कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी पुन्हा पाच कोरोना बाधीत आढळले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 वर पोहचला. यामध्येआजरा तालुक्यातील 2 आणि राधानगरी तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आजरा तालूक्यातील हालेवाडी येथील २४ वर्षीय युवकासह २० वर्षीय महिलेचा समावेश आहे. राधानगरी तालुक्यातील ३९ वर्षीय महिला व ५८ वर्षाचा पुरूष हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर सीपीआर रुग्णालयातील २८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment