महागाव (प्रतिनिधी) :
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आजपासून (दि.10) पासून प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली यासाठी शासनाकडून अधिकृत सुविधा केद्रं म्हणून मान्यता मिळाली आहे. हि प्रवेशप्रक्रिया 25 अॉगस्टअखेर चालणार आहे.
या पॉलिटेक्निक कॉलेजच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सलग आठ वर्ष अति उत्कुष्ट श्रेणी म्हणून गौरवण्यात आला आहे तसेच यावर्षी नँशनल बोर्ड ॲक्रिडेटेशन (एन.बी.ए.) कडून सर्वोच्च मानाकंन मिळाला आहे.
येथील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, अॉटोमोबाईल व नव्यानेच मंजूरी मिळालेल्या डी.एम.एल.टी. या अभ्यासक्रमासाठी प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सवलती उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विद्यार्थानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ संजय दाभोळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8888868443, 8605009614 या फोन नंबरशी संपर्क साधावा
असे असेल वेळापत्रक :-
10 ते 25 अॉगस्ट :
अॉनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रे छाननी पडताळणी व अपलोड करणे आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे
28 अॉगस्ट :
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे
29 ते 31अॉगस्ट :
तात्पुरती गुणवत्ता याद्यामध्ये विद्यार्थाची तक्रार असल्यास तक्रार करणे
2 सप्टेंबर :
अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
9049969625
No comments:
Post a Comment