कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मीटर वाढतच जात आहे. सोमवारी दिवसभरात १८ रूग्ण सापडले असतानाच पुन्हा रात्री ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सोमवारी एकूण २३ कोरोनाचे नवे रूग्ण सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री सापडलेले रूग्ण पन्हाळा, हातकणंगले, करवीर, शाहूवाडी या तालुक्यातील तसेच कोल्हापूर शहरातील आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ७२ झाली आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील ३८ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment