Tuesday, May 19, 2020

आजर्‍याची बाजारपेठ २५ पर्यंत बंद; व्यापारी असोसिएशनचा निर्णय


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील आतापर्यंत ६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यामुळे आजरा बाजारपेठ मेडिकल सेवा वगळता सोमवार (दि. २५) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आजरा व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने घेण्यात आला. याबाबत येथील दुरदुंडेश्वर मठात शहरातील मेडिकल वगळता सर्व व्यापार्‍यांची बैठक झाली. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे अशक्य होत आहे. त्यामुळे स्वत:च्या संरक्षणासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. शहरातील मेडिकल दुकानेही सकाळी १० ते २ या वेलकेत सुरू राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...