सेनापती कापशी (प्रतिनिधी) :
महावितरण सेनापती कापशी (ता. कागल) शाखेचे अभियंता व सर्व कर्मचारी यांनी महावितरण परिसरात एकूण 62 वृक्षांचे वृक्षारोपण व श्रमदानातून स्वच्छता केली. यामध्ये प्रामुख्याने औषधी, फळ तसेच सुशोभित करणारी वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्याचबरोबर फक्त वृक्ष लागवड करून न थांबता त्या वृक्षांचे नीट संगोपन करून चांगले वाढवण्यासाठी सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना येथील कापशी विभागाचे साहाय्यक अभियंता शिवाजी गावडे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना वृक्ष दत्तक देत त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, परिसरात अडचण व कामाच्या ठिकाणचे गवत पालापाचोळा तसेच येथील उपकेंद्रातील यार्ड मध्ये झाडे झुडपं मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे साप, विंचू यांचा वावर मोठ्या प्रमाणात झाल्याने कामासाठी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाला मोठा धोका निर्माण झाला असल्यामुळें रिकाम्या वेळात सर्वांनी श्रमदानातून स्वछता करत परिसर मोकळा केला.
यावेळी महावितरण खात्याचे सेनापती कापशी विभागाचे सहाय्यक अभियंता शिवाजी गावडे, नवनाथ डवरी, कनिष्ठ अभियंता केतन मोरे, कनिष्ठ अभियंता शंकर मुंढे, वरिष्ठ तंत्रज्ञ मोहन शेलार, प्रधान तंत्रज्ञ विनोद सुलताने, वरिष्ठ तंत्रज्ञ शशिकांत चव्हाण, यंत्रचालक रोहित पाटील, तंत्रज्ञ, पवन खोब्रागडे, तंत्रज्ञ भोला सोयाम, विद्युत सहाय्यक बाळकृष्ण पाटील, विद्युत सहाय्यक जयदेव नन्नावरे, विद्युत सहाय्यक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment