आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या रा. राईस मिल जवळ आजरा, मूळ गाव येरमाळा ता. कळंब जी. धाराशिव) या शाळकरी बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन सणा दिवशी घडलेल्या या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, धाराशिव जिल्ह्यातील पोवार कुटुंबीय व त्यांचे नातलग लोहार कामाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी काम करत आहेत. किरण पोवार हे एक महिन्यापूर्वी आजरा शहरात आले. त्यांनी राईस मिल शेजारील जागेत लोहार काम सुरू केले होते. त्यांच्या समवेत पत्नी व मुलगा आदर्श राहत होते. बुधवारी सकाळी पोवार हे लोहार काम करत होते. त्यावेळी आदर्श हा मोकळ्या जागेत पतंग उडवत होता. या मोकळ्या जागेत असलेल्या लाकडांच्या ढिगार्यावर उभारून आदर्श हा पतंग उडवत असताना तो तोल जाऊन पडला व त्याच्या अंगावर ढिगार्यातील लाकडी ओंडके पडले. लाकडी ओंडके अंगावर पडल्याने आदर्शचा जागीच मृत्यू झाला. आदर्श हा एक हुशार विद्यार्थी होता. तू आपल्या मूळ गावीच इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
No comments:
Post a Comment