आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यातील खेडगे येथे कोरोना बाधित युवक आढळला आहे. सद्यस्थितीतील अलगीकरण शेतातील घरी करण्यात आले होते. मुंबईहून गावी सदर व्यक्ती १३ मे रोजी गावी आली होती. यामुळे आजरा तालुक्यातील रूग्णांची संख्या १६ झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पहिल्यांदाच रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment