Wednesday, August 26, 2020

पुन्हा बदली; नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे


मुंबई (प्रतिनिधी) :

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.

तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे करोनाची लागण झाल्याने सध्या विलगीकरणात आहेत. त्यांनीच ट्विट करत आपल्याला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. “मला करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:चं अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...