Monday, August 31, 2020

अखेर राज्यातील ई-पासची अट रद्द


मुंबई  (प्रतिनिधी) :

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला ‘अनलॉक ३’ चा टप्पा ३० ऑगस्ट रोजी संपत असून केंद्र सरकारकडून ३० सप्टेंबपासून अनलॉक ४ टप्पा सुरु होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकारने नियमावली जाहीर करताना ई-पासची अट रद्द केली आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत.

बातमी व जाहिरात करीता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Sunday, August 30, 2020

संत गजानन शिक्षण समुहात प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; उस्फूर्त प्रतिसाद, आठ ठिकाणी मार्गदर्शन केंद्राची स्थापना


महागाव (प्रतिनिधी) :

 महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात शैक्षणिक वर्षे 2020-21 साठीच्या प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला  आहे. यासाठी  विद्यार्थ्याकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ज्या विद्याशाखेसाठी प्रवेश उशीराने होणार आहे तेथे तात्पुरता प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
      
संस्थेच्या पॉलिटेक्निक, डि.एम.एल.टी.,नर्सिंग, पॅरामेडीकल, डि.एल.एड., डि.फार्मसी, ज्ञानसागर विद्यानिकेतन, दुरशिक्षण विभागातील डि.एल.टी., पदव्युत्तर विभागाच्या कोर्सेस साठी प्रवेशप्रक्रिया उस्फुर्तपणे सुरु आहे तर बी.फार्मसी, बी.टेक, बी.ए.एम.एस. च्या कक्षेत चौकशी व तात्पुरती प्रवेशप्रक्रियेसाठी नावनोंदणी करण्यात येत आहे. अंतिम मुदतीच्या आत प्रवेश मिळावा यासाठी निपाणी, मुदाळतिट्टा, कोवाड, चंदगड, आजरा, दोडामार्ग, महागाव व हसुरवाडी कँपस येथील केंद्रामध्ये विद्यार्थाना मार्गदर्शन व प्रवेश केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना कागदोपत्र जमवाजमव करण्यात अडचण येत असल्याने शासनाने पॉलिटेक्निक, डी.एम.एल.टी., डी.फार्मसीचे मुदत 4 सप्टेंबर पर्यत वाढविली आहे.
    
 या समुहाच्या शैक्षणिक  कार्याची दखल घेत एम.एस.बी.टी.ई. ने येथील पॉलिटेक्निकला सलग नऊ वर्षे सर्वोत्कृष्ट श्रेणी दिला तर राष्ट्रीय स्तरावरील एन.बी.ए.चा मानाकंन मिळाला आहे. बी.टेकला नॅक व हॉस्पिटलला एन.ए.बी.एच. मानाकंनाबरोबर इतर अनेक राज्यस्तरीय  पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. येथे प्रवेशीत विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सोई सवलती, प्लेसमेंट, शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध असणार आहे. दर्जेदार शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याना नोकरी मिळावी यासाठी संस्था नेहमीच धडपड असते. आजपर्यंत देश विदेशातील नामाकिंत कंपनीत हॉस्पिटल मध्ये प्लेसमेंट उपलब्ध करुन 
हजारो विद्यार्थाचे करिअर घडवला आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत आवश्यक कागदोपत्रासह येऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व डॉ. संजय चव्हाण यानी केला आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Saturday, August 29, 2020

अनलॉक ४ : मेट्रोसह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी; शाळा, महाविद्यालये राहणार बंद


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असुन, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

गृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमाचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

हे राहणार बंद…

अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

आजरा शहरातील सहा व्यावसायिक कोरोनाबाधित; तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३५०


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनामीटर वाढतच आहे. शनिवारी तालुक्यात आणखी १३ जणांचे कोरिनाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३५० झाली. यापैकी २७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा शहरातील सहा व्यावसायिकांचा समावेश आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात २ किराणा दुकानदार, २ कापड दुकानदार, १ सोनार तर १ गॅरेजवाल्याचा समावेश आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पारेवाडी व चांदेवाडी येथील दोन तर धामणे, बेलेवाडी व खोराटवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान शनिवारी सकाळी सोहाळे येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा तालुक्यातील कोरोनाचा आठवा बळी आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......
9049969625 

Thursday, August 27, 2020

हरळी बु. मधील युवकांचा पाण्यात बुडुन मृत्यू; गणेश विसर्जनावेळी दुर्घटना


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीत  युवकाचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना गणेशविसर्जना वेळी घटना घडली. अंकुश नागेश मुरुकटे (वय २३ ) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, हरळी ते इंचनाळ दरम्यान जाणार्‍या हिरण्यकेशी नदीच्या पुलावर सायंकाळी सहाच्या सुमारास हरळी बुद्रुक येथील अंकुश नागेश मुरुकटे, प्रतीक सुरेश खवरे, शैलेश शशी मुरूकटे हे तिघे गणेशविसर्जनासाठी गेले होते. या तिघांनी पोहण्याकरिता पुलावरून उडी मारली. त्यापैकी प्रतीक सुरेश खवरे व शैलेश शशी मुरूकटे दोघे पोहून बाहेर आले. मात्र अंकुश नागेश मुरुकटे हा युवक पोहताना दम लागून पाण्यात बुडाला. माहिती मिळताच पोलीस स्टाफ,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयकडील कर्मचारी यांनी हिरण्यकेशी नदी पात्रात शोध घेतला पण मिळून आला नाही. अंधार असल्याने शोध कार्यात अडथळा येत असल्याने शुक्रवारी सकाळी नागरपालिकेची बोट व कर्मचारीसह शोध घेणार असल्याचे गडहिंग्लज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी माहिती दिली.

Wednesday, August 26, 2020

तिरवडे ग्रामपंचायतीच्यावतीने गणेश विसर्जनाचे नियोजन; ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन


गारगोटी (प्रतिनिधी) :

सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यासाठी शासनाने सोशल डिस्टनबाबत नियमावली जाहीर केली आहे. याचमुळे गर्दी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत तिरवडे-कुडतरवाडी (ता. भुदरगड) यांच्यावतीने गुरूवारी (दि. २७) रोजी होणार्‍या गणेश विसर्जन साठी नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. या दिवशी विसर्जन करण्यासाठी गल्लीवार करण्यात आलेले नियोजन पुढीलप्रमाणे : वरची गल्ली - दुपारी २ ते ३,  सुतार व गुरव गल्ली - दुपारी ३ ते ४, पाटील गल्ली व मदारी अंबारी रोड - सायंकाळी ४ ते ५, मराठी शाळेपासून मेन रोड ते कट्टा व आंबेडकर नगर - सायंकाळी ५ ते ६ असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ज्या त्या गल्लीतील नागरिकांनी दिलेल्या वेळेचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

पुन्हा बदली; नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे


मुंबई (प्रतिनिधी) :

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.

तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे करोनाची लागण झाल्याने सध्या विलगीकरणात आहेत. त्यांनीच ट्विट करत आपल्याला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. “मला करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:चं अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

राधानगरी कोविड सेंटरसाठी जम्बो अॅक्सिजन सिलेंडर देण्याची सुशिल पाटील कौलवकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


राधानगरी (प्रतिनिधी) :

सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना सर्वत्र सुरू आहे. राधानगरी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. तालुका डोंगराऴ व दुर्गम आहे. या परिस्थितीत तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्याकरिता राधानगरी कोविड सेंटरसाठी साहित्याची मागणी काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सुशील पाटील कौलवकर यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुशिल पाटील कौलवकर यांनी राधानगरी कोविड सेंटरसाठी सुसज्य रुग्णवाहिका, ऑक्सिजन जंबो सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन त्वरित मिळावी अशी मागणी जिल्हाचे पालकमंत्री बंटी पाटील यांच्याकडे केली. बंटी पाटील यांनी देखील या मागणीची गंभीर दखल घेऊन हे साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश संबधित विभागाला दिले आहेत.

बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Tuesday, August 25, 2020

प्राजक्ताच्या यशाने चंदगडचा मुंबई डंका


चंदगड (प्रतिनिधी) :

 मुंबईमध्ये बालविकास विद्यामंदिर जोगेश्वरी पूर्व, सर्वोदय नगर येथील शाळेमध्ये दहावीला  प्राजक्ता नाना मासरणकर हिने ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे शाळेमधून तसेच नातेवाईकमंडळी, ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत आहे. प्राजक्ता हिचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील वाळकुळी हे असून ती आपल्या घरच्यांसोबत मुंबईला रहायला होती. तसेच बालविकास शाळेमध्ये शिक्षण घेत होती. या मुंबईतील धावपळीच्या जीवनात अत्यंत मेहनत, जिद्द आणि सराव, अभ्यास केल्याने हे यश मिळाले अशी त्यांच्या पालकांकडून प्रतिक्रिया आली आहे. प्राजक्ताने मिळवलेल्या यशामुळे चंदगड तालुक्याचे नाव मुंबईसारख्या ठिकाणी एक उत्तम पायंडा घालण्यात यशस्वी ठरले.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Monday, August 24, 2020

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

   
रायगड (प्रतिनिधी) :

 महाड शहरात पाच मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती दिली आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली आहे. पोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. इमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Sunday, August 23, 2020

चंदगड तालुक्यातील माळी येथे महानेट केबलचे नुकसान; कारवाईची मागणी


चंदगड (प्रतिनिधी) :

 राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला फायबर आँप्टीकल महानेटनी जाेडायचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महानेट प्रकल्प २ या नावाने हा प्रकल्प आेळखला जाताे. राज्य शासनाने महानेट अंतर्गत काम युद्ध पातळीवर सुरू करुन चंदगड तालुक्यातील हे काम पुर्णत्वाला आले आहे. चंदगड तालुक्यातील   काेकरे, न्हावेली, उमगाव, जांबरे, नागवे येथील भाग हा दुर्गम भाग म्हणून पाहिले जाते, या भागात संपर्क करण्यासाठी काेणतेही नेटवर्क उपलब्ध नाही या सर्व बाबींचा विचार करून महानेटने या भागाला प्रथम प्राधान्य देवुन येथील काम पुर्णत्वास आणले  होते. पण काही समाजकंटकांनी माळी गावाजवळील नदीच्या पुलावर केलेले सिमेंट काँक्रीट फाेडुन त्यातील 6 J I पाईप व त्यातील डक चाेरला आहे, त्यामुळे शासनाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. अगाेदरच नेटवर्क पासुन वंचित असलेल्या भागात महानेट मुळे आशेचा किरण दिसत हाेता पण अश्या काही समाजकंटकांनी ताेही नाहीसा केला, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणार्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी ही मागणी आत्ता जाेर धरु लागली आहे.


बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Friday, August 21, 2020

प्रवासासाठी ई-पासची अट रद्द होण्याची शक्यता; राज्य शासन विचाराधीन

   
मुंबई (प्रतिनिधी) : 

सध्या एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणारा ई पास रद्द करण्याबाबत राज्य सरकारच्या स्तरावर विचार सुरू आहे. मात्र ई पास बंद केले तर लोक कोणत्याही बंधनाशिवाय सर्वत्र मुक्त संचार करतील आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढेल अशी भीतीही सरकारला वाटत आहे. 



तमाम गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

ई पास बाबत लोकांच्या अनेक तक्रारी असून त्याची दखल राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका जिल्हय़ातून दुसर्‍या जिल्ह्यात तुम्ही एसटी बसने विना ई पास जाऊ शकता. मात्र तुम्हाला खाजगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जायचे असेल तर ई पास अजूनही बंधनकारक आहे. एसटीने प्रवास करताना ई पास नाही मग खाजगी वाहनाने प्रवास करणार्‍यांसाठीही ई पासची अट का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळेच आता ई पास पूर्णपणे बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी मुख्यमंत्री चर्चा करून निर्णय घेतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ई-पास मिळत नाही आणि एजंट मार्फत गेले तर लगेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून  नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने हि ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यामुळे  एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे ई-पास बंद करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Wednesday, August 19, 2020

खुशखबर; आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात करता येणार एसटीने प्रवास




मुंबई (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.

कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी एसटी सेवा ठप्प झाली. मुंबई विभागात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजही एसटी धावत होती. राज्यातील इतर विभागात देखील एसटीची तुरळक सेवा सुरु होती. कोरोनाच्या या महामारीत एसटी लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत धावली. इतकंच नाही तर राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी थेट कोट्यापर्यंत पोहचली. तिथून महाराष्टाच्या कानाकोपऱ्यापर्यंत धावली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, लॉकडाऊनमुळे 113 दिवसाच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच 2300 कोटींचा महसूल बुडाला.

याआधी परिवहन विभागाने मे महिन्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु "लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यामध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला," असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं. तसंच आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

आजरा नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विलास नाईक


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी विलास आण्णासो नाईक यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. यावेळी आजर्‍याचे तहसिलदार विकास अहिरे उपस्थित होते. 

Saturday, August 15, 2020

अलविदा....!;धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती. २०१९ विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. परंतु विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याशी बोलून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला लावलं. मध्यंतरीच्या काळात संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावी अशी मागणी होत होती. परंतु धोनीला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.

धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर

एकूण सामने – ५३८

एकूण धावा – १७,२६६

शतकं – १६

अर्धशतकं – १०८

षटकार – ३५९

झेल – ६३४

स्टंपिंग – १९५

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Thursday, August 13, 2020

आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कोरोनाबाधीत


आजरा (प्रतिनिधी) :

   आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आजरा शहरात खळबळ माजली आहे. कोरोनाबाधीत तलाठी यांच्या संपर्कात आल्यामुळे ते स्वतः हून क्वारंटाईन झाले होते. मात्र आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Wednesday, August 12, 2020

आजरा तालुक्यात बुधवारी दिवसभरात नवे १५ कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्य़ेत दिवसेंदिवस  वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात तालुक्यात नव्या १५ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्याची एकूण संख्या २२५ झाली आहे. बुधवारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये आजरा शहरातील मुल्ला कॉलनीतील तीन, साळगाव येथील तीन, उत्तूरमधील चार, बहिरेवाडी येथील दोन तर वेळवट्टी, हरपवडे, हारूर  येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरातील १५ रुग्णांमध्ये ११ पुरूष व ४ स्त्रियांचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Tuesday, August 11, 2020

दिलासादायक....; अखेर रशियात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या लसीची मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा याच लसीचा डोस देण्यात आला असे पुतिन यांनी सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला करोना व्हायरसवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकच गोष्ट म्हणाले होते कि, “करोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला करोनावर लसीची निर्मिती करायची आहे.”

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Monday, August 10, 2020

आजर्‍याचे उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांचा राजीनामा


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. जेष्ठ नगरसेवक विलास नाईक यांची उपनगराध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी आघाडीतून नाईकवाडे निवडून आले होते. मात्र काही काळानंतर सत्ताधारी प्रमुख व नाईकवाडे यांच्या मध्ये मतभेद झाले. त्यातच कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राजिनामा देण्याची मागणी गटप्रमुख अशोक चराटी यांनी केली पण नाईकवाडे यांनी राजीनामा दिला नव्हता. अखेर सत्ताधारी मंडळींनी नाईकवाडे यांची मनधरणी केली. आपल्यामुळे विकासात अडचणी निर्माण होत असतील तर आपण राजिनामा देण्याची तयारी दर्शविली. सोमवारी सायंकाळी चराटी यांच्याकडे राजिनामा दिला.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

तासिका तत्त्वावरील पीएचडी प्राप्त प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची मनसेच्या युवराज येडूरे यांची मागणी


गारगोटी (प्रतिनिधी) :

राज्यातील तासिका तत्त्वावरील सेट - नेट, पीएच.डी. प्राप्त तासिका तत्त्वावरील  प्राध्यापकांना महाविद्यालयातील रिक्त जागांवर पूर्णवेळ कायम करून महाविद्यालयातील रिक्त जागांवर कायम करणेबाबत त्यांना न्याय द्यावा,अशी मागणी मनसे जनहित सेनेचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे मेल द्वारे केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटने कडून सुद्धा वेळोवेळी निवेदन दिले आहेत, या मागणीचा त्वरित विचार करावा.
सदर निवेदनात म्हटले आहे की
 1) CHB प्राध्यापकांचा LAST WORKING DAY २८ फेबुवारी पर्यंत न पकडता तो ५ मार्च पर्यत ठेवावा तसेच मराठवाडा विभागात सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या CHB प्राध्यापकांना नियमानुसार १० चा कार्यभार असतांना त्यांना च तासिका कुठल्या नियमानुसार दिल्या जातात यातून CHB प्राध्यापक व विद्यार्थी यांची सरळ फसवणूक शासन करीत आहे. 
2)प्राध्यापक पदभरती संदर्भात 03 नोव्हेंबर 2018 चा निर्णय फसवा असून जुन ते २२ ऑक्टोबर २०१० च्या केंद्र सरकार , UGC ने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाने त्वरित 100% पदभरती करावी. 
3)CHB प्राध्यापकांची नेमणूक हि वर्षातील 11 महीन्यांसाठी करून गोवा राज्याच्या धर्तीवर (किमान 30,000 ‌ते 45,000/ रुपये) पर्यत मानधन त्यांना देण्यात यावे व त्यांचा तासिका तत्वावर सह प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राहय धरण्यात यावा. 
4)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड या मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सामाजिक शास्त्रातील दुसऱ्या पदाला मंजुरी देणे अथवा या पदावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना कायम स्वरूपी अॅप्रोल तसेच कायम पुर्णवेळ प्राध्यापकांप्रमाणे वेतन द्यावे. 
5)मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठातील MC , SENET , DEN , तसेच शिक्षक व पदविधर आमदारांच्या नाकर्त्यात्ते भुमीकेमुळेच मराठवाड्यातील सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या दुसऱ्या पदाचा प्रश्न सुटत नसून यामुळे पात्रता धारक व CHB प्राध्यापकांचे तसेच विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.म्हणून मा. मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांनी यात लक्ष घालावे.
6)प्राध्यापक पदभरती ही संस्थानिहाय किंवा 200 पॉइंट रोस्टर नुसार तात्काळ राज्य शासनाने करावी व आरक्षण बिंदुनियमावली ठरवण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
7)2016 नंतर प्राध्यापक म्हणून रूजू झालेल्या सर्व प्राध्यापकांना Ph.D पाच INCREMENT त्वरित देण्यास यावे.
सदर आपल्या स्तरावर मांडत असलेल्या या मागण्यांना त्वरित न्याय देणेत यावा ,अन्यर्थ महाराष्ट्र राज्यातील प्रायोटी तत्त्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांना घेऊन मनसे महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल,असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित सेनेचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिला आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

आजरा तालुक्यात आणखी पाच कोरोनाबाधित; तीन तलाठ्यांचा समावेश


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणखी पाचजणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३ तलाठ्यांचा समावेश आहे. गजरगाव, धामणे, भादवणचे तलाठी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर हाळोलीच्या पॉझिटिव्ह असलेल्या कोतवालच्या बहिणीचा अहवाल देखील पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच सुळे येथील ५४ वर्षीय महिला पाॅझीटीव्ह आहे.

आजरा शहरातील एकाच कुटूंबातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाले आहे. आमराई गल्लीतील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मृत्यूपाठोपाठ त्यांचा बेळगाव येथील जावई, मेव्हणा व रविवारी रात्री बहिणीचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

संत गजानन पॉलिटेक्निकमध्ये आजपासून प्रवेशप्रक्रियेस सुरुवात


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आजपासून (दि.10) पासून प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली यासाठी शासनाकडून अधिकृत सुविधा केद्रं म्हणून मान्यता मिळाली आहे. हि प्रवेशप्रक्रिया 25 अॉगस्टअखेर चालणार आहे.

