चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक मुलांनी दहावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. त्यामधील न्हावेली (ता. चंदगड) या गावातील मुलांनी या भागात उत्तमरित्या सर्वात जास्त यश संपादन करत एक आदर्श घालून दिला आहे. या भागातील आजपर्यतची सर्वात जास्त टक्केवारी गुण मिळवत या मुलांनी एक विक्रमी परंपरा जपली आहेत त्यामुळे भागातील सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे. हा भाग अनेक सुविधापासून वंचित असूनही या मुलांनी कठीण समयी कसरत करत सराव व अभ्यास सुरू ठेवून जिद्दीने मेहनत केली होती. अत्यंत मेहनत, योग्य अभ्यास, घेतलेले मार्गदर्शन यामुळे हे यश मुलांच्या पदरी पडले आहे अश्या मुलांच्या पालकाकडून भावना व्यक्त होत आहेत. यामधे न्हावेली येथील संजना संजय पेडणेकर (रवळनाथ हायस्कूल ) हिने दहावीमधे 94.80 टक्के, तर (दि .न्यू .इंग्लीश स्कूल) प्रदीप येसणे 91 टक्के, सलोनी गावडे 90 टक्के, संतोषी पेडणेकर 90 टक्के या उच्च टक्केवारी प्रमाणे यश संपादन केल्यामुळे येथील पश्चिम भागातील गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
9049969625
No comments:
Post a Comment