कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस चिंतेत भर पडत आहे. गेले दोन दिवस प्रत्येकी तीन रूग्ण सापडले असताना आज पुन्हा दोन रूग्ण सापडले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर उर्फ मलकापूरमधील 30 वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह तर इचलकरंजी मधील 20 वर्षीय एक तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शित्तुरमधील महिलेने आपल्या पती आणि ड्रायव्हरसोबत मुंबई वरून प्रवास केला होता. 11 मे रोजी त्यांना सीपीआर मध्ये दाखल केले होते. पती आणि ड्रायव्हर यांचा रिपोर्ट अध्याप अप्राप्त, पण दोघांना येथील शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक अलगीकरण केले आहे. दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण इचलकरंजी मधील त्याच्यावर सुद्धा आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूरातील रुग्णांची संख्या 27 झाली आहे.
No comments:
Post a Comment