराचा विकास साधला आहे, सध्याची विरोधक शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. यातून शहराचीच बदनामी होत आहे. त्यामुळे भांडत बसण्यापेक्षा समन्वयातून शहराचा विकास साधू या असेही नगराध्यक्ष चराटी म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेवक परेश पोतदार, अनिकेत चराटी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, निशाद चाँद, आसावरी खेडेकर, पूनम लिचम, बाळ केसरकर, संजय चव्हाण, समीर चाँद, आरिफ खेडेकर, महेश खेडेकर उपस्थित होते.
**************************************
Subscribe to:
Posts (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...