Tuesday, May 26, 2020

दिलसादायक; मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

सोमवारी सकाळी 10 ते मंगळवारी रात्री 8 पर्यंत 1762 प्राप्त अहवालापैकी 1696 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 66 अहवाल निगेटिव्ह) आहेत. मंगळवारी कोल्हापूर  जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. हा मोठा दिलासा आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 378 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील दिली.

 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 119, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373 आणि पुणे -1,  सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 378 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...