या पॉलिटेक्निक कॉलेजच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सलग आठ वर्ष अति उत्कुष्ट श्रेणी म्हणून गौरवण्यात आला आहे तसेच यावर्षी नँशनल बोर्ड ॲक्रिडेटेशन (एन.बी.ए.) कडून सर्वोच्च मानाकंन मिळाला आहे.

येथील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, अॉटोमोबाईल व नव्यानेच मंजूरी मिळालेल्या डी.एम.एल.टी. या अभ्यासक्रमासाठी प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सवलती उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विद्यार्थानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  प्राचार्य डॉ संजय दाभोळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8888868443, 8605009614 या फोन नंबरशी संपर्क साधावा

 असे असेल वेळापत्रक :-

 10 ते 25 अॉगस्ट :
अॉनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रे छाननी पडताळणी व अपलोड करणे आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे

28 अॉगस्ट :
 तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे

29 ते 31अॉगस्ट : 
तात्पुरती गुणवत्ता याद्यामध्ये विद्यार्थाची तक्रार असल्यास तक्रार करणे

2 सप्टेंबर :
अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Sunday, August 9, 2020

तिरवडे पोलीस पाटील बाबासाहेब सुतार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन


गारगोटी (प्रतिनिधी) : 

तिरवडे (ता. भुदरगड) येथील पोलीसपाटील बाबासाहेब धोंडीराम सुतार (वय ४५) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कोरोना लढ्यात जनजागृतीमध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

Friday, August 7, 2020

अवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस; पुण्याची सिरम इन्स्टिट्युट अॉक्सफर्डच्या मदतीने विकसित करणार लस



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे.

सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या करोनावरच्या अनेक लसींवर काम सुरु आहे. यापैकी काही लसी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सिरमनेही ऑक्सफर्ड आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे. यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नूतन जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे यांचा सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :          

गडहिंग्लज येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने यशवंत बझार येथे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदी व आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुका समन्वयक पदी विद्याधर गुरबे यांची नियुक्ती झाले बद्दल गडहिंग्लज तालुका  काँग्रेस अध्यक्ष बी. एन. पाटील गिजवणेकर याच्या हस्ते सत्कार  करण्यात आला. तिन्ही तालुक्यात काँग्रेस ऊर्जितावस्थेत  आणण्याकरिता आमचे नेते,  जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ना. सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांनी  विद्याधर गुरबे यांच्या सारख्या काँग्रेस निष्ठावंत तरुण  कार्यकर्त्याची निवड केली ते नक्कीच तिन्हीही तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवतील असा विश्वास  बी. एन. पाटील गिजवणेकर व्यक्त केला. सत्कारला उत्तर देताना विद्याधर गुरबे यांनी जेष्ठ नेत्याच्या मार्गदर्शना खालीच माझी वाटचाल चालु आहे. आमचे दैवत जिल्ह्याचे नेते बंटी पाटील यांनी  माझ्यावर अंत्यत विश्वासाने माझ्यावर जिल्हा सरचिटणीस व तिन्ही तालुक्याचे समवयस्क पदी निवड केली. त्याचा मी उपयोग काँग्रेस वाढी साठी तसेच काँग्रेसचे विचारसरणी जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करीन व माझ्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविण. या कार्यक्रमास शहर अध्यक्ष बसवराज आजरी, अॅड.दिग्वीजय कुराडे,  प्रशांत देसाई, अॅड. बाळासाहेब पाटील, मारुती कांबळे, विरसिंग बिल्लावर, सचीन मुळे, संतोष चौगुले उपस्थित होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

आजरा तालुक्यात दिवसभरात सात कोरोनाबाधित; पाच महिन्याच्या बालकाचा समावेश


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात शुक्रवारी दिवभरात सात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आजरा शहरात तीन, उत्तूर शहरात तीन तर हाळोली गावातील एकाचा समावेश आहे. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८८ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा शहरातील साई कॉलनीतील ३३ वर्षीय युवक, रवळनाथ कॉलनीतील ४१ वर्षीय पुरूष, वाणी गल्लीतील पाच महिन्याचा बालक, उत्तूर शहरातील ५० वर्षीय महिला, २३ वर्षीत युवती, २५ वर्षीय युवक तसेच हाळोली गावातील २७ वर्षीय युवकाचा समावेश आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Thursday, August 6, 2020

