आजरा (प्रतिनिधी) :
सोमवारअखेर (दि. २९) आजरा तालुक्यात ७८ कोरोनाचे रुग्ण होते. हे सर्व रुग्ण मूळचे आजरा तालुक्यातील असले तरी परजिल्ह्यात विशेषतः मुंबई येथे वास्तव्यास होते. मात्र मंगळवारी आजरा तालुक्यातील भादवण गावात स्थानिक ६७ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्थानिक पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातील एक उच्च शिक्षित कुटूंबातील हे सदस्य आहेत. कांही दिवसापूर्वी पती पत्नीचा स्वॅब घेतलेला होता. मंगळवारी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र पतीलाही श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दोघांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या रुग्णांचा स्थानिक पातळीवर अनेकांशी संपर्क आल्याची चर्चा आहे. हे दाम्पत्य कामासाठी गडहिंग्लज येथे जावून येणे हाच प्रवास आहे असे असताना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने स्थानिकांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. याचवेळी समूह संसर्गाला सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत आजरा तालुक्यात ७९ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोघे मयत झाले आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment