Sunday, May 31, 2020

आजरा तालुक्यात पुन्हा चार पॉझिटिव्ह; दिवसभरात दहा नवे रूग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

 आजरा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. रविवारी दिवसभरात दहा रुग्ण आढळले आहेत. दुपारी सत्रात तालुक्यात सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यानंतर आलेल्या अहवालात आणखी चार कोरोनाबाधीत सापडले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४५ वर पोहचली आहे. रविवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये श्रृंगारवाडी गावातील चार, बहिरेवाडी गावातील दोन, देवर्डे गावातील दोन, बेलेवाडीतील एक, चिमणे गावातील एकाचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडिया
7410168989

आजरा तालुक्याची अर्धशतकाकडे वाटचाल; रविवारी सापडले सहा नवे रुग्ण


आजरा (प्रतिनिधी) :

 आजरा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. रविवारी दुपारी सत्रात तालुक्यात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४१ वर पोहचली आहे. रविवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये श्रृंगारवाडी गावातील तीन, बहिरेवाडी गावातील दोन तर चिमणे गावातील एकाचा समावेश आहे.


बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडिया
7410168989

Friday, May 29, 2020

होम क्वारंटाईनचा नियम मोडला; कुटुंबाला 40 हजारांचा दंड


मुंबई (प्रतिनिधी) :

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा म्हणून जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात आहे. पण, या काळात बाहेरुन आलेल्या व्यक्तीसह कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश आहेत. पण, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कुटुंबाने नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या कुटुंबावर तब्बल 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आर्वी येथील सिंधी कॅम्पमधील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबियांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं पुढे आलं. हे लोक क्वारंटाईनमध्ये राहण्याऐवजी सर्रासपणे बाहेर फिरले असल्याचे पुढे आलं. यामुळे त्या कुटुंबावर गुन्हा दाखल करत 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.


आर्वी शहरात अकोला येथून महिला एक महिन्याच्या बाळासह माहेरी आली. यामुळे या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या कुटुंबातील लोक बाहेर फिरल्याने ते अनेकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता आहे.

चार भावंडाचं हे कुटुंब एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. त्यांचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी ते एकाच इमारतीत एकाच घरात राहतात. या भावंडांपैकी एकाची बेकरी आहे. होम क्वारंटाईनचे आदेश असतानाही या व्यक्तीने बेकरी उघडली, उत्पादन केले आणि विक्रीही केली. त्यामुळे ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे.

ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच या कुटुंबातील चारही जणांविरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासह प्रतिव्यक्ती प्रमाणे 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

चार दिवसानंतर आजरा तालुक्यात कोरोनाचे नवे तीन रुग्ण; तालुक्याची रूग्णसंख्या ३५


आजरा (प्रतिनिधी) :

सोमवारी आजरा तालुक्यात एकाच दिवशी सोळा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गेले चार दिवस तालुक्यात एकही नवा रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता शुक्रवारी पुन्हा तीन रूग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण संख्या ३५ झाली आहे. आज सापडलेले रुग्ण भादवण, बेलेवाडी व जाधेवाडीतील आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडिया
7410168989

Thursday, May 28, 2020

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवसात १४ नवे रूग्ण


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्याचे कोरोना मीटर वाढतच चालले आहे. गुरूवारी तर कोरोनाने कहरच केला. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातत २५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यापैकी १४ अहवाल एकट्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. यामध्ये यमेहट्टी गावचे पाच, मुंगुरवाडीतील पाच तर महागाव, बेळगुंदी,  कुमरी व हसुरवाडी गावातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात पुन्हा खळबळ माजली आहे. तालुक्यातील एकून रूग्णांची संख्या तीस झाली आहे. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Wednesday, May 27, 2020

चौथा लॉकडाऊन संपायच्या आत लॉकडाऊन 5 चे संकेत; ही 11 शहरं 31 मेनंतरही राहणार बंद?


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 

कोरोनाव्हायरसमुळं ठप्प झालेले व्यवहार चौथ्या लॉकडाऊनमध्ये थोडे थोडे खुले व्हायला सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात रेल्वे आणि विमान सेवा सुरू झाली आहे. पण तरीही COVID-19 चा प्रादुर्भाव असलेले रेड झोन पूर्ण बंद आहेत. महाराष्ट्रात तर या साथीने कहर केला आहे. त्यामुळे चौथा लॉकडाऊन संपायच्या आधीच पाचवा लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण अजूनही साथ आटोक्यात आलेली नाही. उलट वाढतेच आहे. आता चौथा लॉकडाऊन संपायच्या आतच लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू आहे. पण हा पाचवा लॉकडॉऊन स्वयंस्फूर्तीने असेल. याचे निर्बंध आणि नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यतः कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या 11 शहरांपुरता तो मर्यादित असू शकतो.

देशभरात सापडलेल्या एकूण कोरोना प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं फक्त या 11 शहरांमध्ये आहेत. त्यामुळे ही शहरं वगळता अन्यत्र व्यवहार सुरळीत व्हायला संधी देण्याची शक्यता आहे. या 11 मधली 3 शहरं महाराष्ट्रातली आहेत.

कोणती आहेत 11 शहरं : दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, ठाणे, जयपूर, सुरत, इंदोर

देशात रोज 7 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं आता सरकार 31 मेनंतर काय करणार, याकडे सर्वांचे लश्र लागले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो. वर उल्लेखलेल्या 11 शहरांतच देशातले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे ही महानगरं वगळता इतरत्र व्यवहार सुरू करायला परवानगी दिली जाऊ शकते.

बातम्या व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Tuesday, May 26, 2020

दिलसादायक; मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

सोमवारी सकाळी 10 ते मंगळवारी रात्री 8 पर्यंत 1762 प्राप्त अहवालापैकी 1696 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 66 अहवाल निगेटिव्ह) आहेत. मंगळवारी कोल्हापूर  जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. हा मोठा दिलासा आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 378 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील दिली.

 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 119, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373 आणि पुणे -1,  सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 378 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

आजरा साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात


आजरा (प्रतिनिधी) :

गवसे येथील आजरा साखर कारखाना 125 कोटीच्या कर्जासाठी कोल्हापूर जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतला आहे. जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी साखर गोडावूनसह मशीनरी सील करण्यात आल्या. सन २०१९-२० चा कारखान्याचा हंगाम होऊ शकला नाही. आता जिल्हा बँकेकडून कारखाना चालू करण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत

Monday, May 25, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा चारशे पार; सहा रुग्ण कोरोनामुक्त


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

सोमवारी एका दिवसात कोरोनाचे 68 पोझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या 409 वर पोहचली आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात 31 रुग्णाचा तर काही वेळा पूर्वी 37 रुग्णाचा अहवाल आला पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
741016898

आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी १६ पॉझिटिव्ह


आजरा (प्रतिनिधी) :

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजरा तालुक्यात तर कोरोनाने कहर केला आहे. सोमवारी (दि. २५) रोजी एकाच दिवशी सकाळच्या अहवालात तालुक्यातील तब्बल १६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे तालुक्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येने १६ वरून थेट ३२ वर उडी घेतली आहे. एकाच दिवसात तालुक्याची आकडेवारी दुप्पट झाली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. १२ गावातील एकूण १८ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात श्रृंगारवाडी येथील दोघांचा पुन्हा समावेश झाल्याने आज १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेलेवाडी, वडकशिवाले, बहिरेवाडी, वझरे, चाफवडे, भादवणवाडी, देवकांडगाव, पराेली, चव्हाणवाडी या गावातील प्रत्येकी - १ तर चिमणे- ३, अारदाळ- २, भादवण-२. अशा रूग्णांचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडिया
7410168989

Sunday, May 24, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 317 पॉझीटिव्ह; शाहूवाडीत सर्वाधिक 102


 कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी रात्री 9 वाजता 593 प्राप्त अहवालापैकी 31 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 509 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 नाकारण्यात आले, प्रलंबित 50 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 पॉझीटिव्ह रूग्ण आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 317 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 102 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

आज दिवसभरात आलेल्या 31 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-1, भुदरगड-2, चंदगड-7, कागल-4, पन्हाळा-1, राधानगरी-5, शाहूवाडी-7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4 असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 16, भुदरगड- 35, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 3, कागल- 5, करवीर- 10, पन्हाळा- 16, राधानगरी- 47, शाहूवाडी- 102, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 313 आणि पुणे -1,  कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 317 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

आजरा तालुक्यातील खेडगे येथील एकजण कोरोनाबाधित




आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील खेडगे येथे कोरोना बाधित युवक आढळला आहे. सद्यस्थितीतील अलगीकरण शेतातील घरी करण्यात आले होते. मुंबईहून गावी सदर व्यक्ती १३ मे रोजी गावी आली होती. यामुळे आजरा तालुक्यातील रूग्णांची संख्या १६ झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पहिल्यांदाच रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Saturday, May 23, 2020

श्रृंगारवाडी येथील आणखी दोघे कोरोनाबाधित; आजरा तालुक्यातील संख्या १५


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी येथील आणखी दोघांचा कोरोनाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. यामध्ये एक स्त्री व एका पुरूषाचा समावेश आहे. यापूर्वी १९ रोजी या गावातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे श्रृंगारवाडीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या तीन झाली आहे. तसेच यामुळे आता आजरा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. सदर रुग्ण मुंबईहून गावी १५ व १७ मे रोजी आले होते. हे रूग्ण सध्या आजर्‍यातील कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडिया
7410168989

Friday, May 22, 2020

चंदगड तालुक्याचा वाढला खतरा; रूग्ण संख्या झाली सतरा


चंदगड (प्रतिनिधी) :

चंदगडमध्ये आज एकूण 4 नवे रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे. चिंचणे गावातील रुग्णाच्या संपर्कातील आणखी दोन जण पोजिटिव्ह आले आहेत.  शिवणगे आणि इब्राहिमपूर गावात प्रत्येक एका रुग्णाची वाढ झाली आहे.

तालुक्यातील एकूण रुग्णांची आकडेवारी 

अलबादॆवी १
गवसॆ  ३
सोनारवाडी १
चिंचणॆ १
नागणवाडी १
इब्राहिमपूर १ 
तेउरवाडी २
बोजुर्डे १ 
नागवे २

आज आलेल्या रिपोर्टनुसार रुग्णांची संख्या 
शिवणगॆ १
इब्राहिमपुर १
चिंचणॆ २

गडहिंग्लजची पाचवरून तेरावर उडी; दोन लहान मुलांचा समावेश


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

शुक्रवार (दि. २२) रोजी सायंकाळी गडहिंग्लज तालुक्याला धक्कादायक अहवालाला सामोरे जावे लागले. या वेळेच्या अहवालात गडहिंग्लज तालुक्यात आठ नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. गडहिंग्लज तालुक्यात आता रूग्णसंख्या 5 वरून थेट 13 वर पोचली आहे. नव्या रुग्णात सांबरे 1, हडलगे 1 ,  तावरेवाडी 1, तेरणी3, हनिमनाळ 1, गिजवणे 1 अशी आहे. हे सर्व रुग्ण मुंबईवरून आलेले आहेत. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना वाढता वाढे; शुक्रवारी दुपारी नवे ९ रूग्ण


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरूवार अखेर जिल्ह्यात कोरोनाचे २२८ रूग्ण होते. शुक्रवारी दुपारी त्यात पुन्हा नऊ रूग्णांची वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात एकूण २३७ रूग्णांची नोंद झाली आहे.

किणे येथील दोघे कोरोनाबाधित; आजरा तालुक्यातील संख्या १३


आजरा (प्रतिनिधी) :

रात्रीच्या अहवालावरून आजरा तालुक्यातील किणे येथील दोघेजण पाॅझीटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे. कोल्हापूर येथील सीपीआर येथे तीन दिवसांपूर्वी स्वॅब देवून  किणे येथे होम कोरोंटाईंन करण्यात आले होते. प्रशासन किणे येथे दाखल झाले आहे. यामुळे आता आजरा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे.

Thursday, May 21, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून सुरू काय काय होणार?; जाणून घ्या


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

राज्य शासनाने केलेल्या नॉन रेड झोन जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार विविध उद्योग व व्यवसाय सुरू ठेवले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवार (दि. २२) पासून नियमांच्या पालनासह सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. 

हे सुरु राहणार :

- जिल्हांतर्गत बससेवा (50 टक्के क्षमता)
-केशकर्तनालय, सलून, स्पा
-रिक्षा 1+2 प्रवासी (चालक आणि 2 प्रवासी)
- चारचाकी 1+2 प्रवासी (चालक आणि 2 प्रवासी)
- मद्यविक्री
- दुचाकी 1 जण
- सरकारी कार्यालये
- दुकाने 9 ते 5 पर्यंत
- उद्योग, बांधकाम,जीवनावश्‍यक वस्तू, मालवाहतूक
- मेडिकल, हॉस्पिटल
- खासगी कार्यालये
- बॅंक, कुरियर
- ई- कॉमर्स दुकाने
- घरपोच साहित्ये
- आरटीओ, निबंधक ऑफिस
- सर्व मैदाने ( फक्त वैयक्तिक व्यायाम करिता, सोशल डिस्टन्स ठेऊन करणे)

 हे बंद राहणार :

प्रवास, रेल्वे, विमान, मेट्रो, आंतरराज्य रस्ते वाहतूक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटल, मॉल, मंदिर, प्रार्थनास्थळ.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

आजरा तालुक्यातील झुलपेवाडीतील महिला कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित रूग्ण सापडला नसल्याने दिलासा मिळत असतानाच गुरूवारी सायंकाळी एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. झुलपेवाडीतील बोरिवली मुंबई येथून १८ मे रोजी गावी परतलेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला होम क्वाँरटाईनमध्ये होती. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे. प्रशासनाने झुलपेवाडी गावच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.

धक्कादायक; अर्धा कोटी कोरोना


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : 

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 51 लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच जगाची कोरोबाधितांची संख्या अर्धा कोटीच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 99,685 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,738 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 29 हजार 292 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 20 हजार 151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1,12,028 रुग्ण, तर 3,434 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 59,028 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 41,968 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 15,91,953 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 94,992 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,704 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 2,48,293 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,888 लोकांचा मृत्यू झालाय. 2,79,524 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,330 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,27,364 इतका आहे.

जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

अमेरिका : कोरोनाबाधित- 15,91,953, मृत्यू- 94,992

रशिया : कोरोनाबाधित- 3,08,705, मृत्यू- 2,972

ब्राझील : कोरोनाबाधित- 2,93,357, मृत्यू- 18,894

स्पेन : कोरोनाबाधित- 2,79,524, मृत्यू- 27,888

यूके : कोरोनाबाधित- 2,48,293, मृत्यू- 35,704

इटली : कोरोनाबाधित- 2,27,364, मृत्यू- 32,330

फ्रांस : कोरोनाबाधित- 1,81,575, मृत्यू- 28,132

जर्मनी : कोरोनाबाधित- 1,78,531, मृत्यू- 8,270

टर्की : कोरोनाबाधित- 1,52,587, मृत्यू- 4,222

इरान : कोरोनाबाधित - 1,26,949, मृत्यू- 7,183


12 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 94 हजारांवर गेला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Wednesday, May 20, 2020

गडहिंग्लज तालुक्यातील भडगावचा युवक कोरोनाबाधित


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्याच्या ग्रामीण भागात पोहचलेला कोरोना आता गडहिंग्ल शहराजजवळ पोहचला आहे. तालुक्यातील भडगावमधील रुग्ण कोरोनाबाधित आहे. सदर 24 वर्षीय युवक असून मुंबईहून परतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा १६ जणांना कोरोना; दिवसभरात ३५ सापडले

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

मंगळवारी उशीरा कोरोना बाधितांच्या पॉझिटिव्ह  अहवालामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६ झाली असताना बुधवारी पुन्हा १९ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. या १९ रूग्णांमध्ये शाहूवाडी - 11, पन्हाळा-1, शिरोळ 4 व राधानगरी 3 अशा १९ जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर आता आणखी १६ रूग्णांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १७१ झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा १९ जणांना कोरोना

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

मंगळवारी उशीरा कोरोना बाधितांच्या पॉझिटिव्ह  अहवालामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६ झाली असताना बुधवारी पुन्हा १९ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५५ झाली आहे

Tuesday, May 19, 2020

धक्कादायक; मंगळवारी पुन्हा ३९ कोरोना पॉझिटिव्ह


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्ण सापडण्याचा वेग वाढतच आहे. यामुळे प्रशासनाबरोबरच जिल्हावासियांची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी सायंकाळी आणखी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १२२ झाली आहे. गेले चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठ्या वाढ होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह; चारही आजरा तालुक्यातील


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे चारही आजरा तालुक्यातील आहेत. यामध्ये 3 जण बेलेवाडी मधील तर 1 जण  भादवन मधील आहे. यामुळे कोल्हापूरातील रुग्णांची संख्या 87 वर पोहचली आहे.

कोल्हापूरकरांना दिलासा; ऑरेंज झोन कायम


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना मीटर वाढतच चालले आहे. सोमवारी रात्रीच्या गोंधळानंतर प्रशासनाने अखेर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या जाहीर केली. प्रशासनाने जिल्ह्यात मंगळवारी दुपारपर्यंत ८३ कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याचे सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रूग्ण सापडल्याने जिल्हा रेड झोनमध्ये जाणार याची भिती जिल्हावासियांना होती. अखेर काही वेळापूर्वी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील जिल्ह्यांचे झोन जाहीर केले. यामध्ये जिल्हावासियांच्या दृष्टीने दिलासादायक गोष्ट म्हणजे यात जिल्ह्याचा अॉरेंज झोन कायम ठेवला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, अौरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या जिल्ह्यात रेडझोन कायम आहे. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

आजर्‍याची बाजारपेठ २५ पर्यंत बंद; व्यापारी असोसिएशनचा निर्णय


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील आतापर्यंत ६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यामुळे आजरा बाजारपेठ मेडिकल सेवा वगळता सोमवार (दि. २५) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आजरा व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने घेण्यात आला. याबाबत येथील दुरदुंडेश्वर मठात शहरातील मेडिकल वगळता सर्व व्यापार्‍यांची बैठक झाली. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे अशक्य होत आहे. त्यामुळे स्वत:च्या संरक्षणासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. शहरातील मेडिकल दुकानेही सकाळी १० ते २ या वेलकेत सुरू राहणार आहेत.

आजरा तालुक्यातील आणखी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीचा एकजण कोरोना पाॅझीटीव्ह सापडला आहे. सदर व्यक्ती मुंबई येथून आलेली आहे पण 15 मे पासून प्राथमिक शाळेत होते कोरोंटाईन करण्यात आले होते. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी श्रृंगारवाडी गावच्या सिमा सील करण्याचे आदेश दिले आहेत.

गडहिंग्लज तालुक्यात सोमवारी सापडले तीन नवे कोरोनाबाधित


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर आणि रात्री असे एकूण ४८ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यामुळे रुग्णांचा आकडा १०२ वर पोहोचला आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण यमेहट्टी व काळामवाडी या गावातील आहेत. दोघेही मुंबईहून आलेले आहेत. सध्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात आहेत. शनिवारी कळविकट्टे या गावातील मुंबईवरून आलेला युवक कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. या तीन नव्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता चारवर पोहोचली आहे.

धक्कादायक; कोल्हापूर जिल्ह्यात १०१ कोरोनाबाधित, सोमवारी दिवसभरात सापडले ५२ पॉझिटिव्ह



कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मीटर वाढतच जात आहे. सोमवारी दिवसभरात ५२ रूग्ण सापडले अाहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने कोरोनाग्रस्तांचा शंभरीचा आकडा पार केला आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या १०१ झाली आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील ३८ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Monday, May 18, 2020

सोमवारी रात्री आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह; दिवसभरात सापडले २३ रूग्ण


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मीटर वाढतच जात आहे. सोमवारी दिवसभरात १८ रूग्ण सापडले असतानाच पुन्हा रात्री ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सोमवारी एकूण २३ कोरोनाचे नवे रूग्ण सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री सापडलेले रूग्ण पन्हाळा, हातकणंगले, करवीर, शाहूवाडी या तालुक्यातील तसेच कोल्हापूर शहरातील आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ७२ झाली आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील ३८ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी



कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वाढत असतानाच सोमवारी कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचार सुरू असलेल्या ३८ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील रहिवासी आहे. सदर व्यक्ती मुंबईहून आलेली होती. कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला बळी इचलकरंजी येथील ६० वर्षीय व्यक्ती ठरली. दरम्यान आज सोमवारी दिवसभरात १७ कोरोना बाधीत सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ झाली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

सोमवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा दशावतार


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

सोमवारी सकाळी ५ तर दुपारी २ कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ उडालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सायंकाळी १० कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६६ इतकी झाली आहे. सायंकाळी सापडलेल्यामध्ये कोल्हापूर शहरातील पाचजणांचा, पन्हाळा व करवीर तालुक्यातील एकाचा तर शाहूवाडीतील चार जणांचा समावेश आहे.

पाचनंतर पुन्हा दोन; पती-पत्नीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी दिवसभरात १४ रूग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सोमवारी सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर अवघ्या काही तासात आणखी दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील मालसवडेमधील पती-पत्निला कोरोनाची लागण झाली आहे. पती ३३ वर्षीय असून पत्नी ३० वर्षीय आहे हे दोघेही अलगिकरण कक्षात होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५७ झाली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी पाच कोरोनाबाधीत; आजरा तालुक्यातील दोघांचा समावेश


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी पुन्हा पाच कोरोना बाधीत आढळले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 वर पोहचला. यामध्येआजरा तालुक्यातील 2 आणि राधानगरी तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आजरा तालूक्यातील हालेवाडी येथील २४ वर्षीय युवकासह २० वर्षीय महिलेचा समावेश आहे. राधानगरी तालुक्यातील ३९ वर्षीय महिला व ५८ वर्षाचा पुरूष हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर सीपीआर रुग्णालयातील  २८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

Sunday, May 17, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारनंतर पुन्हा चार; चिंतेत वाढ


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

रविवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात चार कोरोना बाधित आढळले असतानाच पुन्हा दुपारनंतर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सार्‍यांचेच धाबे दणाणले आहेत. रविवारी दिवसभरात एकूण आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधिताची संख्या ४४ झाली आहे. सकाळी भुदरगड, आजरा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एकजण तर सीपीआर रूग्णालयातील एक डॉक्टर कोरोना बाधीत आढळले आहेत. दुपारी अहवाल अालेल्यामध्ये एक महिला, एक लहान मुलगा तर दोन पुरूषांचा समावेश आहे. सदर रूग्ण भुदरगड व पन्हाळा तालुक्यातील आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

साळगावात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी


आजरा (प्रतिनिधी) :

साळगाव (ता. आजरा) येथील शेतकरी निवृत्ती आनंदा सुतार (वय ५५) हे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सुतार हे नंबर नावाच्या शेताकडे काजू गोळा करण्याकरिता गेले होते. त्याचवेळी शेतात असलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सुतार यांच्या गळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. काही दिवसापूर्वी वेळवट्टी येथे शेतकर्‍यांवर हल्ला करणार्‍या गव्याकडून हाही हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा चार; आजरा व भुदरगड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

रविवारी कोल्हापूरात आणखीन 4 कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर मधील 23 वर्षांच्या तरुणीला, शाहुवाडीतील 22 वर्षांच्या तरुणाला, आजरा मधील 49 वर्षांच्या पुरुषाला तर भुदरगड मधील 32 वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण 13 आणि 15 मे रोजी सीपीआर मध्ये दाखल झाले होते. आज सकाळी त्यांचे रिपार्ट  पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे.

Saturday, May 16, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी सातजण कोरोना पॉझिटिव्ह


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी सातजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यातील कोरोना रूग्णात वाढ होत आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकाच वेळी एतक्या संख्येने कोरोनाबाधित सापडल्याने सारेच धास्तावले आहेत. सापडलेले रूग्ण जयसिंगपूर, खिंडी व्हरवडे तसेच तांबाळे येथील आहेत. या सात जणांमध्ये मुंबईहून आलेले पाच तर सोलापूरहून आलेल्या दोघांचा समावेश आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हा रेड झोनमध्ये जाणार का? याचीच चर्चा सुरू आहे. मुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३५ झाली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Friday, May 15, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारीही आणखी दोन कोरोना बाधित


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. शुक्रवारी दोन रुग्ण सापडले. एक रूग्ण कोल्हापूर येथील असून दुसरा इचलकरंजी शहरातील आहे. दोघांवरही कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असतानाच अचानक गेले आठवडाभर रूग्ण सापडत असल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

Thursday, May 14, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी सापडले कोरोनाबाधित


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस चिंतेत भर पडत आहे. गेले दोन दिवस प्रत्येकी तीन रूग्ण सापडले असताना आज पुन्हा दोन रूग्ण सापडले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर उर्फ मलकापूरमधील 30 वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह तर इचलकरंजी मधील 20 वर्षीय एक तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शित्तुरमधील महिलेने आपल्या पती आणि ड्रायव्हरसोबत मुंबई वरून प्रवास केला होता. 11 मे रोजी त्यांना सीपीआर मध्ये दाखल केले होते. पती आणि ड्रायव्हर यांचा रिपोर्ट अध्याप अप्राप्त, पण दोघांना येथील शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक अलगीकरण केले आहे. दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण इचलकरंजी मधील त्याच्यावर सुद्धा आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूरातील रुग्णांची संख्या 27 झाली आहे.

३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात ठाकरे सरकारचं एकमत



मुंबई (प्रतिनिधी) :

राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही.  केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे.


मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.

या बैठकीत लॉकडाउन ३१ मे पर्यंत कायम ठेवण्यावर एकमत झालं आहे. सोबतच उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. पण करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचंही समजत आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारडून घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

वाढदिवस दिनीच काळाचा घाला; गडहिंग्लजच्या युवा उद्योजकाची दुर्दैवी एक्झिट


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज येथील युवा हॉटेल व्यावसायिक व प्रियदर्शिनी पतसंस्थेचे अध्यक्ष राहूल पाटील यांचे गुरूवारी वाढदिवसा दिवशीच हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाल्याने सार्‍यांनाच धक्का बसला. बुधवारी रात्रीपासून राहूल पाटील यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा सोशल मिडियावर देणार्‍या हातांना लागलीच श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग अोढावला. नगरसेविका शुभदा पाटील यांचे पती तसेच गडहिंग्लज अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक व्ही. एस. पाटील यांचे ते चिरंजीव होत.

Tuesday, May 12, 2020

मोदीकडून चौथ्या लॉकडाऊनची सूतोवाच


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. देशात १७ मे पर्यंत तिसरा लॉकडाऊन आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधन करणार होते. ते नेमकी काय घोषणा करणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची नियमावली १८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारत आत्मनिर्भर योजनेसाठी २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत पहिला लॉकडाऊन, त्यानंतर ३ मेपर्यंत दुसरा तर १७ मेपर्यंत तिसरा लॉकडाऊन करण्यात आला होता. तसेच संचारबंदीदेखील लागू करण्यात आला आहे.  लोकांना घरातच राहण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रूग्ण


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. पहिला रूग्ण केर्ले येथील २३ वर्षीय आहे. तो तामिळनाडू येथे कामासाठी होता. तर दुसरा तरूण शाहूवाडी तालुक्यातील माणगाव येथील आहे. हा २० वर्षीय तरूण विक्रोळी मुंबई येथून आला आहे. सदर तीनही रूग्णांना सीपीआरच्या कोरोना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या २१ झाली आहे. ग्रामीण भागातही रूग्ण आढळू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

कोरोनातही त्यांनी केले रास्ता रोको आंदोलन; कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

इचलकरंजी सांगली रस्त्यावर परप्रांतीय कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे शेकडो कामगार रस्त्यावर उतरले होते. यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीतील हे सर्व कामगार आहेत. घरी जाण्यासाठी वाहनाची सोय करण्याची मागणी करण्यात आली होती. गेले दोन महिने कामाविना बसून असल्याने कामगार संतप्त झाले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. हाताला काम नाही त्यात खायलाही काही नाही त्यामुळे आपल्या मूळगावी जाण्याची सोय करा या मागणीसाठी हजारपेक्षा जास्त कामगार रस्त्यावर उतरले होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

हारूरशी संबधित सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह


आजरा (प्रतिनिधी) :

शुक्रवारी रात्री उशीरा आजरा तालुक्यातील हारूर येथील दोन व्यक्तींचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह अाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या संबधित एकूण ३१ जणांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या दिवशी परजिल्हा व परराज्यातून आलेल्या आणखी २२ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी पाठविण्यात आलेले एकूण ५३ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सोमवारी पाठविण्यात आलेले स्वॅबचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...