चंदगड तालुक्याला महापूरचा विळखा


चंदगड (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्यापासून काही अंतरावरील  जोडलेल्या सर्वच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात  पाणी ये -जा होत असल्यामुळे लोकांचा तालुक्यापासून संपर्क तुटत आहे. नदीलगत शेतजमिनी, रस्त्याच्या कडेने असणारी शेत, ओढ्याच्या बाजूची शेती अशाप्रकारे सर्वच ठिकाणी पूराची अवस्था दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य लोकांप्रमाणे शेतकरीही धास्तावला आहें. चंदगड रोड लगत सर्व शेती पुराने व्यापली असून सर्व रस्ते, ओढे -नाले तुडुंब भरले असून येथील धोका वाढत चालला आहे. कोवाड बाजारपेठ, कानूर बाजारपेठ तसेच ईतर अन्य भाग, अनेक गावे  ही पूरानी व्यापले असून चंदगड तालुक्यातील महापूरचा धोका वाढत चालला आहें.  गेल्यावर्षीप्रमाने या वर्षीही महापूराची परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या लागलेल्या महापूराच्या विळखेपासून सर्व चंदगडवाशीयांनी काळजी घ्यावी तसेच   जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी  स्थलांतर करावे अशी सूचना केली गेली आहे.

न्हावेली येथील मुलांचे दहावीमधे विक्रमी यश; चंदगडच्या पश्चिम भागातून ग्रामस्थांकडून कौतुक


चंदगड (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक मुलांनी दहावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. त्यामधील न्हावेली (ता. चंदगड) या गावातील मुलांनी या भागात उत्तमरित्या सर्वात जास्त यश संपादन करत एक आदर्श घालून दिला आहे. या भागातील आजपर्यतची सर्वात जास्त टक्केवारी गुण मिळवत या मुलांनी एक विक्रमी परंपरा जपली आहेत त्यामुळे भागातील सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे. हा भाग अनेक सुविधापासून वंचित असूनही या मुलांनी कठीण समयी कसरत करत सराव व अभ्यास सुरू ठेवून जिद्दीने मेहनत केली होती. अत्यंत मेहनत, योग्य अभ्यास, घेतलेले मार्गदर्शन यामुळे हे यश मुलांच्या पदरी पडले आहे अश्या मुलांच्या पालकाकडून भावना व्यक्त होत आहेत. यामधे न्हावेली येथील संजना संजय पेडणेकर (रवळनाथ हायस्कूल ) हिने दहावीमधे 94.80 टक्के, तर (दि .न्यू .इंग्लीश स्कूल) प्रदीप येसणे 91 टक्के, सलोनी गावडे 90 टक्के, संतोषी  पेडणेकर 90 टक्के या उच्च टक्केवारी प्रमाणे यश संपादन केल्यामुळे येथील  पश्चिम भागातील गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर कायम आहे. गुरूवारी जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असणार्‍या पंचगंगा नदीने आपली ४३ फूटाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. सायंकाऴी पाच वाजता राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३.२ फूट इतकी नोंदली गेली आहे. जिल्ह्यातील १०२ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवर गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मच्छिंद्र झाली. परंपरागत मच्छिंद्री झाली म्हणजे महापूर आला असे मानले जाते. सलग दोन-अडीच दिवस झालेल्या पावसामुळे दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पुलावरील कमानीजवळ माशा सारख्या असलेल्या आकारावर पाणी आले आणि कोल्हापुरात महापूर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
9049969625

Wednesday, August 5, 2020

आजर्‍याचा व्हिक्टोरिया पुल वाहतुकीसाठी बंद


आजरा (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यासह आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. हिरण्यकेशी नदी पात्राबाहेरून वाहत आहे. या नदीवरील आजरा शहरानजिकच्या व्हिक्टोरिया पुलावर मच्छिंद्री झाल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिले आहे. गेल्या १३० वर्षात सलग दुसर्‍या वर्षी व्हिक्टोरिया पुलावर मंच्छिंद्री झाली आहे.

आजरा तालुक्यात पुन्हा १३ कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनामीटरमध्ये वाढच होत आहे. तालुक्यात नवीन १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सरंबळवाडी ५, कोळींद्रे, पेरणोली, खेडे, बुरुडे, आजरा, भादवणवाडी, सोहाळे, मडिलगे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Tuesday, August 4, 2020

आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच; आणखी १३ कोरोनाबाधीत


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी  ५ वाजेपर्यंत १३ जणांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. यामध्ये आजरा शहरातील दर्गा गल्ली, वाणी गल्ली या दोन गल्लीतील ८, हत्तीवडे १, धामणे १, मडिलगे १, देवर्डे १, सरोळी १ समावेश आहे.

बातम्यांसाठी संपर्क साधा :
विकास न्यूज 
9049969625

Monday, August 3, 2020

आजरा तहसिल कार्यालयातील क्लार्क कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्याचे मध्यवर्ती कार्यालय असणार्‍या आजरा तहसिल कार्यालयातील क्लार्कचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. 

Sunday, August 2, 2020

नारळी भात; नारळी पौर्णिमा विशेष मेजवानी

नारळी भात; नारळी पौर्णिमा विशेष मेजवानी


विकास न्यूज (विशेष प्रतिनिधी) :

श्रावण महिन्यांत सणांची रेलचेल असते. या महिन्यातील पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी  बहिण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी नारळी भात हा हमखास सर्वच घरात केला जातो. तर नारळी पौर्णिमा निमित्य जाणून घेऊया नारळी भात तयार करण्याची कृती,

(प्रायोजक : शंकर बेकरी, संभाजी चौक आजरा)

नारळी भातासाठी लागणारे साहित्य :

३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे

नारळी भात तयार करण्याची कृती :

१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.

२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.

३) तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.

४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.

६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.

७) झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.

८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.


टीप्स :

१) गूळ-नारळ-भात यांचे मिश्रण शिजवताना गूळ वितळल्याने सुरूवातीला ते पातळ होते. काहीवेळ शिजवल्यावर ते आळत जाईल. तसेच नारळीभात तयार झाल्यावर शेवटची काही मिनीटे झाकण न ठेवता शिजवावे म्हणजे अधिकचा ओलसरपणा निघून जाईल.

२) जर नारळीभात खुप गोड नको असेल तर गूळाचे प्रमाण १ कप ऐवजी पाऊण कप वापरा.

३) जर नारळीभात तयार झाल्या झाल्या लगेच चव पाहिली तर प्रचंड गोड लागेल, पण काही कालावधीनंतर गुळाचा पाक भातात मुरल्याने गोडपणा काहीप्रमाणात कमी होतो.

४) तांदूळ परफेक्ट शिजवावा. कमी शिजलेल्या भाताची शिते, गूळाच्या संपर्कात आल्यामुळे कडकडीत होतात. तसेच जास्त शिजलेल्या भाताचा, गूळ आणि नारळ घालून शिजवल्यावर गोळा होतो आणि शिते आख्खी राहात नाहीत.

५) भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो.

आनंदी क्षण साजरे करण्याचे सोबती
शंकर बेकर्स अॅण्ड स्वीटस्
संभाजी चौक, आजरा
9850372737

पाल्याचे आभासी अपहरण नाट्य; सायबर भामट्यांपासून सावध रहावे, महाराष्ट्र सायबरचे आवाहन


मुंबई (प्रतिनिधी) :

पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे  करण्यात येत आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . या मध्ये सायबर भामटे आधी social profiling करून  शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे नवरा ,बायको दोघेही नोकरी करतात आणि त्यांचे पाल्य एकटे असते किंवा त्याच्याकडे पण  मोबाईल असतात. सायबर भामटे virtually विविध सोशल मिडियाद्वारे  अशा पाल्यांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो, पालकांची माहिती  काढून घेतात. त्यानंतर हे त्या पाल्यास काही काळा करिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास सदर पालकांस  खोटे व्हीडीओ बनवून किंवा फेक फोटो  बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात  जमा देखील करतात. इथे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसविले जाते.  अपहरणाचा आभास निर्माण केला जातो ज्यामुळे घाबरून ते खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात   ट्रान्सफर करण्यास सांगितले असते. पालक घाबरून जाऊन पाल्याच्या सुरक्षितेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात . 

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि 

१) वरील नमूद प्रकार हे परदेशात जास्त होत असले तरी , आपण इथे सतर्क राहणे जरुरीचे आहे.
 
२) तुम्ही तुमच्या पाल्याकडे शक्यतो एकदम  साधा फोन द्या ज्यामुळे आपले पाल्य आपल्या नकळत  जास्त सोशल मिडियावर वावरणार नाही व सायबर भामट्यांचा संपर्कात यायची शक्यता कमी होईल. 

३) पालकांनीसुद्धा सोशलमिडियावर वावरताना आपली काय माहिती सोशल मिडियावर प्रसारित करायची याचे तारतम्य बाळगले पाहिजे.

४) अशा प्रकारचा अनोळखी मेसेज आला तर शक्यतो त्या अपहरणकर्त्याचा फोनवर संपर्क होतो आहे का याची खात्री करा.

५)अशा प्रकारचे मेसेज आल्यावर आपले पाल्य कुठे आहे किंवा असू शकेल याचा आधी शोध घ्या, आपल्या पाल्याशी सतत संपर्कात राहा.

 अशा प्रकारचे मेसेज आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

विद्याधर गुरबे यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य विद्याधर बाबुराव गुरबे यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस पदी तसेच गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले.

विद्याधर गुरबे हे सध्या गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य व गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले आहे. बंटी पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते अोळखले जातात. गुरबे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात युवक काँग्रेसमधून झाली. त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात मरगऴेल्या अवस्थेतील काँग्रेसला ऊर्जीतावस्था देणे तसेच तळागाळामध्ये काँग्रेस रुजविण्यात मोलाचे योगदान आहे. आजरा व चंदगड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत नगरसेवक निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. गुरबे यांच्या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आजरा शहरात पुन्हा सात कोरोनाबाधित


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा शहराचे कोरोनामीटर वाढतच चालले आहे. रविवारी दुपारच्या अहवाल शहरातील सात लोकांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण भारतनगरमधील कोरोनाबाधिताशी संबधित आहेत. यामुळे शहरवासियांसह तालुका वासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

एसटी महामंडळाला शासकीय सेवेत सामावून घ्या, अन्यथा मनसे उग्र आंदोलन छेडेल : युवराज येडूरे


