मुंबई, न्यूज नेटवर्क
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे ३८ व्या वर्षी निधन झाले आहे. कर्करोगाशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
या अभिनेत्रीने आजवर अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करीत एक वेगळी निर्माण केली होती. ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर ‘तू तिथं मी’, ‘चार दिवस सासूचे’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मालिकांमध्ये तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत तिने वर्षा ही भूमिका साकारली होती. त्याबरोबरच तिच्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील भूमिकेचेदेखील मोठे कौतुक झाले होते. तसेच, तिने ‘बडे अच्छे लगते है’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘साथ निभाना साथिया’ या मालिकांमध्येदेखील काम केले होते. मराठी हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती.
===================
Sunday, August 31, 2025
Saturday, August 30, 2025
दूध उत्पादकांच्या श्रमामुळे ‘गोकुळ’ची प्रगती : गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ; गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा संपन्न
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आनंद पॅलेस मंगल कार्यालय, शेळेवाडी (ता. राधानगरी) येथे संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
सभेत मार्गदर्शन करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळची यावर्षीची वार्षिक उलाढाल ४ हजार कोटी इतकी झाली असून ५१२ कोटीच्या ठेवी झाल्या आहेत. हे यश दूध उत्पादकांच्या श्रमांमुळे शक्य झाले आहे. आज दूध उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अमूल दूध संघानंतर गोकुळ दूध संघाचे नाव विशेष सन्मानाने घेतले जाते. गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून भविष्यातही हे प्रयत्न अधिक प्रमाणात राबविण्यात येतील. संघाने २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून, म्हैस दूध वाढीसाठी संघामार्फत विविध सेवा व सुविधा राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी घ्यावा, असे आवाहन केले. तसेच यामुळे म्हैस दुधाचे प्रमाण आणखी वाढेल व दूध उत्पादकांना चांगला फायदा मिळेल. संघामार्फत येत्या काळात रेडी टू इट या प्रकारचा ओली व सुकी वैरण निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहोत. यामुळे जनावरांच्या पोषणाचा प्रश्न सुटेल आणि दूध उत्पादनात वाढ होईल. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना १ रुपयामधील ८२ पैसे थेट दूध उत्पादकांच्या हाती देतो. त्यामुळे गोकुळ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा संघ आहे.
यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ ने नेहमीच दूध व्यवसायाला चालना देण्याचे काम केले असून गेल्या चार वर्षात अनेक सभासद हिताचे निर्णय घेतला आहे. राधानगरी तालुक्यातून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम योजना प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. संचालक अभिजित तायशेटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. तसेच ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले व संचालक राजेंद्र मोरे यांनी आभार मानले.
संपर्क सभेत दूध संस्था प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ केलेबद्दल, इमारत अनुदान वाढ तसेच संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहानात वाढ केल्याबद्दल तसेच उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, अधिकारी तसेच राधानगरी तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
================

आजऱ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार 1 सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देणेसाठी आजरा तालुक्यातील सकल मराठा समाजाचे वतीने आजरा तहसिल कार्यालया समोर सोमवार (दि. 1 सप्टेंबर) रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणामध्ये आजरा तालुक्यातील मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी केले आहे.

संवेदना फाऊंडेशन आजरा आयोजित महारक्तदान शिबिर व रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे महारक्तदान शिबिर व रानभाजी पाककृती स्पर्धा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.
संवेदना संजीवनी टीम वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १६० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांचा संवेदना फाऊंडेशनतर्फे विशेष टी-शर्ट देऊन गौरव करण्यात आला. हे शिबिर संजीवनी ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सौजन्याने झाले. या उपक्रमासाठी डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. सुरजीत पांडव , संजय हरेर, संवेदना संजिवनी टीम सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
याच वेळी संवेदना निसर्गमित्र टीम वतीने रानभाजी महोत्सव व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.धनाजी राणे यांनी ही स्पर्धा रानात उगवणाऱ्या भाजीपाल्यांच्या पोषणमूल्य व औषधी उपयोगांचा गौरव करण्यासाठी आयोजित केली आहे असे सांगितले. या महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर व महिला शक्ती टीम यांच्या हस्ते झाले. डॉ. बाचुळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की "मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहारात ऋतुमानानुसार रानभाज्यांचा समावेश केला पाहिजे." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय अण्णाप्पा पाटील होते.
या स्पर्धेत ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. नव कृष्णा व्हॅली स्कूल उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी रानभाजी रोपांचे माहितीपर प्रदर्शन मांडून उपस्थितांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत शुभांगी राणे, नंदा सदाशिव सावंत, प्रियांका मोहन पायरेकर, मीरा गंगाराम हरेर, विमल दशरथ कसेकर यांनी अनुक्रमे यश मिळवले. तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार वर्षा कृष्णा होडगे, सरिता बाळासाहेब पाटील व सुगंधा परशराम हरळकर यांना प्रदान करण्यात आले. विजेत्यांना गृहोपयोगी भेटवस्तू सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तर सर्व सहभागींना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आजऱ्याचे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज, तालुका कृषी अधिकारी भुषण पाटील, पंडित दीनदयाळ विद्यालयाचे प्राचार्य संजीव देसाई, नव कृष्णा व्हॅली उत्तूरचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रानभाजी, कंदमुळे अभ्यासक मोहन माने, अॅड. एम. ए. पाटील, ढवळ, धनश्री देसाई व शुभांगी निर्मळे यांनी परिश्रम घेतले. तसेच पारितोषिकासाठी योगेश शिंदे, श्रीकांत कळसकर, पांडुरंग पाटील, संजय भोसले व मॅक्वीन फर्नांडिस यांनी सहकार्य केले. पं. दीनदयाळ विद्यालय आजराचा सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संवेदना निसर्गमित्र टीमचे गिरीधर रेडेकर, अमोल रेडेकर, महेश पाटील, सिद्धेश गिलबिले, रमेश सावंत, युवराज पाटील,अमर पाटील,अश्विन हरेर, तानाजी खाडे, श्रीतेज कवळेकर, अरूण घाटगे, फिलीप राॅड्रींक्स, गिताताई पोतदार सह सर्व संवेदना सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवेदना फाऊंडेशनचे सचिव संतराम केसरकर यांनी केले. आभार गिरीधर रेडेकर यांनी मानले.
======================

Friday, August 29, 2025
व्यंकटराव प्रशालेमध्ये कै. अमृतरावजी देसाई (काका) यांच्या पुण्यदिनानिमित्त अभिवादन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा येथे संस्थेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष पद भूषविलेले तसेच आजऱ्याच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्तृत्व व्यक्तिमत्व कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते त्यांच्या तैलचित्र प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जयवंतराव शिंपी म्हणाले, कै. अमृतराव (काका) यांनी आजऱ्याच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी आजरा राईस मिल, जनता बँक, तालुका संघ उभारला तसेच आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजरा साखर कारखान्याच्या उभारणीचेही स्वप्न पाहिले. अशा त्यांच्या अनेक कार्यकर्तृत्वांचा आढावा घेतला. संस्थान काळापासून आजरा येथे जाहीगिरदार घोरपडे सरकारांनी इचलकरंजी बरोबरच आजरा तालुक्यातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या व्यंकटराव हायस्कूल या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करत आजच्या या शाळेत आपण सर्व संचालक आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण त्याचबरोबर ॲकॅडमीचे वर्गही नवीन उभारलेल्या तीन मजली इमारतीच्या एकाच छताखाली सुरू केले आहे.
याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे सचिवअभिषेक शिंपी, संचालक कृष्णा पटेकर, पांडुरंग जाधव, सचिन शिंपी, सुधीर जाधव, विलास पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य सी. एस. पन्हाळकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले. आभार डी. आर. पाटील यांनी मानले.
=================

आजरा तालुक्यात शिवसेना सभासद नोंदणीला प्रारंभ; फॉर्मसाठी पालकमंत्री आबिटकर यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार आजरा तालुक्यात शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीचा शुभारंभ कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत व आजरा तालुका प्रमुख संजय पाटील यांचे हस्ते करणेत आली.
याप्रसंगी आजरा जिल्हा परिषद संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, आजरा उपतालुका प्रमुख काकासो देसाई, आत्मा कमीटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, माजी ग्राम पंचायत सदस्य दयानंद निऊंगरे, युवराज पाटील, सुनिल दिवेकर, रणजीत सरदेसाई, विजय कोंडुस्कर व इतर पदाधीकारी उपस्थीत होते. याप्रसंगी तालुका प्रमुख संजय पाटील म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणेसाठी आजरा तालुक्यात पहिल्या टप्यात पाच हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आसून एक हजार क्रियाशिल सदस्य नोंदणी या चार दिवसात पूर्ण करणार आहे. आजून ज्याना फॉर्म मिळाले नाहीत त्यांनी ना. प्रकाश आबीटकर संपर्क कार्यालय आजरा येथे उपलब्ध केले आहेत. संतोष भाटले, विजय थोरवत यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
=======================

‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ, गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेट : गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ; संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा यासाठी गोकुळ सातत्याने नवे निर्णय घेत असतो. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ तर्फे दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था सचिव यांना खास भेट जाहीर करण्यात आली आहे.

गोकुळचे निर्णय -
१. म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ -
दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि.०१/०९/२०२५ इ. रोजी पासून जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही.
२. संस्था इमारत अनुदान वाढ :
प्राथमिक दूध संस्था संघाचा आधारभूत घटक असून सध्या इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य दर आणि मजुरांचे पगार वाढलेले आहेत व सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधणेसाठी किंवा खरेदी करणेसाठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने सध्याच्या देणेत येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करणेत यावी अशी संस्थांच्याकडून वारंवार मागणी होत होती. यानुसार दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३. दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ:
संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार असून ती प्रतिलिटर ०.६५ पैसे ऐवजी ०.७० पैसे करण्यात आली आहे. याचा जवळ-जवळ ३ कोटी रुपये वार्षिक आर्थिक भार संघावरती पडणार आहे.
४. मुक्त गोठा अनुदान योजना सुधारणा :
गोकुळ दूध संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान ५ जनावरांपर्यंत असणाऱ्या गोठ्यांनाच अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून किमान ५ ऐवजी ४ जनावरे असलेल्या मुक्त गोठ्याला अनुदान दिले जाणार आहे.
गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. "गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच दि. १ सप्टेंबर २०२५ पासून या सर्व योजना लागू होतील. यासंदर्भातील अंतिम मान्यता गोकुळ संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत घेण्यात येईल. या सर्व योजनेची सविस्तर माहिती व सुधारित परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना लवकरच पाठविण्यात येणार आहेत.
=========================

Friday, August 22, 2025
देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघात : ना. हसन मुश्रीफ, कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा उत्साहात
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आर.के.मंगल कार्यालक बामणी, ता. कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे याचबरोबर संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघ हा पहाटे उठून शेणा- मुतात हात घालून काबाडकष्ट करणाऱ्या माता- भगिनींनी व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाढविलेला संघ आहे. संपूर्ण देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघामध्ये आहे, असा विश्वास व्यक्त केला. हा ब्रँड टिकवायचा व वाढवायचा असेल तर दूध उत्पादकांचा सहभाग मोलाचा आहे. विशेषता; संचालक मंडळाची जबाबदारी मोठी आहे, असेही ते म्हणाले. ना. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, गोकुळ दुधाला मुंबई आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण; कोल्हापूर जिल्ह्याच्या माती आणि पाण्यामुळेच या दुधाची चव मोठी आहे. दूध संघ संचालकांच्या गुजरात दौऱ्याच्या अभ्यासामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जनावरांमधील आय. व्ही. एफ. तंत्र सिद्ध झाले आहे. म्हैस व्यायल्यानंतर जन्माला येणारे रेडकू ही रेडीच असेल, याचीही खात्री झालेली आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार दूध उत्पादकांमध्ये करण्याची गरज आहे. ना. मुश्रीफ पुढे म्हणाले, वासाचे दूध आणि पशुखाद्याबद्दलच्या दूध उत्पादकांच्या शंकाचे निरसन संघाने करावे. गोकुळ दूध संघाचे महालक्ष्मी पशुखाद्य आणि बाजारातील इतर पशुखाद्ये यांचा तुलनात्मक अभ्यास करा. प्रयोगशाळेत तुलनात्मक परीक्षण करून तसेच गोठ्यातही म्हैशीला खाद्य देऊन गोकुळच्या पशुखाद्याचा गुणात्मक दर्जा सिद्ध करा. गोकुळ दूध संघाकडून दुधाळ म्हैशीसाठी या आधीच ५० हजार रुपये अनुदान सुरू आहे. दूध संघाने केडीसीसी बँकेबरोबर जर सर्व व्यवहार केले तर म्हैशीला बँकेकडून ज्यादा १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणाही मंत्री मुश्रीफ यांनी केली. तसेच ना. मुश्रीफ पुढे म्हणाले, संघाचे संचालक मंडळ गोव्याला का गेले होते, याचे कोडे मलाही उलगडले नव्हते. माहिती घेतली असता ते स्वतःच्या खर्चाने गेले होते असे आढळून आले. त्यामुळे तो मुद्दा मी आता काढत नाही. दरम्यान; गोव्यामध्येही गोकुळ दुधाची विक्री होते. अधिकची बाजारपेठ आणि मार्केटिंगसाठी त्या सरकारचेही सहकार्य मिळण्यासाठी संचालक मंडळ तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भेटले आहे. संचालिका सौ. शौमिका महाडिक या गेली चार वर्षे विरोध करीत होत्या. आता महायुतीचाच अध्यक्ष असल्यामुळे येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या फलक घेऊन येणार नाहीत, घोषणा देणार नाहीत. सभा शांततेत होईल अशी अपेक्षाही श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली. तसेच; त्यांचे माहेर कागल असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की,“गोकुळ दूध संघाच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ झाली आहे. संघाचे उद्दिष्ट २५ लाख लिटर संकलन साध्य करणे असून, सर्व उत्पादकांनी संघाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी आवाहन केले. यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. यावेळी प्रविणसिंह पाटील (मुरगूड), बाबासाहेब तुरंबे (साके), टी.एम.पवार (व्हनाळी), मानसिंग पाटील (सांगाव), रविंद्र पाटील (बाणगे), बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, जयदीप पोवार (बिद्री),डी.एम.चौगले (सोनाळी) आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली. यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील,अरुण डोंगळे, संचालक युवराज पाटील यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक संचालक अंबरिषसिंह घाटगे तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
लाडका सुपरवायझर स्पर्धा......!
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर यांनी अजून दूध संकलन वाढीसाठी मेहनत करावी. व संघाने प्रत्येक कार्यक्षेत्रात स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीस प्रोत्साहित करावे, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना लाडका सुपरवायझर म्हणून प्रोत्साहन पर रोख १ लाख रुपयाचे बक्षिस संघामार्फत देणेत यावे.

Thursday, August 21, 2025
1 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी लोकशाही दिन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.
अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे :
अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत -
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर विहीत नमुन्यात करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Wednesday, August 20, 2025
विशेष लेख : कोल्हापूर सर्किट बेंचचा ऐतिहासिक शुभारंभ सोहळा...

-- प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
9701858777
कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर,सिंधुदुर्ग व रत्नागीरी या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथेच उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे.यानिमित्ताने झालेला सोहळा कोल्हापूर व कोल्हापूर जवळील सर्किट बेंच मधील सहा जिल्ह्यांना कायम स्मरणात राहणारा भावनिक सोहळा ठरला आहे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री, खासदार, आमदार, तीन खंडपीठाचे न्यायमूर्ती, सर्किट बेंचचे न्यायमूर्ती, विधि क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. हा सोहळा केवळ कोल्हापूरच्या दृष्टीनेच नव्हे तर महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरातील हजारो न्यायप्रविष्टांना मोठा दिलासा मिळणार आहे.न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून कोल्हापूर मधील पायाभूत सुविधांमध्ये तसेच कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला यामुळे चालना मिळणार आहे.
पाच दशकाची मागणी पूर्ण :
कोल्हापुरातील सर्किट बेंचची मागणी मागील पाच दशकांपासून सुरू होती. विविध वकील संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, माध्यमांनी आणि स्थानिक नेत्यांनी या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला. 2014 मध्ये राज्याचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 मे 2015 ला कॅबिनेटचा ठराव घेऊन उच्च न्यायालयाला पाठवला. त्यानंतर सतत ते सर्कीट बेंचसाठी प्रयत्नास होते. खंडपीठ निर्मिती पर्यंत त्यांचा पाठपुरावा कायम असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या विभागात नागपूर,छत्रपती संभाजी नगर, गोवा खंडपीठांनंतर आता कोल्हापूरचे सर्किट बेंच न्यायदानाचे नवे दालन झाले आहे.
६ जिल्ह्यांना दिलासा :
या सर्किट बेंचचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील व कोकणातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांना होणार आहे. आतापर्यंत या सहा जिल्ह्यांतील न्यायप्रविष्टांना खटल्यांसाठी मुंबई गाठावी लागत होती. प्रवास खर्च, वेळ आणि श्रम यांचा मोठा बोजा येत होता. सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांतून तीन ते चार तासांत कोल्हापूर गाठता येईल. तर सोलापूर जिल्ह्यातूनही साधारण पाच तासांत प्रवास करून कोल्हापूर पोहोचता येईल. एका अंदाजानुसार दरवर्षी सुमारे ४० हजार खटले येथूनच निपटता येतील असा अंदाज आहे.
खंडपीठाची नवी इमारत उभी होणार :
सर्किट बेंचच्या कामकाजामुळे कोल्हापूर येथे मोठे न्यायालयीन संकुल उभारण्यात येणार आहे. सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठात होणार हे लक्षात घेऊन ही इमारत तयार केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच कोल्हापूरच्या इतिहासाला साजेशी इमारत उभी राहील असे सूतोवाच आपल्या संबोधनात केले.सुसज्ज न्यायदानाच्या इमारती सोबतच न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र कक्ष, वकिलांसाठी वसतीगृह, व अन्य पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. यासाठी शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. शुभारंभ सोहळयात शेंडा पार्क येथील २७ एकर जागेचे हस्तांतरण मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्याकडे कोल्हापूरकरांच्या साक्षीने करण्यात आले.
राधाबाई बिल्डिंगचे भाग्य उजाळले :
सर्किट बेंच उभारायचे कुठे हा प्रश्न होता.मात्र दूरदृष्टीचे राजे, समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराजांच्या काळातच राजाराम महाराजांनी उभारलेल्या व ज्या ठिकाणी न्यायालय उभारले गेले होते तीच भाऊसिंगजी मार्गावरील जुनी न्यायालयाची इमारत यासाठी पुढे आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व त्यांच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या २५ विक्रमी दिवसात या इमारतीचे रूप पालटले. १८ तारखेपासून या इमारतीमध्ये न्यायदान सुरू झाले आहे. या इमारतीचे जुने स्वरूप जसेच्या तसे ठेवल्यामुळे ही इमारत कोल्हापूरच्या हेरिटेज दालनामध्ये देखणी इमारत म्हणून पुढे आली आहे. महत्त्वाचे म्हणजे याच राधाबाई बिल्डिंगमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले आहेत.
कोल्हापुराततील न्यायदानाची परंपरा :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे न्याय,नीती, समता, न्यायदान यासाठी कोल्हापूर शहराचे दायित्व मोठे आहे. या शहराने 1867 पासून न्यायव्यवस्थेला आपलेसे केले आहे. या शहरात पूर्वी 'राजा ऑफ कोल्हापूर' या सहीने न्यायदान होत होते.महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरला पहिले न्यायाधीश होते. ब्रिटिश राजवटीतील काही ऐतिहासिक नोंदीनुसार 1893 मध्ये 'कोल्हापूर स्टेट रूल्स ' म्हणून स्वतंत्र कायद्याचे पुस्तक होते.राजाराम महाराजांच्या काळात 1931 मध्ये कोल्हापुरात स्वतंत्र हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट स्थापन झाले होते.
कोल्हापुरी स्वागताने भारावले सरन्यायाधीश :
कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या भेटीवर आलेले सरन्यायाधीश स्वागताने भारावले. खरे तर त्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्यासह न्याय व विधी विभागातील सर्व वरिष्ठ, मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री विमानतळावर हजेरी लावली होती. सोबतच सामान्य कोल्हापूरकरांनी त्यांच्या वाहनांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. अगदी सामान्यातला सामान्य माणूस विश्रामगृहावर त्यांना भेटला. सरन्यायाधीशांनी सर्वांना वेळ दिला. त्यांच्या 55 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांच्या सन्मानार्थ पाच ते सहा हजार प्रेक्षक पाच वेळा अभिवादनास उभे राहिले. मोबाईलचा टॉर्च दाखवून त्यांना अभिवादन करण्यात आले. एवढेच नाही तर सुप्रसिद्ध शाहीर आझाद नायकवडी यांनी त्यांच्यावर पोवाडाही सादर केला. सरन्यायाधीशांनी त्यांच्यावरील या प्रेमासाठी सर्वांची जाहीर कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांकडून सरन्यायाधीशांना श्रेय :
कोल्हापुरातील सर्किट बेंच सुरू करणे माझ्यासाठी भावनिक कार्य होते, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी कोल्हापूरचे महत्व आपल्या भाषणात सांगितले. मात्र तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचे सर्किट बेंच करण्यासाठी सरन्यायाधीशांनी प्रत्येक दिवशी कसा पाठपुरावा केला आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः राजभवन गाठून एका दिवसात अध्यादेश कसा निघाला याची पूर्ण माहिती दिली. केवळ सरन्यायाधीश पदावर भूषण गवई असल्यामुळेच हे कार्य होऊ शकले, असे टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी सांगितले. सर्किट बेंचचे संपूर्ण श्रेय त्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले.
