चंदगड (प्रतिनिधी) :
राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला फायबर आँप्टीकल महानेटनी जाेडायचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महानेट प्रकल्प २ या नावाने हा प्रकल्प आेळखला जाताे. राज्य शासनाने महानेट अंतर्गत काम युद्ध पातळीवर सुरू करुन चंदगड तालुक्यातील हे काम पुर्णत्वाला आले आहे. चंदगड तालुक्यातील काेकरे, न्हावेली, उमगाव, जांबरे, नागवे येथील भाग हा दुर्गम भाग म्हणून पाहिले जाते, या भागात संपर्क करण्यासाठी काेणतेही नेटवर्क उपलब्ध नाही या सर्व बाबींचा विचार करून महानेटने या भागाला प्रथम प्राधान्य देवुन येथील काम पुर्णत्वास आणले होते. पण काही समाजकंटकांनी माळी गावाजवळील नदीच्या पुलावर केलेले सिमेंट काँक्रीट फाेडुन त्यातील 6 J I पाईप व त्यातील डक चाेरला आहे, त्यामुळे शासनाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. अगाेदरच नेटवर्क पासुन वंचित असलेल्या भागात महानेट मुळे आशेचा किरण दिसत हाेता पण अश्या काही समाजकंटकांनी ताेही नाहीसा केला, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणार्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी ही मागणी आत्ता जाेर धरु लागली आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
9049969625
No comments:
Post a Comment