चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड तालुक्यातील न्हावेली गावामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी रेशनधान्य चोरीला जाताना देसाईवाडी येथे पोलिसांना आणि ग्रामस्थांना गाडी सापडली होती. त्यामुळे वागदादेवी महिला बचत गट या न्हावेलीच्या रेशनधान्य दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला. यावर चंदगड तहसीलदाराच्या आदेशानुसार न्हावेली ग्रामस्थांची गैरसोई होऊ नये यासाठी हे गाव कोकरे येथील जीवनप्रकाश महिला बचत गट रास्त भाव दुकानाला जोडले गेले. त्यामुळे येथील लोकांची गैरसोय झाली नाही.
कोविड -१९ रोगाचा पार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने लौकडाऊन सुरु केले आहे. अश्या परिस्थीतीमध्ये मे-जुन महिन्यामध्ये कोकरे येथील जीवनप्रकाश महिला बचत गटामार्फत व्यवस्थित आणि सुरळीतपणे धान्य वाटप न्हावेली गावामध्ये करण्यात आले. रेशनधान्य वाटप करताना लोकांना पावती मिळाली. तसेच दरामध्ये तफावत नसल्याने सर्व न्हावेली ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी या महिला बचत गटाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment