गारगोटी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळ नांदगावकर यांच्या वाढदिवसा निमित्त राधानगरी मतदारसंघातील गरजू मुलांना महाराष्ट्र नवनिर्माण जनहित सेनेचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे यांच्यामार्फत"स्कुल बॅग" वाटप के ले.
या वेळी बोलताना युवराज येडूरे म्हणाले, बाळ नांदगावकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गरजू मुलांना "स्कुल बॅग" वाटप करताना साहेबांच्या आदेशाप्रमाणे स्कुल बॅग शक्यतो जे सरकारी शाळेत शिकत आहे व ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशांना दयावी. हे करण्यामागचा हेतू हा आपल्या बांधवांचे ओझे कमी करण्याचा आहे त्यांचे मानसिक ओझे वाढविण्याचा नव्हे, त्यामुळे स्कुल बॅग वर कसल्याही प्रकारचे स्टिकर, फोटो लावून त्यांना कमीपणा वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच स्कुल बॅग ज्यांना देत आहोत त्यांना देतांना अथवा त्यांच्या बरोबर अजिबात फोटो काढू नये. हे करतांना ज्यांना शक्य आहे , व अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे असल्याचा संदेश दयावा या सुचनेप्रमाणे आम्ही स्कुल बॅग वाटप केले. या वेळी मनसे जनहित पक्षाचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे ,मनसे जनहित पक्षाचे भुदरगड तालुका अध्यक्ष सतीश थवी, अमित कोरे, समीर अमणगी मनसे सैनिक उपस्थित होते, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी बाळा नांदगावकर साहेब यांचे आभार मानले व वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा दिल्या.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment