कोल्हापूर (प्रतिनिधी) :
इचलकरंजी सांगली रस्त्यावर परप्रांतीय कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे शेकडो कामगार रस्त्यावर उतरले होते. यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीतील हे सर्व कामगार आहेत. घरी जाण्यासाठी वाहनाची सोय करण्याची मागणी करण्यात आली होती. गेले दोन महिने कामाविना बसून असल्याने कामगार संतप्त झाले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. हाताला काम नाही त्यात खायलाही काही नाही त्यामुळे आपल्या मूळगावी जाण्याची सोय करा या मागणीसाठी हजारपेक्षा जास्त कामगार रस्त्यावर उतरले होते.
बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment