कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २५ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. याचे फलित म्हणून गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण. या दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते. यावेळी २३ लाख ६३ हजार १७० लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २२ लाख ०१ हजार २४३ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६१ हजार ९२७ लिटर्सची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य १७ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली. “गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्यावतीने धन्यवाद देतो.” असे चेअरमन डोंगळे यांनी स्पष्ट केले. तसेच रमजान ईद व श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघाचे संचालक अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले तर यांनी आभार पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके मानले. तसेच मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, सहा. महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन सहा.व्यवस्थापक दतात्रय वाघरे, बी.आर.पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=====================
Monday, March 31, 2025
Sunday, March 30, 2025
आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त १२कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा
आजरा विकास न्यूज नेटवर्क :
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल १२ कोटी ३७ लाख रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे १०१९ कोटी ७९ लाख रूपयाच्या ठेवी व ६४९ कोटी ६२ लाख रुपये कर्जे आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, व्हा. चेअरमन संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

गडहिंग्लज आगाराला नव्या पाच लाल परी बसेस लोकार्पण, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम; मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांची लालपरी बसमधून सफर
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडहिंग्लज आगाराला नवीन दहा बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पाच लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. या नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या गडहिंग्लज आगाराला नव्या पाच लालपरी बसेसचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गडहिंग्लज बसस्थानकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यासह उपस्थित प्रमुखानी नवीन लालपरी बसमधून सफर केली.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज आगाराला दहा नवीन लालपरी बसेस मंजूर झालेल्या आहेत. त्यापैकी पाच लालपरी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसेसचा उपयोग प्रवाशांच्या सेवेसाठी होऊन प्रवाशांची गैरसोय टळेल. आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून भविष्यात अधिक लालपरी बसेस आगाराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मंत्री असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचा आम्हाला निश्चितच फायदा होतो. आमच्या मतदारसंघातही त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच मिळू देत.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यानवार, माजी नगराध्यक्ष राजू खनगावे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, सतीश पाटील- गिजवणेकर, प्रकाशभाई पताडे, शर्मिली पोतदार, शारदा आजरी, रेश्मा कांबळे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, दीपक कुराडे, महेश गाढवी, अण्णासाहेब देवगोंडा, महादेवराव पाटील-धामणेकर, डॉ. बेळगुद्री, रफिक पटेल, हारून सय्यद, आगार व्यवस्थापक रेणे, संतोष कांबळे, आजी- माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===============

Saturday, March 29, 2025
६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण अनावरण सोहळा संपन्न; साहित्य व संस्कृतीचा अभिजात उत्सव!
बेळगाव, विकास न्यूज नेटवर्क :
मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणाऱ्या ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ची तयारी जोरात सुरू झाली आहे. या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण मराठा मंदिर, बेळगाव येथे उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण गोपाळराव बिर्जे (अध्यक्ष, मराठा जागृती मंच, बेळगाव) आणि ईश्वर लगाडे (निवृत्त सिनिअर मॅनेजर, सिंडिकेट बँक) यांच्या हस्ते करण्यात आले. आप्पासाहेब गुरव, विश्वासराव घोरपडे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण आणि महादेव चौगुले यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यंदाच्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात साहित्यिक, ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन उद्योगपती आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलन आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "हे संमेलन केवळ साहित्याचा उत्सव नाही, तर मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा अभिजात महोत्सव आहे." यावेळी ईश्वर लगाडे, गोपाळ बिर्जे, महादेव चौगुले व आप्पासाहेब गुरव यांनी आपल्या मनोगतातून साहित्याच्या वाढत्या प्रभावावर आणि संमेलनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी सर्व साहित्यप्रेमींनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमास स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील, एम. वाय. जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे - पाटील घाडी, शिवसंत संजय मोरे, मोहन अष्टेकर, मोहन पाटील, संजय गौंडाडकर, स्वप्निल जोगाणी, मनिषा नाडगौडा, रोशणी हुंद्रे, शितल पाटील, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, संजीवनी खंडागळे यांची उपस्थिती होती.

‘गोकुळ’ने दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधली : कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले कि, दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम गोकुळने केले असून जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी भरीव काम गोकुळने केले असल्याचे गौरवोद्गार काढले. कोल्हापूरची भौगोलिक स्थिती येथील हवामान व पोषक वैरण यामुळे जिल्ह्यातील दुधाला चांगली चव आहे. हि चव व गुणवत्ता जपत गोकुळने ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गोकुळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक घराघरात पोहोचले आहे त्याचे सर्व श्रेय गोकुळचे पदाधिकारी, दूध उत्पादक, संस्था, संघ कर्मचारी, अधिकारी, ग्राहक, वितरक अशा सर्व घटकांचे असल्याचे यावेळी नमूद केले. यावेळी गोकुळ राबवत असलेल्या वासरू संगोपन योजना, जनावरांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे व बायोगॅस, स्लरी योजनेचे त्यांनी खास कौतुक केले. यावेळी गोकुळ प्रकल्पाला भेट दिली असता त्यांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक केले. यावेळी गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांचा आस्वाद हि त्यांनी घेतला व गोकुळच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये दुग्ध व्यवसायासाठी काही निधी राखीव ठेवण्यासंदर्भात गोकुळ कडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी संघाची माहिती दिली व संचालक अजित नरके यांनी आभार मानले. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, शाकीर पाटील, मंडल अधिकारी उदय लांबोरे, शिवराज देसाई, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हणमंत पाटील, बाजीराव राणे, व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
=================

Friday, March 28, 2025
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे वतीने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा सत्कार
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास नुकतेच राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून राज्य सरकारच्या हमीवर १२२.६८ कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. सदर कर्ज मंजूरी कामी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, नांगरतास ऊस संशोधन केंद्र येथे कारखान्याचे संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री ना. पवार व मंत्री ना. मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, उपाध्यक्ष सुभाष देसाई, केडीसीसी बॅंकेचे संचालक तथा बॅंक प्रतिनिधी सुधीर देसाई, जेष्ठ संचालक विष्णूपंत केसरकर, उदयदादा पोवार, मुकुंददादा देसाई, अनिल फडके, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशिलकर, गोविंद पाटील, रशिद पठाण, सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम व अधिकारी उपस्थित होते.

‘गोकुळ’ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : चेअरमन अरुण डोंगळे; ‘गोकुळ’मार्फत दूध उत्पादक व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस निरीक्षक पदी निवड झालेबद्दल प्रशांत आनंदा इंजर (रा. खोकुर्ले पैकी पडळवाडी) यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादकांच्या संघाच्या विविध योजना राबवून आदर्श दूध व्यवसाय करून आपली प्रगती साधली आहे. खास करून संघाच्या वासरू संगोपन योजनेमध्ये सहभाग घेऊन जातिवंत जनावरे पैदास केली आहेत. हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. जातिवंत जनावराबरोबर दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबध्द आहे. असे श्री डोंगळे यांनी सांगितले. गगनबावडा तालुक्यातील पोलिस निरीक्षक म्हणून प्रशांत इंजर त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिरोळ तालुक्यातील अ.लाट येथील रावसाहेब गिरमल, आदिनाथ गिरमल, चिपरी येथील अभिजित पाटील, जैनापूर येथील शक्तीकुमार पाटील, कल्पना बिरंजे, दानोळी येथील धन्यकुमार पाराज, परशराम सावंत, दिलीप केकले, रोहित पाराज, सुकुमार पाटील तसेच उमळगाव येथील विनायक ठोंबरे व उदगाव येथील प्रशांत कोळी, प्रमोद कोळी या दूध उत्पादकांचा आदर्श दूध उत्पादक, आदर्श सचिव व आदर्श म्हैस व गाय गोठा तयार केल्याबद्दल गोकुळ संघामार्फत सत्कार करणेत आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
==================

सात एप्रिलला आजरा वन विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व मागण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने 21 मार्च रोजी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील विविध मागण्यांबाबत वन विभागाकडून कांहीच प्रतिसाद न आल्याने सोमवारी ७ एप्रिलला मोर्चा काढून आजरा वन विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्धार आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
शुक्रवार (दि. 21) रोजी शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाने जाऊन आजरा वनविभाग परिक्षेत्र वनाधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनात ताबडतोबीने प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य वनसरंक्षक यांचे सोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक न झाल्यास मोर्चा काढून कार्यलयाला टाळे ठोकण्याची घोषणा केली होती. आठवडा उलटून गेला तरी वन विभागाकडून कांहीच प्रतिसाद न आल्याने आजरा येथील श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय करण्यात आला. शेतकरी आणि शेती बाबत जर वन विभाग असंवेदनशील असेल तर असले खाते हवेच कशाला अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्या. सोमवार सात एप्रिल रोजी सुलगाव फाटा येथे जमून सर्व मोर्चाने जाऊन आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयाला टाळे लावण्याचा निर्धार केला. यावेळी कॉ. संपत देसाई, संजय सावंत, राजू होलम, शांताराम पाटील, बाळू चौगले, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, अशोक मालाव, प्रकाश शेटगे, युवराज जाधव, सहदेव प्रभू, भीमराव माधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
====================

Thursday, March 27, 2025
कोल्हापूर जिल्ह्यातील सुरु असलेल्या कामाचा दर्जा व गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे : उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर (जिमाका) :
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकासकामे सुरू आहेत. ही प्रमुख विकास कामे करत असताना त्या कामांमध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करुन त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयी -सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्प माहिती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, विविध विकास कामांसाठी अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात यावा. तकलादु कामे नको. किल्ले पन्हाळ्याची डागडुजी व सुशोभीकरण करत असताना तेथील स्थानिकांना विश्वासात घ्या तसेच हे काम अल्प कालावधीत पूर्ण करा जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटन वाढेल. मात्र हे करत असताना त्या कामाची गुणवत्ताही अबाधित ठेवण्यात यावी, अशी सूचना करुन आवश्यक त्या कामासाठी शासनाकडून तात्काळ निधी देण्यात येईल त्याचबरोबर संबंधित केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा करु असे सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तीस विभागांना जागा देण्यात आली आहे. किल्ले पन्हाळा येथे डागडुजी व सुशोभीकरणाबाबत तेथील लोक सकारात्मक असल्याचे सांगून येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंक्शन सेंटरचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कोल्हापूर शहर मनपाच्या नवीन इमारत उभारणीसाठी शेंडा पार्क येथे दोन एकर जागा मिळावी, अशी मागणी करत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असल्याचे सांगितले तर राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला असल्याचे सांगत, जिल्हा परिषदेच्या सुमारे 1958 शाळांचा 'समृद्ध शाळा' या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पुढील पाच वर्षाचा नियोजन व कालबद्ध कार्यक्रम जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

यावेळी महालक्ष्मी/ अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा, किल्ले पन्हाळा डागडुजी व सुशोभीकरण, क्रिकेट स्टेडियम, इंटरनॅशनल कन्व्हेंक्शन सेंटर, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, आयटी हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसेच कोल्हापूर - रत्नागिरी NH-166 आदी बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यावेळी मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
==============
==============
कॅन्सरमुक्ती लसीकरण मोहीम लोक चळवळ झाली : सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डाॅ. राधिका जोशी यांचे प्रतिपादन; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून मुली व तरुणींना सुरक्षाकवच
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजेच सर्वाइकल कॅन्सर ही संपूर्ण देशभर फार मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मी अल्पशा प्रमाणात लसीकरण आणि जनजागृती करीत होते. परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगाने ही मोफत लसीकरणाची मोहीम लोक चळवळ झाली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डाॅ. राधिका जोशी यांनी केले. मुलींनो आणि अविवाहित तरुणींनो, एचपीव्ही लसीकरण करून घ्या आणि कॅन्सरमुक्त जीवनाचा आनंद लुटा, असेही त्या म्हणाल्या. गडहिंग्लजमध्ये आयोजित कॅन्सरमुक्तीच्या मोफत लसीकरण मोहिमेच्या नियोजनाच्या बैठकीत डाॅ. जोशी बोलत होत्या. गडहिंग्लज शहरासह कडगाव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघातील नऊ वर्षापासून २६ वर्षापर्यंतच्या मुली व अविवाहित महिलांना नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने मोफत लसीकरण केले जाणार आहे.
डॉ. राधिका जोशी पुढे म्हणाल्या, कोल्हापुरात डॉक्टरांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांमध्ये मंत्री मुश्रीफ यांना मी या लसीचे महत्व सांगितले. त्यांनी तात्काळ अगदी आठवड्याभराच्या आतच संपूर्ण जिल्हाभर लसीकरण राबविण्याचे नियोजन केले. बाजारात महाग असणा-या या लसीचे त्यांनी चक्क मोफत लसीकरण आयोजित केली. त्यांच्या या वचनपूर्तीने मी भारावून गेले, असेही त्या म्हणाल्या. महिलांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्तीसाठी संशोधित झालेली ही लस जागतिक आरोग्य संघटनेने (W.H.O.) शिफारस केलेली आहे. तसेच; विविध भारतीय आरोग्य संघटनांनीही या लसीला मान्यता दिली आहे. ही लस सर्वाधिक सुरक्षित आणि खात्रीशीर असून यापासून कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असेही डॉ. जोशी म्हणाल्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, तीन आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनापासून कागल तालुक्यापासून या मोहिमेला सुरुवात केली आहे. मुली आणि अविवाहित महिलांकडून या लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. येणारी पिढी कॅन्सरमुक्त घडवण्याच्या दृष्टीने मंत्री हसन मुश्रीफ यांनी उचललेले हे पाऊल लौकिकास्पद आहे. यावेळी सीपीआरचे अधीक्षक डाॅ. शिशिर मिरगुंडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, नगरपालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, गडहिंग्लज तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. गीता कोरे, गटशिक्षणाधिकारी श्री. हलाबगोळ, हरून सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले सौ. रेश्मा कांबळे, सौ. शर्मिली पोतदार, डॉ. बेनिता डायस आदी प्रमुख उपस्थित होते.
================

'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतंर्गत बालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
कोल्हापूर, (जिमाका) :
चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा. या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (6 वर्षे पूर्ण असणाऱ्या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 100 टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन, डिजीटल शाळा, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होण्यास मदत झाली असल्याचेही डॉ. शेंडकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Tuesday, March 25, 2025
जोतिबाची चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर (जिमाका) :
श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे होणारी चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लॅस्टीक वापरावर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा, शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, उप अभियंता सुयश पाटील, ग्रामसेवक शिवाजीराव पाटील तसेच जोतिबा डोंगरावरील व्यापारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जोतिबा डोंगरावर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी व्यापारी, यात्रेकरु, नागरिकांनी डोंगरावर कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचा वापर करु नये. यात्रेसाठी चिरमुऱ्याचे पॅकिंग मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी चुरमुरे वगळता अन्य सर्व वस्तू, देवाचे पूजा साहित्य, मिठाई, पेढे तसेच खाद्यपदार्थांचे तसेच खेळणी व अन्य साहित्यांचे पॅकींग प्लॅस्टिकचे असणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी डोंगरावर येताना कोणत्याही वस्तूंसाठी प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी सोबत कापडी पिशव्या ठेवाव्यात. अन्न, पाणी, फराळाच्या वस्तू दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लॅस्टिकचा वापर करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्रामपंचायतीने बचत गटाच्या माध्यमातून व्यापारी, भाविकांना कापडी पिशव्या उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच पुजाऱ्यांच्या घरी कापडी पिशव्या देण्यासाठी नियोजन करा. सर्वांनी सकारात्मक विचाराने सहकार्य करुन जोतिबा डोंगरावरील यात्रा प्लास्टिक मुक्त पद्धतीने पार पाडून पर्यावरणाचे रक्षण साधावे, असे ते यावेळी म्हणाले. उपविभागीय अधिकारी शिंगटे व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्लास्टिक मुक्त यात्रा होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Monday, March 24, 2025
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (B.D.S) राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा शाळेचे सुयश
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप B.D.S. (ऑल इंडिया) परीक्षेमध्ये मध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर आजरा शाळेचे 23 विद्यार्थी मेडल प्राप्त ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली मधून सानवी सागर किरुळकर (गोल्ड मेडल), राजवीर युवराज पोवार (गोल्ड मेडल), अविराज दयानंद पाटील (सिल्वर मेडल), स्वराली हनमंत गजरकर (सिल्वर मेडल), वरद एकनाथ वंजारे (सिल्वर मेडल), वेणू सचिन इंजल (सिल्वर मेडल), अर्पिता अश्विन डोंगरे (सिल्वर मेडल), अन्विता अजित चौगुले (सिल्वर मेडल), कनिष्क कुणाल पोतदार (ब्राँझ मेडल), (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी पाच)
इयत्ता दुसरी मधून राजनंदिनी सचिन इंदूलकर (सिल्वर मेडल), ज्ञाना विलास गवारी (सिल्वर मेडल ), काव्या जयदीप दोरुगडे (ब्राँझ मेडल), मनस्वी मनोज पंडित (ब्राँझ मेडल), रणवीर रणजीत डोंगरे (ब्राँझ मेडल), (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी सात )
इयत्ता तिसरी मधून पार्थ रवींद्र केळकर (गोल्ड मेडल ), अद्विता किशोर खोत (सिल्वर मेडल), केतकी रामदास होरटे(सिल्वर मेडल), दियती धीरज सनगर (सिल्वर मेडल), आर्यन विनोद दळवी (सिल्वर मेडल), यश संतोष जाधव (ब्राँझ मेडल), मृणाल अभिजीत पाटील (ब्राँझ मेडल), ज्ञानेश अभिजीत इंजल(ब्राँझ मेडल), संचिता संतोष राणे (ब्राँझ मेडल), (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी सहा)
इयत्ता चौथी मधून (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी 11)
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका एस. पी. चव्हाण, मार्गदर्शक शिक्षक एम. के. खोत, एन. सी. हरेर, एन. आर. हासबे, आर. व्हि. देसाई, एस. बी. डेळेकर, एल. पी. कुंभार, आर. एच. गजरकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांची प्रेरणा मिळाली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

साळगाव येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम भूमिपूजन संपन्न
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत क्रीडा विकास योजनेच्या माध्यमातून साळगाव (ता. आजरा) येथे उभारण्यात येणाऱ्या व्यायामशाळा इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी सैनिक विश्वास व्हळतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच धनंजय उर्फ भैय्या पाटील म्हणाले, राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून व जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांच्या सहकार्यातून कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती मधून साळगाव गावामध्ये व्यायाम शाळा इमारत उभी करण्यासाठी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून व्यायामाचे साहित्य उपलब्ध करण्यात येईल. या माध्यमातून साळगाव मध्ये सशक्त व सुदृढ युवा पिढी तयार होण्यास हातभार लागणार आहे. याचबरोबर गावात सध्या समाज मंदिर बांधकाम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, नवीन गटार बांधणे यासह इतर कामे सुरू आहेत. आगामी काळात साळगाव गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी उपसरपंच उषा नावलकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुंभार, बबन भंडारी, विजय कांबळे, कमल केसरकर, स्वप्नाली केसरकर, पूजा पाटील, श्रीधर जाधव, कृष्णा नार्वेकर, राजाराम कुंभार, बळीराम माडभगत, शशिकांत माडभगत, दत्तू कांबळे, ज्ञानदेव नावलकर, विष्णू केसरकर, पांडुरंग पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णा गावडे, संजय माडभगत, बाळकृष्ण देवलकर, सचिन केसरकर, स्वप्निल दोरुगडे, सुहास शिपुरकर, सूर्यकांत माडभगत, गजानन पाटील, उत्तम जाधव, बबन वड्ड, दयानंद कांबळे, योगेश कांबळे, विनायक लोहार, भगवान पाटील, संदीप पाटील, गणपती कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ग्रामसेविका कांचन चव्हाण यांनी आभार मानले.
===================

Saturday, March 22, 2025
मुलींना सक्षम व आरोग्यदायी होण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गडहिंग्लजमध्ये मुलींना कॅन्सरमुक्तीच्या लसीकरणाबाबत नियोजनाची बैठक
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचे प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरण नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीरावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. गडहिंग्लज, उत्तुर भागातील मुलींनी लसीकरण करून घ्यावे. शिक्षक पालकांनी शंका निरसन करून लसीकरणासाठी आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आशीर्वाद आणि पुण्याई.......!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या 35- 40 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सामाजिक बांधिलकी म्हणूनच काम केले. एखादी मोहीम किंवा उपक्रम हाती घेतल्यानंतर मी मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करतो. त्याचा परिणाम म्हणूनच गोरगरिबांचे आशीर्वाद आणि पुण्याई सतत माझ्या पाठीशी असते.
कार्यक्रमावेळी अधिष्ठता डॉ. सत्यवान मोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी कर्करोगमुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लसीविषयी माहिती देताना उपस्थितांचे शंका निरसन केले. यावेळी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवडे, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेत शेळके, आजरा तहसीलदार समीर माने, गडहिंग्लज मुख्याधिकारी देवानंद डेकळे, गट शिक्षणाधिकारी हलबागोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत, तसेच वैद्यकीय, महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक यांच्यासह गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजू खणगावे, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम, शर्मिली पोतदार, नगरसेविका रेश्मा कांबळे, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, रफिक पटेल, प्रकाशभाई पताडे, बाळासाहेब घुगरी, लक्ष्मी घुगरी, डॉ. बेनिता डायस, हारुण सय्यद, नरेंद्र भद्रापूर, सिद्धार्थ बन्ने आदी प्रमुख उपस्थित होते.प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. स्वागत माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी केले.

कृषि विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅलीचे आयोजन; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत मिलेट रॅलीमधे नोंदविला सहभाग
कोल्हापूर, (जिमाका) :
पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कृषि विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत २२ मार्च रोजी मौजे कुर (ता. भुदरगड) येथे मिलेट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले .
प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या मिलेट रॅलीचे कुर-कोनवडे- नीळपण-दरवाड- म्हसवे- गारगोटी-कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पॉवर टिलर,रोटावेटर चे वाटप केले.
या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ. योगेश बन (नाचणी पैदासकार) यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सांगत आहारात नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये ही लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन इ. सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त असल्याचे सांगितले. शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले. तर ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मयत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरी पत्र देण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनंतर्गंत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या पौष्टिक तृणधान्ये महोत्सवामध्ये पाककला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 150 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अनुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन महिलांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील (कोल्हापूर विभाग) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती रक्षा शिंदे, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे अशासकीय सदस्य दत्तात्रय उगले, मदन देसाई, माजी उपसभापती अजित देसाई, कुरचे सरपंच मदन पाटील, कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे, अशोकराव भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, भुदरगड तालुका कृषी अधिकारी नितीन भांडवले, बीटाइम आत्मा सुनील कांबळे यांनी नियोजन केले. या कार्यशाळेस शेतकरी, प्रक्रियादार, नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दर्शविला.
=======================
Friday, March 21, 2025
मेडिकल असोसिएशन ऑफ आजराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजरा या आजरा तालुक्यातील नोंदणीकृत डॉक्टरांच्या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन “ EUPHORIA 2025 ” उत्साहात पार पडले. या स्नेहमेळाव्यामध्ये आजरा तालुक्यातील डॉक्टर्स आणि लहान मुला मुलींनी गाणी, नृत्य आणि विविध कलाविष्कार सादर केले .
गडहिंग्लज मधील नामांकित “देसाई हॉस्पिटल”चे डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई, डॉ. दिशा राणे-देसाई आणि डॉ. सुषमा देसाई या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दिपक सातोस्कर, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. प्रवीण निंबाळकर आणि डॉ. दिपक हरमळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. रोहित देसाई यांनी “उच्च रक्तदाब” आणि डॉ. दिशा देसाई यांनी “विविध नेत्रविकार आणि त्यावरील उपाय“ या विषयांवर सर्व डॉक्टर्सना मोलाचे मार्गदर्शन केले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि कौटुंबिक स्नेहमेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रामुख्याने डॉ. अनिल देशपांडे, डॉ. गौरी भोसले, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. सुरजीत पांडव , डॉ. रोहन जाधव आणि मेडिकल असोसिएशन मधील सर्वच सदस्यांनी आपले योगदान दिले. मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा ही संघटना नेहमीच अशा सामाजिक कार्यक्रमा सोबतच मोफत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक घेत असते, त्यापैकीच हा एक वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. डॉ. भरत मोहिते आणि डॉ. गौरी भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. मेडिकल असोसिएशन ऑफ आजराचे अध्यक्ष डॉ. प्रवीण निंबाळकर यांनी आभार मानले .

Thursday, March 20, 2025
वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याला मुदतवाढ
मुंबई, न्यूज नेटवर्क :
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP (High Security Registration Number Plate) बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयावरुन अनेक वाद उद्भवले होते.
दरम्यान, राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरुन सरकारवर टीका देखील झाली होती. सध्या 30 मार्च नंतर 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज आहे.

हारूर येथे विकासकामांचा शुभारंभ
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
ग्रुप-ग्रामपंचायत कानोली-हारूर (ता. आजरा) येथे 15 लाख रुपयाच्या निधीचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमच्या अध्यस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या, 25/15 योजनेतील विकास कामाचा शुभारंभ भाजप ओ बी. सी. सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी यांच्या हस्ते झाले. दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सुषमा पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले,आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आम्ही त्यांच्या माध्यमातून करीत आहोत. यापुढेही आमदार शिवाजीराव पाटील आणि अशोकआण्णा चराटी यांचे सहकाऱ्यातून निधी देण्याचे आश्वासन दिले. स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिपाली सुतार, माया लोहार, यांच्यासह गजरगाव सरपंच आनंदा कांबळे, सुरेश रेडेकर, विलास सुतार, मिलिंद पालकर, गणपती कळसकर, मारुती कदम, एम. टी. पाटील, प्रकाश पाटील, बाळासो चव्हाण, सयाजी सावंत संतोष सावंत, साहिल पाथरवट, दिलीप पाटील, दिनकर पाटील, राजू पाटील, गोपाळ भोगण, रावसाहेब पाटील, सी. ए. पाटील उपस्थित होते. आभार सुरेश रेडेकर यांनी मानले.

Subscribe to:
Posts (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...