Thursday, May 21, 2020

धक्कादायक; अर्धा कोटी कोरोना


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : 

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 51 लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच जगाची कोरोबाधितांची संख्या अर्धा कोटीच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 99,685 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,738 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 29 हजार 292 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 20 हजार 151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1,12,028 रुग्ण, तर 3,434 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 59,028 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 41,968 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 15,91,953 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 94,992 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,704 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 2,48,293 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,888 लोकांचा मृत्यू झालाय. 2,79,524 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,330 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,27,364 इतका आहे.

जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

अमेरिका : कोरोनाबाधित- 15,91,953, मृत्यू- 94,992

रशिया : कोरोनाबाधित- 3,08,705, मृत्यू- 2,972

ब्राझील : कोरोनाबाधित- 2,93,357, मृत्यू- 18,894

स्पेन : कोरोनाबाधित- 2,79,524, मृत्यू- 27,888

यूके : कोरोनाबाधित- 2,48,293, मृत्यू- 35,704

इटली : कोरोनाबाधित- 2,27,364, मृत्यू- 32,330

फ्रांस : कोरोनाबाधित- 1,81,575, मृत्यू- 28,132

जर्मनी : कोरोनाबाधित- 1,78,531, मृत्यू- 8,270

टर्की : कोरोनाबाधित- 1,52,587, मृत्यू- 4,222

इरान : कोरोनाबाधित - 1,26,949, मृत्यू- 7,183


12 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 94 हजारांवर गेला आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

1 comment:

  1. जागतिक स्तरावरील कोविड 19 चा आढावा घेणारी एक परिपूर्ण बातमी

    ReplyDelete

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...