Sunday, August 2, 2020

विद्याधर गुरबे यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य विद्याधर बाबुराव गुरबे यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस पदी तसेच गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले.

विद्याधर गुरबे हे सध्या गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य व गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले आहे. बंटी पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते अोळखले जातात. गुरबे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात युवक काँग्रेसमधून झाली. त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात मरगऴेल्या अवस्थेतील काँग्रेसला ऊर्जीतावस्था देणे तसेच तळागाळामध्ये काँग्रेस रुजविण्यात मोलाचे योगदान आहे. आजरा व चंदगड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत नगरसेवक निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. गुरबे यांच्या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...