कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर कायम आहे. गुरूवारी जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असणार्या पंचगंगा नदीने आपली ४३ फूटाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. सायंकाऴी पाच वाजता राजाराम बंधार्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३.२ फूट इतकी नोंदली गेली आहे. जिल्ह्यातील १०२ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवर गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मच्छिंद्र झाली. परंपरागत मच्छिंद्री झाली म्हणजे महापूर आला असे मानले जाते. सलग दोन-अडीच दिवस झालेल्या पावसामुळे दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पुलावरील कमानीजवळ माशा सारख्या असलेल्या आकारावर पाणी आले आणि कोल्हापुरात महापूर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
9049969625
No comments:
Post a Comment