महागाव (प्रतिनिधी) :
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालय व पॅरामेडीकलच्या वतीने गडहिंग्लज तालुक्यातील हरळी, महागाव, हसुरवाडी व चंदगड तालुक्यातील विविध गावातील क्वारंटाईन गावकर्याना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मोफत औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महागावच्या सरपंच जोत्स्ना पताडे यानी स्वागत केल्या. कन्या विद्यामंदिर, शिवाजी विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, राजा छत्रपती विद्यालय हरळी येथील प्राथमिक शाळा, मंदिरात व हसुरवाडी असलेल्या क्वारंटाईन गावक-याना औषध वाटप करण्यात आले. दरम्यान प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यानी औषध घेण्याविषयी पद्धती सांगून कोरोनाला हरवायचे असेल तर शासन व प्रशासनाला सर्वानी सहकार्य करण्याबरोबरच नियमांचेही पालन करणे गरज असल्याचे सागिंतले. यावेळी महागावचे सरपंच जोत्स्ना पताडे व हरळीच्या सरपंच दिपाली लोहार यानी सदैव मदतीचा हात देण्यात पुढे असणाऱ्या व आरोग्याची काळजी घेणाऱ्या संस्थेचे, आयुर्वेदीक टिमचे व प्राचार्याचे कृतज्ञता व्यक्त केले. यावेळी पँरामेडीकलचे प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, राजू डवरी, सरपंच संजय काबंळे, ग्रामसेवक संतोष होळ, डॉ. संगिता मनगुळे, डॉ. महेश पाटील तसेच हाँस्पिटल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment