Wednesday, June 24, 2020

कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील ३३ शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप : जि.प.सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर


सिरसंगी (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील ३३ शाळांना जिल्हा परिषद सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांनी आपल्या जिल्हा परिषद फंडातून शैक्षणिक साहित्य मंजुर केले आहे. यामधे १९ शाळांना वाॅटर फिल्टर, १० शाळांना क्रिडा साहित्य, ५ शाळांना प्रयोग पेटी, २ शाळांना टॅब असे साहित्य मंजुर केले आहे. केंद्र शाळा सिरसंगी (ता. आजरा) येथे या साहित्यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मायकेल फर्नांडिस  मनोगत व्यक्त करताना म्हणाले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  स्व. बळिराम देसाई यांच्या नंतर प्रथमच सर्व शिक्षकांना बोलावून एवढ्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे सर्व शिक्षकांतुन समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाला शिक्षक समितीचे नेते व ऋग्वेदचे संपादक सुभाष विभुते, संतोष चौगुले, खानापूरचे उपसरपंच युवराज जाधव, एम. व्ही. पाटील, खवरे सर आदी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख उपस्थित होते. सुत्रसंचलन अर्जुन पाटील यांनी केले तर आभार आनंदा भादवणकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...