Friday, May 29, 2020

होम क्वारंटाईनचा नियम मोडला; कुटुंबाला 40 हजारांचा दंड


मुंबई (प्रतिनिधी) :

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा म्हणून जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात आहे. पण, या काळात बाहेरुन आलेल्या व्यक्तीसह कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश आहेत. पण, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कुटुंबाने नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या कुटुंबावर तब्बल 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आर्वी येथील सिंधी कॅम्पमधील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबियांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं पुढे आलं. हे लोक क्वारंटाईनमध्ये राहण्याऐवजी सर्रासपणे बाहेर फिरले असल्याचे पुढे आलं. यामुळे त्या कुटुंबावर गुन्हा दाखल करत 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.


आर्वी शहरात अकोला येथून महिला एक महिन्याच्या बाळासह माहेरी आली. यामुळे या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या कुटुंबातील लोक बाहेर फिरल्याने ते अनेकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता आहे.

चार भावंडाचं हे कुटुंब एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. त्यांचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी ते एकाच इमारतीत एकाच घरात राहतात. या भावंडांपैकी एकाची बेकरी आहे. होम क्वारंटाईनचे आदेश असतानाही या व्यक्तीने बेकरी उघडली, उत्पादन केले आणि विक्रीही केली. त्यामुळे ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे.

ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच या कुटुंबातील चारही जणांविरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासह प्रतिव्यक्ती प्रमाणे 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...