Sunday, May 24, 2020

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 317 पॉझीटिव्ह; शाहूवाडीत सर्वाधिक 102


 कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी रात्री 9 वाजता 593 प्राप्त अहवालापैकी 31 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 509 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 नाकारण्यात आले, प्रलंबित 50 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 पॉझीटिव्ह रूग्ण आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 317 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 102 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

आज दिवसभरात आलेल्या 31 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-1, भुदरगड-2, चंदगड-7, कागल-4, पन्हाळा-1, राधानगरी-5, शाहूवाडी-7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4 असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 16, भुदरगड- 35, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 3, कागल- 5, करवीर- 10, पन्हाळा- 16, राधानगरी- 47, शाहूवाडी- 102, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 313 आणि पुणे -1,  कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 317 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...