आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित रूग्ण सापडला नसल्याने दिलासा मिळत असतानाच गुरूवारी सायंकाळी एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. झुलपेवाडीतील बोरिवली मुंबई येथून १८ मे रोजी गावी परतलेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला होम क्वाँरटाईनमध्ये होती. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे. प्रशासनाने झुलपेवाडी गावच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.
No comments:
Post a Comment