Wednesday, May 27, 2020

चौथा लॉकडाऊन संपायच्या आत लॉकडाऊन 5 चे संकेत; ही 11 शहरं 31 मेनंतरही राहणार बंद?


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 

कोरोनाव्हायरसमुळं ठप्प झालेले व्यवहार चौथ्या लॉकडाऊनमध्ये थोडे थोडे खुले व्हायला सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात रेल्वे आणि विमान सेवा सुरू झाली आहे. पण तरीही COVID-19 चा प्रादुर्भाव असलेले रेड झोन पूर्ण बंद आहेत. महाराष्ट्रात तर या साथीने कहर केला आहे. त्यामुळे चौथा लॉकडाऊन संपायच्या आधीच पाचवा लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण अजूनही साथ आटोक्यात आलेली नाही. उलट वाढतेच आहे. आता चौथा लॉकडाऊन संपायच्या आतच लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू आहे. पण हा पाचवा लॉकडॉऊन स्वयंस्फूर्तीने असेल. याचे निर्बंध आणि नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यतः कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या 11 शहरांपुरता तो मर्यादित असू शकतो.

देशभरात सापडलेल्या एकूण कोरोना प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं फक्त या 11 शहरांमध्ये आहेत. त्यामुळे ही शहरं वगळता अन्यत्र व्यवहार सुरळीत व्हायला संधी देण्याची शक्यता आहे. या 11 मधली 3 शहरं महाराष्ट्रातली आहेत.

कोणती आहेत 11 शहरं : दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, ठाणे, जयपूर, सुरत, इंदोर

देशात रोज 7 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं आता सरकार 31 मेनंतर काय करणार, याकडे सर्वांचे लश्र लागले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो. वर उल्लेखलेल्या 11 शहरांतच देशातले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे ही महानगरं वगळता इतरत्र व्यवहार सुरू करायला परवानगी दिली जाऊ शकते.

बातम्या व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...