गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर आणि रात्री असे एकूण ४८ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यामुळे रुग्णांचा आकडा १०२ वर पोहोचला आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण यमेहट्टी व काळामवाडी या गावातील आहेत. दोघेही मुंबईहून आलेले आहेत. सध्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात आहेत. शनिवारी कळविकट्टे या गावातील मुंबईवरून आलेला युवक कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. या तीन नव्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता चारवर पोहोचली आहे.
No comments:
Post a Comment