चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड तालुका भारतीय जनता पार्टी युवक मोर्चाच्या वतीने जागतिक रक्तदान शिबिर निमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिर मध्ये 110 रक्तदात्यांनी रक्त देऊन शासनाला सहकार्य केले. सांगलीच्या मानस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले. यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, चंदगड तालुका भाजप अध्यक्ष मलिकार्जुन मुंगेरी, उपाध्यक्ष संदीप नांदवडेकर यांच्यासह विशाल पाटील, सुनील कानेकर, गोविंददादा पाटील, चंदगड शहराध्यक्ष योगेश कुडतरकर, नितीन फाटक, भावकु गुरव, कृष्णा कोलकर, चेतन बांदविडेकर, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, समीर पिळनकर, संदीप देसाई, दौलत वर्पे यांच्यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment