आजरा (प्रतिनिधी) :
शुक्रवारी रात्री उशीरा आजरा तालुक्यातील हारूर येथील दोन व्यक्तींचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह अाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या संबधित एकूण ३१ जणांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या दिवशी परजिल्हा व परराज्यातून आलेल्या आणखी २२ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी पाठविण्यात आलेले एकूण ५३ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सोमवारी पाठविण्यात आलेले स्वॅबचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment