Saturday, January 31, 2026

शिरसंगी, किणे परिसरात भाजपच्या प्रचाराचा झंझावात; महिला व युवकांचा लक्षणीय सहभाग...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचाराला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार समीर पारदे यांच्या शिरसंगी व किणे येथील प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार परिसरातील नागरिकांनी केला.


या प्रचारफेरीत सुरेश गिलबिले, सखाराम केसरकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संदीप केसरकर, गणपती पाटील, आकाश सुतार, बाबुराव आडे, सदाशिव वांजोळे, अर्जुन पाटील, पंढरीनाथ कांबळे, सुनील सातवणेकर, निलेश सुतार, संतोष सुतार, दयानंद सुतार, सागर बुरुड, विजय गुरव, राजेंद्र बोडके, रोहित बोडके, संजय कांबळे, पांडुरंग सुतार, वसंत सुतार, संजय हंबीरराव यांच्यासह गावातील युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

शिरसंगी, किणे परिसरात भाजपच्या प्रचाराचा झंझावात; महिला व युवकांचा लक्षणीय सहभाग...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचाराला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार समीर पारदे यांच्या शिरसंगी व किणे येथील प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार परिसरातील नागरिकांनी केला.


या प्रचारफेरीत सुरेश गिलबिले, सखाराम केसरकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संदीप केसरकर, गणपती पाटील, आकाश सुतार, बाबुराव आडे, सदाशिव वांजोळे, अर्जुन पाटील, पंढरीनाथ कांबळे, सुनील सातवणेकर, निलेश सुतार, संतोष सुतार, दयानंद सुतार, सागर बुरुड, विजय गुरव, राजेंद्र बोडके, रोहित बोडके, संजय कांबळे, पांडुरंग सुतार, वसंत सुतार, संजय हंबीरराव यांच्यासह गावातील युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

पेरणोलीतील सुतार समाज बांधवांचा जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार यांना पाठिंबा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आजरा तालुक्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रचारात भारतीय जनता पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. सर्वच ठिकाणी भाजपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कामाचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार यांना पसंदी मिळत आहे. पेरणोली (ता. आजरा) येथील सुतार समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच यावेळी जयवंत सुतार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार देखील सर्वांनी केला आहे.


यावेळी दशरथ अमृते, जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार, पांडुरंग लोंढे, राजू दिक्षित, मुकुंद कांबळे यांच्यासह संभाजी सुतार, काका सुतार, जयदीप सुतार, दिलीप सुतार, आनंदा सुतार, धनाजी सुतार, गोविंदा सुतार, दशरथ सुतार, तानाजी सुतार, विठ्ठल सुतार, मुकुंद सुतार हे समाज बांधव उपस्थित होते.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Friday, January 30, 2026

सर्वसामान्यांना विकासासाठी अभिप्रेत असलेल्या भाजपला साथ द्या : अशोकअण्णा चराटी; देवर्डे, गवसे परिसरात भाजपचा प्रचार दौरा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
सर्वसामान्यांच्या विकासाचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. यामुळे भाजपाने सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पुढील काळात आणखी विकास साधण्यासाठी भाजपाला साथ देऊन कमळ चिन्हावरील उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन भाजपा नेते अशोकअण्णा चराटी यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांच्या प्रचारार्थ देवर्डे व गवसे येथे आयोजित सभेत ते बोलत होते.


चराटी पुढे म्हणाले, भाजपाची एकूण कार्यपद्धती पाहता लोकांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. याचे प्रतिबिंब जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालामध्ये दिसून येईल. तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच जागा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे या निवडणुकीत ज्या विष्णुपंत केसरकर व जयवंतराव शिंपी यांना घेऊन फिरत आहेत, ते केसरकर व शिंपी विधानसभेच्या वेळी कुठे होते?, असा सवालही त्यांनी केला.  पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार म्हणाले, कोणतेही पद नसताना तालुक्याच्या ग्रामीण भागात 50 कोटीहून अधिक निधी आणण्याचे काम केले. आगामी काळात देखील सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहू.


यावेळी स्मिता देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, दशरथ अमृते, बळवंत शिंत्रे, दीपक गवळी, विशाल आढाव, नामदेव बागडी, प्रभाकर बागडी, राजेंद्र पाटील, बाबुराव आढाव, शामराव तानवडे, संजय आढाव, संजय पाटील, ओमकार मळेकर, राजाराम गुरव, शिवाजी सोले, रवींद्र दिवेकर, सचिन पाटील, दिंगबर पाटील, रामचंद्र नेवगे, चंद्रकांत पाटील, सोपान वास्कर, संदेश मोहिते, निलकंठ यादव, आकाश कांबळे, गिरीश पाटील, आदिनाथ पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मोरेवाडी धनगरवाडा येथील धनगर समाज बांधवांचा पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपचे उमेदवार जयवंत सुतार व समीर पारदे यांना पाठिंबा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आजरा तालुक्यात पहिल्यांदाच पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर पक्षांच्या तुलनेने भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचारात मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांनी कोणतेही पद नसताना वाटंगीपैकी मोरेवाडी धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या नवीन बांधकामासाठी 45 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे मोरेवाडी धनगरवाडा येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिलेल्या निधीची जाण ठेवून धनगर समाज बांधवांनी या निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार व पंचायत समिती उमेदवार समीर पारदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच सुतार व पारदे यांच्या विजयाचा निर्धार देखील या समाज बांधवांनी व्यक्त केला.



यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, पेरणोली जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार, वाटंगी पंचायत समिती उमेदवार समीर पारदे, संदीप देसाई, रवी देसाई, उमेश घोरपडे, उदय सरदेसाई, बळवंत शिंत्रे, अजित हारेर, सचिन पाटील यांच्यासह विठोबा आडुळकर, तातोबा आडुळकर, कोंडीबा आडुळकर, भिकाजी कोकरे, धोंडीबा कोकरे, लखू आडूळकर, पांडुरंग आडुळकर, तुकाराम आडूळकर, जगु कोकरे, भागोजी शेळके, जणू बोडेकर, केशव शेळके, लखोजी शेळके, बाबू पिंगळे, थकोजी पिंगळे, थकलो भुईफोडे, बाबू कोकरे, चिमाजी कोकरे, बिरू बोडेकर, बमू थोरवत, बाबू आडुळकर, धाऊ आडुळकर, मधु कोकरे, जानबा कोकरे, गंगाराम कोकरे, भागोजी शेळके, विष्णू धडाम, अशोक धडाम, एकनाथ गावडे, अरुण ढोकरे, पांडुरंग धडाम, अरुण धडाम, पिंटू धडाम, चंद्रू वांद्रे, आप्पा वांद्रे कृष्णा वांद्रे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Thursday, January 29, 2026

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी...


मुंबई, न्यूज नेटवर्क....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.


राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची 31 डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु सन 2025-26 या हंगामात आजअखेर 86 दिवसात 2 लाख 61 हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन 3 लाख 5 हजार क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे दि. 16 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 अखेर गाळप झालेल्या 49 हजार 588.539 मे. टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रूपये 3 हजार 400/- प्रमाणे विनाकपात होणारी रू.16 कोटी 86 लाख इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जुमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली.


हंगाम 2025-26 मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळप सुरू असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप सुरळीत सुरू आहे. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणेमार्फत प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाची उचल केली जात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष मा.ना. हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जात आहेत. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आणन्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले.


यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. सुभाष देसाई कारखान्याचे संचालक श्री. वसंतराव धुरे श्री.विष्णु केसरकर, श्रीउदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधिर देसाई, संचालक श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री अनिल फडके, श्री.दिपक देसाई, श्री.रणजित देसाई, श्री. संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरुकटे, श्री. राजेश जोशीलकर, श्री. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली. श्री.संभाजी पाटील. श्री. अशोक तर्डेकर श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

लाडक्या बहिणींच भाजपला विजयी करणार : जयवंत सुतार; सुळे येथे प्रचार मेळावा...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
महिलांच्या सक्षमीकरणाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीने लाडकी बहीण ही योजना राबवली आहे. या योजनेचा फायदा लाखो महिलांना होत आहे. ही योजना पुढील काळातही चालूच राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कमळाला मतदान करून भाजपला बळकटी द्यावी असे आवाहन पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते सुळे (ता. आजरा) येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार दौऱ्या दरम्यान बोलत होते. वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समीर पारदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


सुतार पुढे म्हणाले, पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास आराखडा आम्ही तयार केला आहे. त्या माध्यमातून यापूर्वी सुमारे 50 कोटीहून अधिक रकमेची विकास कामे केली आहेत. पुढील काळातही अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी देण्याचा आमचा मानस आहे. मतदारसंघात भेडसावणारी रोजगार निर्मितीला विशेष प्राधान्य आमदार पाटील यांच्या माध्यमातून राहील. देशात, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सर्वांनी भाजपला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच शिल्पा डोंगरे, उपसरपंच संदीप चव्हाण, बळवंत शिंत्रे, अमित फडके, संदीप कोकितकर, अमृत फडके, दिलीप रेडेकर, संदीप सूर्यवंशी, सागर रेडेकर, अनिल आपके, नारायण रेडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
===========================

Tuesday, January 27, 2026

पेरणोली गटात पाच उमेदवार तर उत्तुर गटात तीन उमेदवार रिंगणात; जाणून घ्या आजरा तालुक्यातील गट व गण निहाय उमेदवार....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज माघारीनंतर पेरणोली गटासाठी पाच उमेदवार, उत्तुर गटासाठी तीन उमेदवार असे मिळून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तूर गण पाच उमेदवार, भादवण गण तीन उमेदवार, पेरणोली गण पाच उमेदवार, वाटंगी गण पाच उमेदवार असे पंचायत समिती साठी एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तोपर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.


माघारी नंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार पुढील प्रमाणे...
पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस
संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट
विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट
सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट
महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष

पंचायत समिती भादवण मतदार संघ :
जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट
भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट
साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष

पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट
अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी
जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष
यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष

पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी
सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट
राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट
किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष
नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष

जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट
शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष

जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी
विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट
सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट
सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष
सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

सगळीकडे मीच म्हणणाऱ्यांनी आता तरी थांबले पाहिजे : अभिषेक शिंपी यांचा शिवसेना शिंदे गटाच्या आजरा येथील पत्रकार परिषदेत टोला


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
विरोधक गाजराची शेती करण्याचे काम करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत सोयीसाठी कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीचे शब्द देवून ठेवायचे आणि निवडणुका आल्या की मीच उमेदवार म्हणून पुढे यायचे अशी काही मंडळींची सवय आहे. सगळीकडे मीच म्हणणाऱ्यांनी आता तरी थांबले पाहिजे, असा सूचक टोला अभिषेक शिंपी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आजरा येथील पत्रकार परिषदेत लगावला.


स्वागत इंद्रजीत देसाई यांनी केले. शिवसेना शिंदे गटाचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विष्णुपंत केसरकर म्हणाले, मी जिथे जाईन तिथे गुलाल आहे. गत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांच्या साक्षीने जिल्हा परिषद उमेदवारीचा मला शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेलेला नाही. हा प्रकार म्हणजे लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरं नाही असा आहे. सुधीर देसाई यांना सर्वच सत्ता स्थानी आपल्याकडे ठेवायचे आहेत. निवडणुकीतील ऋणातून उतराई होण्याचा कोणताही प्रयत्न ते करत नाहीत. आगामी गोकुळ दुध संघ, जिल्हा बँक निवडणुकीसाठीच्या वेगळ्या पॅटर्नची मुहूर्तमेढ या निवडणुकीच्या माध्यमातून रोवली गेलेली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उत्तर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विठ्ठल उत्तूरकर, तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख विजय थोरवत, पंचायत समिती उमेदवार सतीश फडके, रणजीत सरदेसाई, बाळ केसरकर, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, राजू पोतणीस यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मराठी विश्वकोश हे अधिकृत माहितीचे स्रोत : डॉ. आलोक जत्राटकर, आजरा महाविद्यालयात मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा संपन्न....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
समाजमाध्यमांवरील माहिती ही अधिकृत नसते. ती संभ्रम निर्माण करणारी असते. मात्र मराठी विश्वकोश हेच अधिकृत माहितीचे स्रोत आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी येथे केले. राज्य शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत उदघाटक म्हणून डॉ. जत्राटकर बोलत होते. जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.


रोजच्या जीवनव्यवहारात व्हॉट्सअप विद्यापीठाच्या आहारी न जाता अधिकृत माहितीचा स्रोत म्हणून विश्वकोश हाताळले पाहिजेत, असे सांगून डॉ. जत्राटकर पुढे म्हणाले की, एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिकाच्या धर्तीवर निर्माण केलेल्या या मराठी विश्वकोशास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सर्वप्रथम भारतीय चेहरा प्रदान केला. विश्वकोशामध्ये नोंदलेखन करण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाने संबंधित विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, लेखक व संशोधकांचे सहाय्य घेण्याचे ठरवले आहे. नोंदलेखन करत असताना ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे. सत्याशी कोणतीही तडजोड न करता नोंदलेखन केले पाहिजे. तसेच नोंदलेखन करताना पूर्वग्रह नसावा, असेही ते म्हणाले. तीन सत्रामध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेत डॉ. होमी भाभा संशोधन केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विजय लाळे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा खोब्रागडे आणि डॉ. रवींद्र घोडराज यांनी नोंद लेखनासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यशाळेस जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. कृष्णा येसणे, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोजकुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील यांच्यासह गडहिंग्लज,आजरा, चंदगड, गारगोटी परिसरातील सत्तरहून अधिक प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक यांनी सहभाग नोंदवला.  कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी केले तर कार्यशाळेचे समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न

 
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क.... 
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चेअरमन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे  अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

         
संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करणेत आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक प्रकाश पाटील व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना ये‍थे संचालक डॉ.सुजित मिणचेकर, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव, बिद्री चिलिंग सेंटर कर्मचारी भरत देवर्डेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर कर्मचारी शरद जोशी व मारुती मोकाशी यांच्‍या हस्‍ते करणेत आले. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Monday, January 26, 2026

संविधान आपल्या जगण्याचा आधार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान प्रतिपादन


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक 'लोकशाही प्रजासत्ताक' म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहिलो. 'प्रजासत्ताक' म्हणजे जिथे प्रजेची, म्हणजेच सामान्य माणसाची सत्ता असते. अशा प्रत्येक सामान्य माणसाचा जगण्याचा आधार आपले संविधानच आहे, असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. त्यांच्या हस्ते कोल्हापूरमधील मुख्य प्रजासत्ताक दिनाचा समारंभ पोलीस परेड क्रिडांगणावर पार पडला. यावेळी त्यांनी देश, स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान याबाबत योगदान दिलेल्या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करीत आदरांजली वाहिली. समारंभ प्रसंगी प्रथम संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.  यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, आणीबाणीतील सहभागी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपस्थित जेष्ठ नागरिकांना पुष्प देऊन पालकमंत्री आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले. पहिल्यांदाच पोलीस परेड येथील भव्य क्रीडांगणावर हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. पालकमंत्र्यांनी परेड कमांडर आरांक्षा यादव परिविक्षाधीन भापोसे यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केले. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उषाराजे हास्कुलच्या विद्यार्थ्यांनी गोंधळगीत सादर करून विविध शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवयितमधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली.

या समारंभात जिल्हावासीयांना उद्देशून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भाषण केले. आपल्या शुभेच्छा संदेशात व भाषणात पालकमंत्री आबिटकर म्हणाले, आपल्या महाराष्ट्राच्या मातीने देशाला नेहमीच दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 'रयतेचे राज्य' ही संकल्पना मांडली, जी आजच्या लोकशाहीचा मूळ आधार आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक महापुरुषांच्या त्यागातूनच आज आपण ही लोकशाही उपभोगत आहोत. तरुण हे देशाचे भविष्य असून स्वातंत्र्यसैनिकांनी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते समृद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. शिस्त, समर्पण आणि राष्ट्रप्रेम हे गुण अंगी बाळगून आपल्याला देशाला विश्वगुरू बनवायचे आहे, यासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हुतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, संविधानातील मूल्ये जपण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याला व देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया, असेही ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनार व विद्या पाटील यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मानले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...: अर्जुन आबिटकर यांचे घाटकरवाडी येथे सूचक विधान; पेरणोली जि. प. उमेदवार विष्णुपंत केसरकर यांना बाळ केसरकर यांच्यासह अनेकांचा पाठिंबा...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विष्णुपंत केसरकर यांना अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी आपल्या समर्थकांसह पाठिंबा दिला. बाळ केसरकर यांचा पाठिंबा हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी घाटकरवाडी (ता. आजरा) येथे सूचक विधान केले. यामुळे पुढील दोन-चार दिवसात शिवसेना उमेदवार विष्णुपंत केसरकर यांना मोठा पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. यावेळी पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील इच्छुक उमेदवार सुरेश पाटील यांनी विष्णुपंत केसरकर यांना जाहीर पाठिंबा देत आपली उमेदवारी माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.


बाळ केसरकर यांच्या समर्थकांच्या मेळाव्याचे स्वागत सुळेरानचे सरपंच शशिकांत कांबळे यांनी करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर म्हणाले, बाळ केसरकर व सुरेश पाटील यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. आगामी काळात त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. घाटकरवाडी व परिसराच्या विकासासाठी निधी देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना हा भाग जसे मताधिक्य देतो तसेच मताधिक्य जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना द्यावे. पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाभिमुख कामामुळे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवाहात सामील होण्यास अनेक मंडळी तयार आहेत. अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर म्हणाले, घाटकरवाडी परिसराच्या विकासासाठी या भागातील व्यक्तीचा पंचायत समिती स्वीकृत किंवा तालुक्यातील समिती सदस्यासाठी विचार व्हावा. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार विष्णुपंत केसरकर, पंचायत समिती उमेदवार श्वेता सरदेसाई, राजू पोतनीस, सहदेव नेवगे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, विजय थोरवत, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, संकेत सावंत, संतोष पाटील, डॉ. तानाजी जाधव, शंकर पाटील (आंबाडे), सागर पाटील (किटवडे), देवदास सावंत (किटवडे), जयसिंग पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. गंगाराम डेळेकर यांनी आभार मानले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मतदान संविधानाने दिलेला अमूल्य अधिकार : जिल्हाधिकारी अमोल येडगे; मतदार दिनानिमित्त पथनाट्याचे आयोजन, नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप, मतदान कर्मचाऱ्यांचा सन्मान....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा अवलंब करीत संविधानाने प्रत्येक १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. १६ वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी कार्यालयात तरुण मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी नवमतदारांना उद्देशून कार्यक्रमात मतदानाचे महत्त्व, मतदान प्रक्रिया व यंत्रणा याविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, उपजिल्हाधिकारी निवडणूक गीता गायकवाड, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार सुनिता नेर्लीकर, मैत्रीय संघटनेच्या मयुरी आळवेकर यांच्यासह नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, “माझा भारत माझे मत, मी भारत आहे. हे यावर्षीचे राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रिदवाक्य असून, देशातील ९६.८ कोटी मतदारांना संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क अमूल्य आहे. या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे मतदानादिवशी सुट्टी आहे म्हणून इतरत्र न जाता मतदान करून आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या. मतदार नोंदणी आयोगाने अधिक सुलभ करीत आपल्या अडचणी सोडविण्यासाठी नियुक्त बीएलओची मदत कधीही घेता येईल. कोल्हापूर जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करणारी मतदान केंद्रे आहेत. जिल्हा नेहमीच मतदान टक्केवारीत आघाडीवर आहे, परंतु अजून पुढे जाऊन राष्ट्रीय मतदार दिनी सर्व मतदारांनी मतदानावेळी मतदान करण्याचा संकल्प करूया, असे सांगत युवकांनी जनजागृती करीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार म्हणाले, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला मिळालेला प्रमुख अधिकार म्हणजे मतदान होय. ब्रिटिश राजवटीनंतर आता मतदानातून आपण आपले राज्यकर्ते निवडून देतो. हे करीत असताना प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करायला हवा. मतदानात अमिषाला बळी न पडता युवकांनी मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी निवडणूक गीता गायकवाड यांनी केले. त्यांनी मतदार दिनाचे महत्त्व सांगत, जागृत मतदार हीच लोकशाहीची खरी ओळख आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरात विविध पथनाट्यांचे सादरीकरण झाले. यात १२५ मुलींचे शासकीय वसतिगृह मराठा कॉलनी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी, सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या संदर्भात पथनाट्य सादर केले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नवमतदारांना जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रतीक्षा कोंडूसकर, यश सुतार, प्रथमेश गायकवाड, वेंकटेश घंटे यांचा समावेश होता. त्याचबरोबर निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात निवडणूक नायब तहसीलदार बाबुराव बोडके, पोपट पाटील, महसूल सहायक राहूल दोंडे, लिपिक नंदकिशोर नलवडे, मुख्याध्यापक रवींद्र मोरे, पर्यवेक्षक के. व्ही. बसागरे, श्रीकांत पोवार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी रेखा पाटील, सारिका पाटील, संगीता साळोखे, संगणक परिचालक रणजित जाधव व संदीप कुबडे यांचा समावेश होता. राष्ट्रीय स्तरावरील कोल्हापूरचे शाहीर आझाद नायकवडी यांनी मतदान जनजागृतीपर पोवाडा सादर केला. तसेच मैत्रीय संघटनेच्या मयुरी आळवेकर यांचाही सन्मान झाला. उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदानाची प्रतिज्ञा घेतली. आभार नायब तहसीलदार बाबुराव बोडके यांनी मानले, तर सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Saturday, January 24, 2026

गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकासाचे व्हिजन असणाऱ्या भाजपला साथ द्या : तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी; जि. प. उमेदवार जयवंत सुतार, पं. स. उमेदवार स्मिता देसाई यांच्या प्रचारार्थ दाभिल परिसरात प्रचार दौरा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
गल्ली पासून दिल्लीपर्यंत विकास साधण्याची किमया भारतीय जनता पार्टी वेगाने करत आहे. आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे भाजपा करत आली आहे, इथून पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी यांनी केले. ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारार्थ दाभिल (ता. आजरा) येथे बोलत होते. भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांच्या प्रचारार्थ दर्डेवाडी, दाभील, मेढेवाडी, खेडगे, पारपोली गावात संपर्क दौरा झाला. या संपर्क दौऱ्याला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला.


तालुकाध्यक्ष चराटी पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत तळागाळात पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सर्वच भाग सुजलाम सुफलाम होत आहे. यावेळी सर्वच भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला. यावेळी उमेदवार जयवंत सुतार, उत्तम देसाई, आनंदा कातकर, दीपक गवळी, विनायक परुळेकर, गजानन वास्कर, प्रकाश कविटकर, बळवंत शिंत्रे, लहू वाकर, अनिल नार्वेकर, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, लहू मस्कर, शशिकांत पाटील, तुकाराम राणे, संभाजी हसबे, विश्वास गवळी, राजवर्धन सरदेसाई, अमृत देसाई, अनिल केरकर, प्रकाश शेटगे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग राणे, विठोबा पाटील, कुंडलिक सुतार, तुकाराम दळवी, पुंडलिक पाटील, मारुती पाटील, ईश्वर पाटील, बाळकृष्ण घाटकर, शिवाजी गुरव, संतोष दळवी, सुरेश वास्कर, मारुती कांबळे, दत्तू घाटकर, अनिकेत दळवी, पंकज वास्कर यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे होणार आहे.


या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे. मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी  दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.२० ते १०.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेपूर्वी  किंवा १० वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

लोकवाद्ये ही आपल्या लोकजीवनाचा आत्मा : ऋषिकेश देशमाने, आजरा महाविद्यालयात लोकवाद्यांवरील कार्यशाळा संपन्न...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
लोकवाद्ये ही केवळ लाकूड किंवा चामड्याचे तुकडे नसून, लोकवाद्ये ही आपल्या लोकजीवनाचा आत्मा आहेत. त्यात आपल्या संस्कृतीचा प्राण वसलेला आहे. नवीन पिढीने या वाद्यांचे महत्त्व ओळखून ती शिकणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत लोकवाद्ये अभ्यासक आणि संग्राहक ऋषिकेश देशमाने यांनी व्यक्त केले. आजरा महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत 'लोकवाद्ये समजून घेताना' या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून श्री. देशमाने बोलत होते. प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी समन्वयक डॉ. मल्हारराव ठोंबरे, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते.


लोकवाद्ये ही मानवी संस्कृतीचा अनमोल ठेवा
आहे. असे सांगून श्री. देशमाने पुढे म्हणाले की, संगीत ही मानवाला निसर्गाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. माणसाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वरांचा आणि तालाचा आधार घेतला, त्यातूनच लोकवाद्यांचा जन्म झाला. लोकवाद्ये म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती आपल्या मातीचा सुगंध, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. लोकवाद्ये ही त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचे प्रतिबिंब असतात. महाराष्ट्रातील ढोलकी, तुतारी, संबळ किंवा एकतारी ही वाद्ये इथल्या मातीतील चैतन्य दर्शवतात. सण-उत्सव, जत्रा, लग्नकार्य किंवा शेतीकामाचा थकवा घालवण्यासाठी ही वाद्ये वाजवली जातात. ही वाद्ये आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीची ओळख करून देतात. लोकवाद्यांचा आवाज समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणतो. लोक आपापसातील भेद विसरून एकत्र येतात. भजन, कीर्तन, भारुड किंवा पोवाडा यांसारख्या लोककलांमधून सामाजिक प्रबोधन करण्याचे काम ही वाद्ये करतात. समाजात एकोपा टिकवून ठेवण्यासाठी लोकवाद्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लोकवाद्यांच्या माध्यमातून आनंद, उत्साह, भक्ती आणि कधीकधी दुःखही व्यक्त केले जाते. बहुतेक लोकवाद्ये ही निसर्गातील वस्तूंपासून बनलेली असतात. लाकूड, चामडे, बांबू, माती आणि धातू यांचा वापर करून ही वाद्ये तयार केली जातात. यामुळे मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते अधोरेखित होते. ही वाद्ये वाजवताना जो नाद निर्माण होतो, तो निसर्गातील आवाजांशी साधर्म्य राखणारा असतो. लोकवाद्ये बनवणे ही एक मोठी कला आहे. यामुळे अनेक कारागिरांना रोजगार मिळतो. मात्र आजच्या आधुनिक युगात पाश्चात्य वाद्यांच्या अतिवापरामुळे आपली पारंपरिक लोकवाद्ये काहीशी मागे पडत आहेत. या वाद्यांचे जतन करणे म्हणजे आपल्या वारशाचे जतन करणे होय. म्हणूनच लोकवाद्यांचा हा नाद असाच घुमत राहिला तरच आपली संस्कृती जिवंत राहील, असे मत श्री. देशमाने यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे स्वागत डॉ आप्पासो बुडके यांनी, प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी, पाहुण्यांची ओळख अथर्व मोहिते याने करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कांबळे आणि निदा इंचनाळकर यांनी तर विवेक कोंडूसकर याने उपस्थितांचे आभार मानले. विक्रांत सावंत, समृद्धी तांबेकर, विवेक पाटील, संचिता तरडेकर, परशुराम राणे, प्रथमेश कुंभार , सुप्रिया घुरे, श्रेया पसारे, ऋतुजा धडाम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Thursday, January 22, 2026

अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा...


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बांधकाम विभागाकडील कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत श्री अंबाबाई विकास आराखडा, श्री जोतीबा विकास आराखडा, खिद्रापूर, सारथी इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शेंडा पार्क अशा विविध बांधकाम सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना प्रशासनास केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक तथा आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य अभियंता श्री. रहाणे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.

शासनाकडून यापूर्वी निधी मंजूर असलेल्या व सद्यस्थितीत कामे सुरू असलेल्या कामकाजाबाबत पुरातत्त्व व बांधकाम विभागाने सादरीकरणातून माहिती दिली. यावेळी मनीषा म्हैसकर यांनी उपस्थितांना सूचना केल्या. त्या म्हणाल्या, सर्व मंजूर कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत. प्रत्येक कामांचे विविध टप्प्यांमध्ये विभागणी करून आराखडे सादर करावेत. प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामे हाती घ्या, त्यानंतर निधी प्राप्त होईल तशी पुढील कामे मंजुरीसाठी घ्या. मंदिर विकास आराखड्यांची अंमलबजावणी करताना भूसंपादनासह त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या. वाढलेले भाव विचारात घेऊन नागरिकांना पुनर्वसनाचे पर्याय दिल्यास त्यांनाही त्याठिकाणी अडचणी राहणार नाहीत. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित प्राधान्यक्रम ठरवून कामांचे क्रम निश्चित करावेत. प्रथम आवश्यक कामांना निधी खर्च करावा. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक असून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्यासह स्थानिकांना सोयी-सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रथम विचार व्हावा. बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली. स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती व पुस्तिका देऊन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले.  बैठकीनंतर त्यांनी श्री अंबाबाई व श्री जोतिबा मंदिरातील कामांची पाहणी केली. त्यासोबतच त्यांनी नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचीही पाहणी केली.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्जाची छाननी; जाणून घ्या मतदारसंघनिहाय पक्ष व अपक्ष पात्र अर्ज, मंगळवारच्या माघारी नंतर होणार चित्र स्पष्ट

आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांची गुरुवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालय आजरा येथे छाननी करण्यात आली. छाननीनंतर पात्र अर्जांची प्रसिद्धी करण्यात आली आहे. मंगळवार (दि. 27) रोजी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


छाननी नंतर पात्र अर्ज पुढील प्रमाणे...
पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस
संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट
विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट
सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट
महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष
चंद्रकांत ईश्वर गोरुले (बहिरेवाडी), अपक्ष
व्यंकटेश बंडेराव मुळीक (उत्तूर), अपक्ष

पंचायत समिती भादवण मतदार संघ :

जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट
भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट
साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष
विजया जनार्दन निऊंगरे (मडीलगे), अपक्ष
श्रीदेवी महादेव पाटील (गजरगाव), अपक्ष
वर्षा विकास बागडी (कोवाडे), अपक्ष

पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट
अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी
जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष
मनीषा गोविंद गुरव (हरपवडे), अपक्ष
रेखा रणजीत पाटील (गवसे), अपक्ष
रूपाली धनंजय पाटील (साळगाव), अपक्ष
वंदना राजाराम पाटील (देवर्डे), अपक्ष
सुमन राजाराम पोतनीस (सातेवाडी), अपक्ष
यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष
रचना राजाराम होलम (पोळगाव), अपक्ष

पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी
कृष्णा विष्णू पाटील (होनेवाडी), शिवसेना ठाकरे गट
सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट
राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट
किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष
शंकर गोविंद कुराडे (लाकूडवाडी), अपक्ष
संजय अर्जुन तरडेकर (जेऊर), अपक्ष
बळवंत जानू शिंत्रे (आजरा), अपक्ष
अशोक मारुती शिंदे (मलिग्रे), अपक्ष
नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष
संजय बाळू सांबरेकर (चितळे), अपक्ष

जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट
शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष
वैशाली उमेश आपटे (उत्तूर), अपक्ष
परशुराम ईश्वर कांबळे (मडीलगे), अपक्ष
धनश्री मानसिंग देसाई (आजरा), अपक्ष
अश्विन अर्जुन भुजंग (जाधेवाडी), अपक्ष

जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी
विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट
सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट
सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष
संदीप मारुती चौगले (शिरसंगी), अपक्ष
रामचंद्र भिकू पाटील (घाटकरवाडी), अपक्ष
राजाराम पांडुरंग पोतनीस (सातेवाडी), अपक्ष
सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष
रणजितकुमार सूर्यकुमार सरदेसाई (लाटगाव), अपक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Wednesday, January 21, 2026

आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 21 तर पंचायत समितीसाठी 41 अर्ज दाखल, जाणून घ्या मतदारसंघ निहाय दाखल अर्ज...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आजरा तालुक्यात जोरात सुरू आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाखेर आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटासाठी 18 जणांचे 21 तर पंचायत समितीच्या चार गणासाठी 39 जणांचे 41 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी दाखल अर्जांची छाननी होणार आहे.


दाखल अर्ज पुढील प्रमाणे...
पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
विकास वसंत चोथे
चंद्रकांत ईश्वर गोरुले
संभाजी राजाराम कुराडे
अभिजीत अमृत आरेकर
सागर शशिकांत वागरे
महेश काशिनाथ करंबळी
व्यंकटेश बंडेराव मुळीक

पंचायत समिती भादवण मतदार संघ :
विजया जनार्दन निऊंगरे
जयश्री गजानन गाडे
भारती कृष्णा डेळेकर
साधना संजय केसरकर
श्रीदेवी महादेव पाटील
वर्षा विकास बागडी
स्वप्नाली किरण केसरकर

पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
यशोदा युवराज पोवार
रचना राजाराम होलम
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई
अस्मिता दत्तात्रय कांबळे
रूपाली धनंजय पाटील
सुमन राजाराम पोतनीस
रेखा रणजीत पाटील
जिजाबाई महादेव कांबळे
वंदना राजेंद्र पाटील
स्मिता उत्तम देसाई
गुरव मनीषा गोविंद

पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
किरण विश्वनाथ कोरे
राजाराम गुणाजी होलम
नरसू बाबू शिंदे
कृष्णा विष्णू पाटील
समीर दशरथ पारदे
शंकर गोविंद कुराडे
संजय अर्जुन तरडेकर
संजय बाळू सांबरेकर
बळवंत ज्ञानू शिंत्रे
अशोक मारुती शिंदे
सतीश गणपती फडके
राजाराम पांडुरंग पोतनिस

जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
शिरीष हिंदुराव देसाई
विठ्ठल महादेव उत्तूरकर
अश्विन अर्जुन भुजंग
धनश्री मानसिंग देसाई
वैशाली उमेश आपटे
उमेश मुकुंदराव आपटे
परशुराम ईश्वर कांबळे

जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
सुधीर राजाराम देसाई
सुरेश कृष्णा शिंगटे
सुधीर रामदास सुपल
रणजितकुमार सूर्यकुमार सरदेसाई
जयवंत मसणू सुतार
रामचंद्र भिकू पाटील 
राजाराम पांडुरंग पोतनीस
विष्णू मोतबा केसरकर
संदीप मारुती चौगले
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...