बीड (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
ज्या व्यक्ती मागील चार दिवसांत पालकमंत्री धनंजय मुंडे व त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या संपर्कात आल्या किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केलेली अशांनी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत २८ दिवस होम क्वाॅरंटाइन होऊन काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment