Sunday, August 2, 2020

पाल्याचे आभासी अपहरण नाट्य; सायबर भामट्यांपासून सावध रहावे, महाराष्ट्र सायबरचे आवाहन


मुंबई (प्रतिनिधी) :

पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे  करण्यात येत आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . या मध्ये सायबर भामटे आधी social profiling करून  शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे नवरा ,बायको दोघेही नोकरी करतात आणि त्यांचे पाल्य एकटे असते किंवा त्याच्याकडे पण  मोबाईल असतात. सायबर भामटे virtually विविध सोशल मिडियाद्वारे  अशा पाल्यांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो, पालकांची माहिती  काढून घेतात. त्यानंतर हे त्या पाल्यास काही काळा करिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास सदर पालकांस  खोटे व्हीडीओ बनवून किंवा फेक फोटो  बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात  जमा देखील करतात. इथे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसविले जाते.  अपहरणाचा आभास निर्माण केला जातो ज्यामुळे घाबरून ते खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात   ट्रान्सफर करण्यास सांगितले असते. पालक घाबरून जाऊन पाल्याच्या सुरक्षितेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात . 

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि 

१) वरील नमूद प्रकार हे परदेशात जास्त होत असले तरी , आपण इथे सतर्क राहणे जरुरीचे आहे.
 
२) तुम्ही तुमच्या पाल्याकडे शक्यतो एकदम  साधा फोन द्या ज्यामुळे आपले पाल्य आपल्या नकळत  जास्त सोशल मिडियावर वावरणार नाही व सायबर भामट्यांचा संपर्कात यायची शक्यता कमी होईल. 

३) पालकांनीसुद्धा सोशलमिडियावर वावरताना आपली काय माहिती सोशल मिडियावर प्रसारित करायची याचे तारतम्य बाळगले पाहिजे.

४) अशा प्रकारचा अनोळखी मेसेज आला तर शक्यतो त्या अपहरणकर्त्याचा फोनवर संपर्क होतो आहे का याची खात्री करा.

५)अशा प्रकारचे मेसेज आल्यावर आपले पाल्य कुठे आहे किंवा असू शकेल याचा आधी शोध घ्या, आपल्या पाल्याशी सतत संपर्कात राहा.

 अशा प्रकारचे मेसेज आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडीया 
9049969625

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...