Friday, February 7, 2025

भादवन सरपंच माधुरी गाडे यांचे विरोधात अविश्वास ठराव दाखल


आजरा, विकास न्यूजसेवा :


भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यामुळे भादवन गावातील राजकीय वातावरण तापले आहे. या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

भादवन ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच व अकरा सदस्य अशी रचना आहे.  डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या भादवन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका गटाला सरपंच पद व आठ सदस्य अशा नऊ जागा तर दुसऱ्या गटाला सदस्य पदाच्या तीन जागा मिळाल्या. गेल्या दोन वर्षापासून माधुरी गाडे या  सरपंच पदावर कार्यरत आहेत. मात्र सरपंच आपल्या अधिकार पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करत आहेत. ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत. ग्रामपंचायत कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच  मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका दहा सदस्यांनी ठेवला आहे. अविश्वास ठराव उपसरपंच संजय पाटील, सदस्य अर्जुन कुंभार, बाळकृष्ण सुतार, प्रमोद घाटगे, तानुबाई देवकर, सुनंदा पाटील, नीलम देवलकर, शितल केसरकर, अश्विनी पाटील, संगीता देसाई या दहा सदस्यांनी दाखल केला आहे.
=================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...