गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीत युवकाचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना गणेशविसर्जना वेळी घटना घडली. अंकुश नागेश मुरुकटे (वय २३ ) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, हरळी ते इंचनाळ दरम्यान जाणार्या हिरण्यकेशी नदीच्या पुलावर सायंकाळी सहाच्या सुमारास हरळी बुद्रुक येथील अंकुश नागेश मुरुकटे, प्रतीक सुरेश खवरे, शैलेश शशी मुरूकटे हे तिघे गणेशविसर्जनासाठी गेले होते. या तिघांनी पोहण्याकरिता पुलावरून उडी मारली. त्यापैकी प्रतीक सुरेश खवरे व शैलेश शशी मुरूकटे दोघे पोहून बाहेर आले. मात्र अंकुश नागेश मुरुकटे हा युवक पोहताना दम लागून पाण्यात बुडाला. माहिती मिळताच पोलीस स्टाफ,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयकडील कर्मचारी यांनी हिरण्यकेशी नदी पात्रात शोध घेतला पण मिळून आला नाही. अंधार असल्याने शोध कार्यात अडथळा येत असल्याने शुक्रवारी सकाळी नागरपालिकेची बोट व कर्मचारीसह शोध घेणार असल्याचे गडहिंग्लज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी माहिती दिली.
No comments:
Post a Comment