आजरा (प्रतिनिधी) :
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजरा तालुक्यात तर कोरोनाने कहर केला आहे. सोमवारी (दि. २५) रोजी एकाच दिवशी सकाळच्या अहवालात तालुक्यातील तब्बल १६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे तालुक्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येने १६ वरून थेट ३२ वर उडी घेतली आहे. एकाच दिवसात तालुक्याची आकडेवारी दुप्पट झाली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. १२ गावातील एकूण १८ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात श्रृंगारवाडी येथील दोघांचा पुन्हा समावेश झाल्याने आज १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेलेवाडी, वडकशिवाले, बहिरेवाडी, वझरे, चाफवडे, भादवणवाडी, देवकांडगाव, पराेली, चव्हाणवाडी या गावातील प्रत्येकी - १ तर चिमणे- ३, अारदाळ- २, भादवण-२. अशा रूग्णांचा समावेश आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडिया
7410168989
No comments:
Post a Comment