Friday, June 27, 2025

कोल्हापूर येथील पर्यटक आंबोली येथे ३०० फूट खोल दरीत कोसळला

आंबोली, विकास न्यूज नेटवर्क :
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो ३०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे या पर्यटकाचे नाव असून, ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोध मोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
=======================

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...