शाहू-आंबेडकरांचा गजर :
सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणामध्ये समतेचे राज्य आणण्यासाठी न्यायव्यवस्था उभारणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि संविधानाची पोलादी चौकट निर्माण करून सामान्य माणसाला समान संधीचे अभिवचन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ३२ मिनिटांच्या भाषणात ३० वेळा नामोल्लेख केला... "शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केल्यामुळेच ते पुन्हा विदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकले. शाहू महाराजांचे आमच्यावर अगणित उपकार आहेत",सरन्यायाधीशांच्या क्षणभर स्तब्ध होऊन उच्चारलेल्या या भावनिक वाक्याने अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. व्यासपीठावरील छत्रपती शाहू महाराजही या वाक्याने हेलावले.या कार्यक्रमात त्यांनी पुढे -पुढे सर्किट बेंच ऐवजी खंडपीठ हा उच्चारही केला.त्यामुळे लवकरच हे रूपांतर दृष्टीपथात पडेल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
सर्किट बेंच आणि खंडपीठ – काय फरक? :
सर्किट बेंच म्हणजे उच्च् न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण. जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठरावीक कालावधीत येऊन प्रकरणे चालवतील. राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सर्कीट बेंच निर्माण करतात. त्याचे नोटिफिकेशन राज्यपाल प्रसिद्ध करतात. खंडपीठ मात्र कायमस्वरूपी स्वरूपाचे असते. यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असून, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रस्ताव तयार करून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात. त्यास मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतात. दोन्ही ठिकाणी न्यायदानाची पद्धत आणि प्रक्रिया सारखीच असते. मात्र सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्तींची नियुक्ती तात्पुरती असते. तर खंडपीठात ती कायमस्वरूपी असते. कोल्हापूरचे सध्याचे सर्किट बेंचही लवकरच खंडपीठात रूपांतरित होणार आहे.
=====================

Tuesday, August 19, 2025
पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा; गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे कोल्हापूर जिल्हावासियांना आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहुजी सभागृहात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी नागरिकांना हे आवाहन केले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, मागील दोन दिवस जिल्ह्यात विशेषतः धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होवू शकते. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाबरोबरच अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यातील पाण्याच्या विसर्गाचाही जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर मोठा परिणाम होतो. याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक शासनामध्ये समन्वय साधला जात आहे. अलमट्टीतून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकार सोबत समन्वय साधत आहेत. तसेच जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारीही धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सातत्याने आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पाऊस वाढला तरी नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर न पडता सुरक्षित रहावे. पुराचे पाणी असणाऱ्या मार्गावर वाहन चालवू नका. पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडू नका. पुराच्या पाण्यात सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अमोल येडगे; नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
गेल्या 48 तासात पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत 65.5 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. 43 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी दुपारी 4 वाजेपर्यंत 36.09 फूट आहे. जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले असून इतर बंधारऱ्यावरील पाणी पातळीत वाढ होत आहे. मागील 24 तासात राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 7 फुटांनी वाढली आहे. राधानगरी धरणातून सकाळी 11 हजार 500 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 20 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोयना धरणातून 67 हजार 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून हा विसर्ग 75 हजार पर्यंत वाढणार आहे. वारणा धरणातून 29 हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. हवामान वेधशाळेने मंगळवार व बुधवार साठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. प्रशासनाच्या वतीने पावसाची प्रत्येक चार तासाच्या आकडेवारीवरुन अंदाज घेतला जात आहे.
हवामानाचा अंदाज, होणारा पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग आणि पुढील प्रस्तावित विसर्ग याचे नियोजन करण्यात येत आहे. राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट असून जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर व पंचगंगा नदीच्या वाढणाऱ्या पाणी पातळीवर प्रशासनाचे लक्ष आहे. वाढत्या पाणीपातळीनुसार आवश्यक त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांचे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. कोयना व वारणा नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 20 हजार क्युसेक्स वरून 1 लाख 75 हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत प्रशासनाशी संपर्कात आहे. तसेच कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुक्यातील काही गावांतील नागरिकांच्या स्थलांतराबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. कोल्हापूर शहरातील पाण्याची पातळी नियंत्रणात आहे. येथील पाण्याचा विसर्ग पाहता आवश्यक विस्थापनाबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात राहून व्यवस्था केली जाईल. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 16 रस्ते व जिल्हा परिषदेकडील 11 रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत. येथील पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेवून प्रशासकीय यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पूर परिस्थितीत नदीकाठचे नागरिक, ग्रामस्थ यांना सूचना वेळेत पोहोचवा. नागरिकांच्या स्थलांतराचे नियोजन करा, आदी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर : आमदार सतेज पाटील, करवीर तालुका संपर्क सभा खेळीमेळीत संपन्न
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, गेल्या चार वर्षांत गोकुळने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका घेतली असून म्हैशीसाठी रुपये १२ व गायीसाठी रुपये ६ इतकी दरवाढ केली तर म्हैस खरेदीसाठी ५० हजार पर्यंत अनुदान योजना सुरू केली आहे. करवीर तालुक्यातून गोकुळच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. या दौऱ्यातून शेतकरी व संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. गोकुळचा ब्रँड हा म्हैस दूधाचा असून शेतकऱ्यांना यामध्ये अधिक फायदा मिळावा हे आमचे ध्येय आहे. संस्थेच्या ठेवी ५१२ कोटींवर पोहोचल्या असून उलाढाल ४ हजार कोटीवर गेली आहे. मुंबईत पॅकेजिंग प्रकल्प, सोलर प्रकल्प अशा उपक्रमांमधून संस्थेची बचत होत आहे. दूध संकलन २० लाख लिटरवरून २५ लाख लिटरकडे वाटचाल करत आहे. गोकुळची वाटचाल ही शेतकऱ्यांच्या सहकार्याने, पारदर्शक आणि काटकसरीत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे हाच आमचा प्रयत्न राहील.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे म्हैस दुधाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी संघाने जातिवंत म्हैस खरेदी अनुदान तसेच जातिवंत वासरू संगोपन अनुदानात वाढ केली आहे. दूध व्यवसायाच्या स्थैर्यासाठी ही पावले अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. भविष्यात गाभण जनावरांसाठी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य संघामार्फत लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत हिफर रेडिंग प्रोग्रॅम (एचआरपी) आणि जातिवंत म्हैस रेडी संगोपन केंद्र योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार जातिवंत जनावरे (रेडी) सहज उपलब्ध होणार आहेत. तसेच दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांसाठी विमा योजना, अनुदान योजना व इतर सेवा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गोकुळच्या सेवांचा प्रभावी वापर करून दूध उत्पादन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, संघाचे गाय दूध संकलनात वाढ होत असून म्हैस दूध संकलन वाढण्याचे गरज आहे. तरी करवीर तालुक्यात संघाच्या विविध योजना तसेच स्व.आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधी यांनी संस्था कर्मचारी प्रोत्साहन निधी मध्ये वाढ करावी, जातिवंत म्हैशीचे रेतन जास्तीत जास्त प्रमाणात संघाने उपलब्ध करून द्यावी तसेच सुक्या वैरणीच्या अनुदानात वाढ करावी या विषयावरती चर्चा करण्यात आली. तसेच शिवाजी देसाई (भामटे), प्रविण पाटील (कावणे), के. डी. पाटील (खुपिरे), नारायण पाटील (भामटे) आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन नविद मुश्रीफ व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी जातिवंत म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान जाहीर केल्याबद्दल, महालक्ष्मी फर्टीमीन प्लस मिनरल मिक्चर सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा पोहोचवल्याबद्दल व शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांबद्दल गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्कोटेस्टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी स्वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रस्ताविक संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी केले. तर आभार संचालक संभाजी पाटील यांनी मानले. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँकचे, गोकुळचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
=============

