नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. देशात १७ मे पर्यंत तिसरा लॉकडाऊन आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधन करणार होते. ते नेमकी काय घोषणा करणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची नियमावली १८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारत आत्मनिर्भर योजनेसाठी २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत पहिला लॉकडाऊन, त्यानंतर ३ मेपर्यंत दुसरा तर १७ मेपर्यंत तिसरा लॉकडाऊन करण्यात आला होता. तसेच संचारबंदीदेखील लागू करण्यात आला आहे. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.
Lockdown karun lokanna bhuke marat aahe ghar poch vevastit nahi 2 kg 5 kg ase det aahet kay karnar lok bola modi
ReplyDelete