गारगोटी (प्रतिनिधी) :

 गेली ७२ वर्षे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यत, शहरापासून खेड्यांपर्यत प्रवासी देऊन महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे सहकार्य करुन "ना नफा ना तोटा" तत्वावर व "बहूजन हिताय बहूजन सुखाय" या ब्रिद वाक्यावर कार्य करणारी महाराष्ट्राला सर्वाधिक आर्थिक महसूल देणारी संस्था म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. अर्थात सर्वसामान्याचा गरिबाचा रथ,"महाराष्ट्राची रक्तवाहिनी,जिवनवाहिनी" लालपरी एसटी. सध्या कोरोना महामारीच्या काळात वेळोवेळी येत असलेल्या शासन आदेशानूसार अत्यावश्यक  व मालवाहतूक सेवा वगळता ठप्प आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे दररोज २० ते २५ कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होत आहे. तरीही आपली एसटी मात्र गरजू, परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडणे व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी सोडण्यासाठी व अत्यावश्यक सेवेसाठी कोणत्याही नफा तोट्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन एसटीची चाके सकारात्मक संदेश देत आजही राज्यभर फिरत असून आजअखेर महामंडळातील कर्मचाऱ्यांचे मार्च पेड एप्रिल महिन्यातील २५ टक्के, मे पेड, जून महिन्यातील टक्के व जून पेड, जुलै महिन्यातील १०० टक्के म्हणजे संपूर्ण पगार झालेला नाही यामुळे आधीच कमी वेतनामध्ये काम करणारा रा. प. कर्मचारी आर्थिक विवंचणेत सापडला आहे.आपल्या मुलाबाळांचे, कुटूंबाचे पोट भरण्यासाठी गवंडीकाम, शेतमजूरी, भाजीपाला विकणे, खाजगी गाडीवर हमालीची कामे करणे यासारखी कामे करुन नावालाच सरकारी असलेला एसटी कर्मचारी प्रतिकुल जीवन जगत आहे. गेली पाच वर्षे एसटी महामंडळातील संघर्षित एसटी कर्मचाऱ्यांनी, परिवहन मंत्री, सर्व मंत्र्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना निवेदने दिली आहेत व सनदशीर मार्गाने मोर्चे, आंदोलने केली आहेत. तरीही महाराष्ट्रातील ज्या प्रवाशी बांधवांनी, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनी निवडून दिलेले लोकप्रतिनीधी, मंत्री एसटी महामंडळासाठी किंवा त्या महामंडळातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कुठल्याही प्रकारची भूमिका पार पाडून राज्य परिवहन महामंडळ संदर्भात विधानसभेमध्ये आणि  संसदेमध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्यांची बाजू घेताना दिसत नाहीत. आपण तरी एसटी कर्मचाऱ्यांची नैसर्गिक न्यायतत्वाने बाजू मांडावी. एसटी महामंडळात आजही अन्यायकारक शिस्त व आवेदन पध्दती चालू आहे. दररोज जाचक व अन्यायकारक परिपत्रके येतच आहेत. अश्या परिस्थितीत ही लालपरीचा सेवक अत्यावश्यक सेवा म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करत असूनही इतर आस्थापना जसे शासकीय कर्मचारी, वीज महामंडळ, वन महामंडळ, औद्योगिक महामंडळ, कृषी व पशुसंवर्धन विभाग व इतर महमहामंडळातील     कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळाले आहे. परंतु महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सर्वाधिक महसुल देणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना आजही कमी व अनियमित मिळणाऱ्या पगारात अनंत अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. तरी आपण एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत पगार देऊन एसटीच्या अत्यावश्यक सेवेला शासकीय सेवेत सामाऊन घेऊन सर्व सामान्यांची लालपरी आणि प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र काम करणाऱ्या आपले सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या माध्यमातून एसटीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावा व  एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मनसे उग्र आंदोलन छेडेल. या संदर्भातले निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच परिवहन मंत्री यांना मेल द्वारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी सेनेचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिले आहे. तसेच सदर निवेदनाची माहितीसाठी प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना देखील दिली आहे.

Saturday, August 1, 2020

आजरा शहरात पुन्हा ३ पॉझिटिव्ह


आजरा (प्रतिनिधी) : 

शनिवारी सायंकाळी आजऱ्यात ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आमराई गल्ली (आजरा) येथील या तीन व्यक्तीनी तपासणी  खासगी लॅब मध्ये केली होती. तिघांमध्ये ५४ व ३१ वर्ष वयाच्या दोन महिला आणि 8 वर्षे वयाचा मुलगा आहे. चार दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाशी संबंधित या व्यक्ती आहेत. आता या कुटुंबातील बधितांची संख्या १२ झाली आहे. दरम्यान, तालुक्यातून पॉझिटिव्ह ठरलेल्यांवर उपचार करून डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तींनी शंभरी ओलांडली आहे. तालुक्यातील कोविड केंद्रातून १०१ जणांना डिस्चार्ज दिला आहे.

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...