गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने यशवंत बझार येथे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदी व आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुका समन्वयक पदी विद्याधर गुरबे यांची नियुक्ती झाले बद्दल गडहिंग्लज तालुका काँग्रेस अध्यक्ष बी. एन. पाटील गिजवणेकर याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिन्ही तालुक्यात काँग्रेस ऊर्जितावस्थेत आणण्याकरिता आमचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ना. सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांनी विद्याधर गुरबे यांच्या सारख्या काँग्रेस निष्ठावंत तरुण कार्यकर्त्याची निवड केली ते नक्कीच तिन्हीही तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवतील असा विश्वास बी. एन. पाटील गिजवणेकर व्यक्त केला. सत्कारला उत्तर देताना विद्याधर गुरबे यांनी जेष्ठ नेत्याच्या मार्गदर्शना खालीच माझी वाटचाल चालु आहे. आमचे दैवत जिल्ह्याचे नेते बंटी पाटील यांनी माझ्यावर अंत्यत विश्वासाने माझ्यावर जिल्हा सरचिटणीस व तिन्ही तालुक्याचे समवयस्क पदी निवड केली. त्याचा मी उपयोग काँग्रेस वाढी साठी तसेच काँग्रेसचे विचारसरणी जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करीन व माझ्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविण. या कार्यक्रमास शहर अध्यक्ष बसवराज आजरी, अॅड.दिग्वीजय कुराडे, प्रशांत देसाई, अॅड. बाळासाहेब पाटील, मारुती कांबळे, विरसिंग बिल्लावर, सचीन मुळे, संतोष चौगुले उपस्थित होते.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
9049969625
No comments:
Post a Comment