Monday, August 18, 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधासाठी भर पावसात आजऱ्यात शेतकरी रस्त्यावर; कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्यातील 12 जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आजरा शहरात शेतकरी भर पावसात रस्त्यावर उतरले. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड तालुक्यातील शेतकरी सहभागी झालेला मोर्चा आजरा शहरातील शिवतीर्थ ते आजरा तहसील कार्यालया पर्यंत निघाला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विजय देवणे, कॉ. संपत देसाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
गेल्या चार दिवसापासून आजरा शहरासह तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या परिस्थितीतही शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने शक्तिपीठ विरोधी मोर्चा यशस्वी केला. आजरा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. शेती कामासाठी वापरण्यात येणार इरले डोक्यावर घेऊन महिलाही सहभागी झाल्या होत्या. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला. छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा आजरा तहसील कार्यालया जवळ आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, यापूर्वीही अनेक प्रकल्प झाले आहेत त्या प्रकल्पांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारासाठी होत असल्यामुळे याला आमचा विरोध आहे. यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याची लढाई झाली, आता शेतीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याचे आमिषाला बळी पडू नये. शेतीमुळे समाजात आपण ताठ मानेने उभे आहोत. गणेशोत्सवानंतर शक्तिपीठ विरोधातील लढा आणखी तीव्र केला जाईल. हजारो एकर शेती उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेती काढून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गरज नसलेल्या शक्तीपीठ विरोधात ताकतीने सर्वजण एकसंघ राहू या.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी कष्टाने सिंचनाखाली आणलेल्या जमिनी चोरांना देणार नाही. केवळ जमिनी जाणाऱ्यांना नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फटका बसणार आहे. या शक्तिपीठाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. शक्तिपीठामुळे कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला महापुराचा फटका बसणार आहे. शक्तिपीठच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उत्खनन करून बॉक्साइड तस्करी करण्याचा डाव आहे. 800 किलोमीटरच्या रस्त्याला 32 हजार कोटीची गरज असताना विनाकारण एक लाख सहा हजार कोटी किंमत दाखवून 70 हजार कोटी वाटून घेण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का? अदानींनी गडचिरोलीत अडीच हजार एकर जंगलात उत्खनन केले आहे, हे खनिज वाहतुकीसाठी शक्तीपीठाचा अट्टा सुरू आहे. देशातील उद्योगपतींचे लाड करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही.
विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठाच्या समर्थनात सरकारने जमा केलेले सातबारा हे बाधित शेतकऱ्यांचे नाहीत. झोपडपट्टीवर बुलडोजर चालवणारे शेतमजुरांना चिडणारे आणि गोरगरीब यांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे. अदानी अंबानीच्या पैशाचा मोह या सरकारला आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठाच्या संदर्भात आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. सर्व कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जागी राहून पुढील लढाईला तयार राहावे. कॉ. संपत देसाई म्हणाले, शेतकऱ्यांचा शक्तिपीठाला विरोध आहे. आमदार शिवाजीराव पाटील हे शक्तिपीठ चंदगड तालुक्यात नेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करत आहेत. शक्तिपीठ विरोधी आंदोलन चिरडण्याचे काम सुरू आहे. या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातून विरोध सुरू आहे. सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक गावांचे विभाजन होणार आहे. भागाच्या विकासासाठी रेल्वे मार्गांचे जाळे व्हावे. तानाजी देसाई म्हणाले, शेती उध्वस्त झाली तर लोकांनी जगायचे कसे? शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सर्वांनी हाणून पाडावे. राजेंद्र गड्डयान्नावर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे स्वप्न साऱ्यांनी मिळून धुळीस मिळवूया. राहुल देसाई म्हणाले, आम्ही विकासाच्या आड नाही मात्र शेतकऱ्यांच्या उरावर बसून विकास नको. सुनील शिंत्रे म्हणाले, आम्हाला शक्तिपीठ नको तर कर्जमाफी द्या. यावेळी कॉ. सम्राट मोरे, शिवाजी गुरव, अमर चव्हाण कॉ. अतुल दिघे, संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मुकुंद देसाई, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळ पाटील, सत्यजित जाधव, दिग्विजय कुराडे, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, शामराव देसाई, प्रकाश वास्कर, रियाज शमनजी, प्रभाकर कोरे, रवींद्र भाटले, संजय सावंत, नौशाद बुड्ढेखान, प्रभाकर खांडेकर, सुभाष देसाई, रणजीत देसाई, विक्रम देसाई, अनिल फडके, अल्बर्ट डिसूजा, धनाजी राणे, सचिन घोरपडे, कॉ. संजय घाटगे, राजू होलम, शांताराम पाटील, किरण कांबळे, संकेत सावंत, उत्तम देसाई, आरिफ खेडेकर, निवृत्ती कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
==================

Sunday, August 17, 2025
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क :
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP nadda) यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते, यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कार्यरत होते. सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी दिली.

Subscribe to:
Posts (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...